१९६१ म्हणजे सुमारे ५४ वर्षांपूर्वी आयातीला पर्यायी ठरतील अशी उत्पादने घेण्यासाठी बँको प्रॉडक्ट्स (इं.) लि. ही कंपनी स्थापन झाली. भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी तसेच गुणवत्तेसाठी कंपनीने एलिरग क्लिगर, जर्मनी आणि जपान मेटल गास्केट, जपान या विदेशी कंपन्यांशी तांत्रिक सहकार्य करार केले. कंपनीचे बडोदा येथे चार अत्याधुनिक कारखाने असून तेथून वाहनांच्या सुटय़ा भागांचे प्रामुख्याने रेडिएटर्स, एअर कूलर्स आणि गास्केटचे उत्पादन करते. गेल्या ५० वर्षांत कंपनीची उलाढाल ४२० कोटी रुपयांपर्यंत वाढली असून कंपंनीच्या प्रमुख ग्राहकांत अशोक लेलँड, मिहद्र अँड मिहद्र, टाटा मोटर्स, बीईएमएल, रेल्वे, टाफे या भारतीय कंपन्यांखेरीज कॅटरपीलर, जॉन डियर, जेसीबी, मॅसी फग्र्युसन, केस न्यू हॉलंड इ. परदेशी कंपन्यांचादेखील समावेश आहे. भारताखेरीज युरोप आणि अमेरिकेत बाजारपेठ प्रस्थपित करतानाच कंपनीने नेदरलँड्स आणि मॉरिशस येथे कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. यंदाच्या आíथक वर्षांत पहिल्या तिमाहीत कंपनीने नक्त नफ्यात ६२% वाढ दाखवून कंपनीने यंदाच्या आíथक निष्कर्षांची झलक दाखवली आहे. आगामी वर्षांत व्यापार वाहन निर्मात्या कंपन्यांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे. त्याचा बँकोसारख्या कंपन्यांना मोठा फायदा होईल. जवळपास कर्जमुक्त असलेल्या या स्मॉल कॅप कंपनीमधील गुंतवणूक तुम्हाला १२ ते १८ महिन्यांत २५-३०% परतावा देऊ शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा