स्टेट बँकेचा तोटा नेमका कशात?
* एटीएम वापरामुळे होणारा तोटा चिंतेचा विषय असल्याचे स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या अलीकडच्या विधानाने काही प्रश्न उपस्थित होतात. १. एटीएमऐवजी धनादेशाचा रोख काढण्यासाठी येणारा खर्च किती? संबंधित शाखांतील कर्मचाऱ्यांवरील खर्च व त्यांचे ‘मनुष्य तास’ लक्षात तो एटीएमच्या वापरापेक्षा कमी निश्चितच नसेल. दुसरे म्हणजे थकीत कर्जे बुडीत खाती टाकल्यामुळे होणाऱ्या तोटय़ाशी एटीएमच्या वापरामुळे होणाऱ्या तोटय़ाचे प्रमाण किती? अध्यक्षाबाई सोन्याच्य्या शंकांचीही उत्तरे दिली तर आभारी होईन!
– अभय दातार, मुंबई-४

या मनस्तापाला जबाबदार कोण?
* एक निवृत्त केंद्र सरकारचा कर्मचारी या नात्याने सप्टेंबर २०१२ पासून मला दरमहा स्टेट बँकेच्या कल्याण शाखेतील खात्यात पेन्शन येते. परंतु बँक कर्मचाऱ्यांचे अज्ञान इतके की, त्यांना मूळात ‘पेन्शन कम्युटेशन’चा नियम अवगत नसावा किंवा एक सरकारी कर्मचारी या नात्याने कम्युटेड पेन्शनही पूर्णपणे करमुक्त असते हे त्यांच्या पचनी पडलेले नसावे. यातून सामान्य ग्राहकांना नाहक होणाऱ्या मनस्तापाची कुणी दखल घेईल काय?
– जयप्रकाश अहिर, कल्याण (प.)
आपले अभिप्राय आम्हाला कळवा
लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१.
ई-मेल: arthmanas@expressindia.com

Story img Loader