कोवळ्या हालत्या चिमण्या पिंपळपाना कल्पना हले तुज बघुनी असे हालताना तुजकडेच माझे लक्ष सारखे लागे ‘गोविंदाग्रजां’च्या ‘हालत्या पिंपळपानास’ या कवितेतील या ओळी. पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर आज ज्या चौकाला शगुन चौक म्हणून ओळखतात त्याच्या पुढील चौकात एका वाडय़ात गडक ऱ्यांचे बिऱ्हाड होते. वाडय़ाच्या माडीवर गडकरी लेखन करीत असत आणि त्याच वेळी समोरच्या पिंपळाच्या झाडावरचे कोवळ्या पानांकडे त्यांचे लक्ष जात असे.
या पिंपळपानास उद्देशून केलेली ही कविता. जेव्हापासून ‘स्मॉल कॅप’वर लिहायचे ठरले तेव्हापासून ४५० कंपन्यांतून अनेक कंपन्या माझे सारखे लक्ष वेधून घेत आहेत. परंतु त्यातील फक्त १२ कंपन्यांवर लिहिणार आहे.
* हेक्झावेअर टेक्नॉलॉजी
बिनकाटय़ाचा गुलाब मागील बंद भाव : रु. १३४
वर्षांतील उच्चांक : रु. १३५
वर्षांतील नीचांक : रु. ७०.६०
वर्षांनंतर अपेक्षित भाव : रु. २००
टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञानातील कंपन्यांची कामगिरी ढेपाळत असताना ज्या मध्यम व लहान कंपन्यांची कामगिरी उठून दिसते, त्यापैकी माइंड ट्री, हेक्झावेअर व एम्फसिस यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सध्याचा भाव २०१३ च्या अंदाजे प्रतिशेअर मिळकतीच्या १२ पट आहे. म्हणजे तसा स्वस्तच आहे. गेल्या आर्थिक वर्षांत त्या आधीच्या वर्षांपेक्षा विक्री ३८% वाढून रु. १,४५१ कोटी, तर निव्वळ नफा १४८% वाढून रु. २६७ कोटी झाला. या वर्षी विक्री ३२%, तर नफा ८० % वाढण्याची अपेक्षा आहे. हेक्झावेअरची नफाक्षमता २५% असून मध्यम माहिती तंत्रज्ञानातील कंपन्यांमध्ये सर्वात जास्त आहे. संगणक प्रणीलीच्या ईआरपी या गटात पीपल सॉफ्ट नावाचे ओरॅकल उत्पादन असून हेक्झावेअर ते ग्राहकांच्या गरजेनुसार त्यात बदल करून देते. ही सेवा अत्यंत यशस्वी ठरली असून त्याचा नफाक्षमता वाढीत मोठा वाटा आहे. नुकतेच कंपनीने १०० दशलक्ष डॉलरचा करार एका मोठय़ा ग्राहकाबरोबर केला असून तो चार वर्षांत पूर्ण करायचा आहे. बँक व आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्या या माहिती तंत्रज्ञानातील कंपन्यांचा मोठा ग्राहक असतो. इन्फोसिसचा भाव न वाढण्यास या व्यवसायात मर्यादित वाढ हे कारण आहे; तर हेक्झावेअरची वाढ या गटात सर्वोत्तम आहे. या गटात हेक्झावेअरला जुन्हा ग्राहकांनी सेवाशुल्क वाढवून दिले आहे. हा वाढलेला दर नफाक्षमता या वर्षी वाढवेल.
* ऑटोमोटिव्ह अॅक्सल्स : म्हैसूर चंदन
मागील बंद भाव : रु. १२१.६५
वर्षांतील उच्चांक : रु. १८८.५०
वर्षांतील नीचांक : रु. ९३.३०
वर्षांनंतर अपेक्षित भाव : रु. १८५
ऑटोमोटिव्ह अॅक्सल्स ही कंपनी भारत फोर्जच्या कल्याणी समूह व अमेरिकेच्या मेंटोर यांनी संयुक्त भागीदारीत १९८१ मध्ये सुरू केली. ट्रक, बस यांची चाके ज्या पोलादी दांडय़ावर बसवलेली असतात त्याला अॅक्सल्स असे म्हणतात. हा सुटा भाग कंपनी बनवते. ऑटोमोटिव्ह अॅक्सल्सचा कारखाना कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील हौसूर औद्योगिक वसाहतीत आहे. टाटा मोटर्स, महिंद्र अॅण्ड महिंद्र, जबलपूर येथील संरक्षण दलाचा वाहन कारखाना, भारत अर्थ मूव्हर्स, अशोक लेलॅण्ड, फोर्स मोटर्स आदी देशातील तसेच विदेशातील अमेरिका, जर्मनी, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आदी देशातील वाहन उत्पादकांची पुरवठादार आहे. हा भाग तयार करताना अत्यंत गुंतागुतीची कृती करावी लागते. ज्यात सहा क्रिया कराव्या लागतात. या क्रिया करण्यात या कंपनीने प्रभुत्व प्राप्त केले आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत रु. १८१.८१ कोटींच्या विक्रीवर रु. ५.९४ कोटींचा नफा मिळविला आहे. २०१५ पर्यंत पहिला देशांतर्गत ५५ मिमी व १२५ मिमीच्या तोफा भारतीय सैन्याकरिता बनविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रु. १०० कोटी खर्चून उभारण्यात येणार आहे. या कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ७१ % आहे.
* हिताची होम अॅण्ड लाइफ सोल्युशन्स : थंडगार!
मागील बंद भाव : रु. ३४४
वर्षांतील उच्चांक : रु. ५६०
वर्षांतील नीचांक : रु. ३२०
वर्षांनंतर अपेक्षित भाव : रु. ५२० १९८४
मध्ये एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून या कंपनीची स्थापना करण्यात आली. अॅमट्रेक्स अप्लायन्सेस या नावाने वातानुकूलन यंत्र बाजारात विक्रीसाठी आणले. काळाच्या ओघात कंपनीचे नाव व मालकी बदलत आता २००८ पासून वरील नाव आहे. एक, दोन, तीन दरवाज्यांचे शीतकपाट (Fridge) व वातानुकूल यंत्र ही या कंपनीची उत्पादने आहेत. पहिल्या तिमाहीची विक्री रु. ३७६ कोटी झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत रु. ३२८ कोटी होती. विक्री १४.५६% वाढूनसुद्धा नफ्यात फक्त ३.८% वाढ झाली. बाजारातील नकारात्मक वातावरण व घटलेले रुपयाचे मूल्य यांचा परिणाम नफाक्षमता कमी होण्यात झाली. गेल्या तिमाहीपेक्षा फक्त १% जास्त वातानुकूलन यंत्रे विकली गेली. वर्षअखेर विक्री ८-१०% दरम्यान वाढेल. अर्थव्यवस्था संथपणे रुळावर आली तर याचा सकारात्मक परिणाम नफ्यावर दिसू लागेल.
* ई क्लर्क्ससव्र्हिसेस : दशगुणी विडा
मागील बंद भाव : रु. ८१९
वर्षांतील उच्चांक : रु. ८३०
वर्षांतील नीचांक : रु. ५७०
वर्षांनंतर अपेक्षित भाव : रु. १०००
ई क्लर्क्स सव्र्हिसेस ही माहिती तंत्रज्ञानातील कंपनी. आर्थिक सेवा व विक्री आणि विपणन या दोन प्रकारच्या सेवा ग्राहकांना देते. २००० मध्ये मुंबईत स्थापन झालेली व समभागांची ३१ डिसेंबर २००७ मध्ये शेअर बाजारात नोंदणी केलेली ही कंपनी तशी फारशी माहीत नाही. फक्त एका म्युच्युअल फंडाच्या योजनेने यात गुंतवणूक केली आहे. २०१३ च्या संपूर्ण वर्षांची प्रतिसमभाग मिळकत रु. ७५ असेल. सध्याच्या भावाचे २०१३ च्या प्रतिसमभाग मिळकतीशी गुणोत्तर ९.२३ पट आहे. किमतीचे पुस्तकी किमतीशी गुणोत्तर ४.८७ आहे. गेल्या चार वर्षांत नफा ३५% चक्रवाढ दराने वाढत आहे. हा वाढीचा दर आणखी तीन वर्षे कंपनी गाठू शकेल, यात शंका नाही. माहिती तंत्रज्ञानातील २०१२ ची उभरती कंपनी हा पुरस्कारप्राप्त ई क्लर्क्स सव्र्हिसेसची शिफारस करताना १६ ऑगस्टला रु. ८४४ चा वर्षभरातील सर्वोच्च भाव दाखविल्यावर पुन्हा यापेक्षा वरचा भाव दाखवेल, असा विश्वास असल्यामुळे धाडस करतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा