सुमारे शतकभराचा उद्योगवारसा असलेल्या दक्षिण भारतातील व्हीएसटी समूहाने जपानच्या मित्सुबिशी कंपनीबरोबर तांत्रिक करार करून १९६७ मध्ये पॉवर टिलर्स आणि डिझेल इंजिन उत्पादन या स्वतंत्र कंपनीद्वारे सुरू केले. एका उत्तम वंशावळीतील ही उमदी कंपनी आहे. १९८४ मध्ये मित्सुबिशीच्या साहाय्याने कंपनीने ट्रॅक्टर्सचे उत्पादनही सुरू केले. सध्या कंपनीची सुमारे २५ हजार पॉवर टिलर्स, ३२ हजार इंजिन्स आणि ५ हजार ट्रॅक्टर्स उत्पादन करण्याची क्षमता आहे.
कंपनीचे प्रमुख उत्पादन पॉवर टिलर्स आणि ट्रॅक्टर्स असून कृषी क्षेत्रात ते प्रामुख्याने वापरले जाते. भारताखेरीज कंपनी आपल्या उत्पादनांची निर्यात प्रामुख्याने आफ्रिका, युरोप, कोरिया आणि थायलंड येथे करते. म्हैसूर, बंगळुरू आणि होसूर या तीन ठिकाणी कंपनीचे कारखाने आहेत. सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या या कंपनीने १९९८ आणि २०१० मध्ये २:१ प्रमाणात बोनस समभागांचे वाटप करून आपल्या भागधारकांना खूष केले आहे. केवळ ७ च्या आसपास किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) असणारा हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम वाटतो.
व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लि.
सध्याचा भाव रु. ४४३
वर्षांतील उच्चांक/नीचांक रु. ५६३/४०७
प्रवर्तक : व्हीएसटी समूह
प्रमुख उत्पादन : टिलर्स, ट्रॅक्टर्स निर्मिती
भरणा झालेले भागभांडवल : रु. ८.६४ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा : ५३.८५ %
दर्शनी मूल्य : रु. १०
पुस्तकी मूल्य : रु. २३७
प्रतिभाग मिळकत (ईपीएस) : रु. ६०.९
किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) : ७.३ पट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा