पर्याय – अ   पर्याय – ब

डॉ. आशीष थत्ते

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
stock market ups downs loksatta
Money Mantra : कधी अप कधी डाऊन ! गुंतवणूकदारांनी करायचं तरी काय ?

काही तरी मिळवण्यासाठी काही तरी गमवावे लागते, असे आपण नेहमी म्हणतो आणि तोच जीवनाचा नियम असतो. सरलेल्या आठवडय़ात खूप सुटय़ा आल्या किंवा पुढेदेखील येतील; पण सुटीच्या काळात आपण काय करायचे याचे नानाविध पर्याय उपलब्ध असतात. म्हणजे एखादा व्यक्ती पुस्तक वाचेल, एखादा खेळ खेळेल किंवा काही जण बाहेर फिरायला जातील म्हणजे वेळ तेवढाच आहे, मात्र पर्याय खूप आहेत. प्रत्येक पर्याय निवडण्याची एक किंमत मोजावी लागते, मग ती पैशात मोजता येणारी किंवा न मोजता येणारीदेखील असते. परवाच एका मित्राने वडिलांना व्हेंटिलेटर लावणार नाही असा पर्याय निवडला, तर एकाने व्हेंटिलेटर लावून तीन दिवस पुढे ढकलले. प्राध्यापकांना असे खूप विद्यार्थी भेटतात जे आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून उच्च शिक्षण करायला येतात, विशेषत: व्यवस्थापनाचे. त्यांना हे कळायला खूप वेळ लागतो की, नक्की त्यांच्या शिक्षणाचा खर्च किती आहे, कारण ते फक्त शैक्षणिक शुल्काचा खर्च गृहीत धरतात; पण सध्याची नोकरी सोडून शिक्षण करणे म्हणजे गमावलेल्या पगाराची किंमतदेखील असते.

अमुक मंत्र्याने बंगल्याच्या नूतनीकरणावर एवढा खर्च केला, असे आपण बऱ्याचदा वर्तमानपत्रातून वाचतो. हे म्हणजे सरकारी पैशांचा पर्यायी परिव्यय असतो. जेव्हा सरकार ताळेबंद मांडते आणि त्यात खर्चाचे विविध उपाय सुचवते. म्हणजेच एखाद्या कामासाठी अधिक निधी दिला जातो, तर एखाद्या कामासाठी कमी निधीची तरतूद करण्यात येते. अगदी शेतकऱ्यालादेखील पेरणीच्या वेळेला कदाचित दोन पर्याय असू शकतात; पण त्यापैकी एक पर्याय स्वीकारून तो एकाच पिकाची लागवड करतो. दुसऱ्या पिकाचा पर्याय नाकारण्यात येतो. नोकरीचे दोन पर्याय असतील तर आपण एकाचीच निवड करतो आणि मग कदाचित दुसरा पर्याय निवडला असता तर असे वाटू लागते. गुंतवणुकीमध्येदेखील असे पर्याय निवडावे लागतात. म्हणूनच आपण तज्ज्ञ अभ्यासकांचे लेख ‘अर्थवृत्तान्त’मध्ये कित्येक वर्षे वाचत आहोत. धिमी लोकल ट्रेन सोडून १० मिनिटांनी येणाऱ्या जलद गाडीमध्ये बसून आधीच्या धिम्या गाडीला कुठल्या तरी स्थानकावर मागे टाकताना मनातल्या मनात ‘टुकटुक’ करण्याचा आनंद म्हणजे संधीचा फायदा असतो.  

म्हणजे खरे तर रोजच्या व्यवहारात परिव्ययापेक्षा संधीची किंमत म्हणणे योग्य ठरते, कारण सगळय़ा गोष्टी आपण पैशात मोजू शकत नाही. प्रत्येक संधीची एक किंमत असते. आपले करिअर निवडण्यापासून ते कोणती लोकल ट्रेन पकडायची याचीदेखील एक संधी असते आणि त्याचे फायदे किंवा किंमत आपण मोजतो. कधी तरी नफ्यात असतो तर कधी तरी तोटय़ात. अगदी जसे कंपन्यांमध्ये प्रत्येक मोठय़ा निर्णयाचा पर्यायी परिव्यय असतो. तेव्हा आपले पर्याय निवडताना सर्व गोष्टींचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा! आणि हो, दर सोमवारी थोडा वेळ काढून ‘अर्थमागील अर्थभान’ हे सदर  नक्की वाचा. हा पर्याय निश्चितच तुमच्या फायद्याचाच ठरेल. 

* लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /

ashishpthatte@gmail.com

@AshishThatte

Story img Loader