आशीष ठाकूर

अर्थव्यवस्थेपासून फारकत घेत वर जाणाऱ्या बाजाराने अर्थसंकल्पाची दखल घ्यावी का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अर्थसंकल्पात पुढील काळासाठी उद्योगांसाठी पूरक काही ठोस घोषणा झाल्या तर बाजाराने गेल्या सप्ताहात गमावलेली पातळी काही अंशी भरून निघेल.

डिसेंबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत चालू असलेली तेजीची आतषबाजी, त्यात समभागांच्या किमतींच्या चमकणाऱ्या तारका हे अगदी काल-परवापर्यंत घडत होतं, पण का कुणास ठाऊक, सरलेल्या सप्ताहात बाजाराचे ग्रह-तारे फिरत, सेन्सेक्सवर चार हजार अंशांची तर निफ्टी निर्देशांकावर अकराशे अंशांची सणसणीत घसरण झाली. चमचमणाऱ्या तारकांचं तेज हरपून, त्यांचे रूपांतर मंद तारकांमध्ये झाले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४६,२८५.७७

निफ्टी : १३,६३४.६०

जेव्हा तेजी ऐन बहरात होती तेव्हा या स्तंभातील १८ जानेवारीच्या ‘पाहिले न मी तुला’ या लेखातील वाक्य होतं.. ‘तेजीच्या कमानीचे पहिले वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १४,७०० असे असेल.’

हे लक्ष्य २१ जानेवारीला दिवसांतर्गत सेन्सेक्सवर ५०,१८४ आणि निफ्टीवर १४,७५३ चा उच्चांक मारत साध्य झालं. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत निर्देशांकांनी आपला महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर, ज्यावर तेजीची कमान आधारलेली होती तो स्तर सेन्सेक्सवर ४७,८०० आणि निफ्टीवर १४,००० चा स्तर तोडल्याने सेन्सेक्सवर चार हजार अंशांची आणि निफ्टी निर्देशांकावर अकराशे अंशांची सणसणीत घसरण झाली. डोळ्यासमोर काजव्यांबरोबरच ‘निरुत्तर नि:प्रश्न!’, ‘रफू की टॉर्न जीन्स’,‘टू बी ऑर नॉट टू बी’,‘आकाश-आभाळ’ या अलीकडच्या लेखांची शीर्षकेदेखील डोळ्यासमोरून चमकून गेली.

अर्थजगतात आज सादर होणारा अर्थसंकल्प हा ‘महत्त्वाचा वळणबिंदू’ असतो. या अनुषंगाने अर्थसंकल्प सादर झाल्यावर बाजाराची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊया.

अर्थसंकल्प भांडवली बाजाराच्या पसंतीस उतरल्यास निर्देशांकावर तेजी अवतरून, त्याची वाटचाल महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरांकडे म्हणजे सेन्सेक्सवर ४७,८०० आणि निफ्टीवर १४,००० च्या दिशेने सुरू होईल. सद्य:स्थितीत निर्देशांक या स्तरांखाली आहेत. अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्सने ४७,८०० आणि निफ्टी निर्देशांकाने १४,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, निर्देशांकांचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४९,२०० ते ४९,९०० आणि निफ्टीवर १४,४५० ते १४,७०० आणि द्वितीय लक्ष्य सेन्सेक्सवर ५०,६०० ते ५१,७०० आणि निफ्टीवर १४,९०० ते १५,२०० असे असेल.

अर्थसंकल्पाकडून दारूण अपेक्षाभंग झाल्यास, अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स ४७,८०० आणि निफ्टी १४,००० चा स्तर तोडतील. नंतर निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४६,८०० ते ४४,०००  आणि निफ्टीवर १३,७०० ते १२,९०० असे असेल.

आता आपण गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांचे  निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊया.

१) कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड

० तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १ फेब्रुवारी

० २९ जानेवारीचा बंद भाव – १२८.१५ रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १२५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १३७ रुपये, द्वितीय लक्ष्य १६० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १०५ रुपयांपर्यंत घसरण.

२) एचडीएफसी लिमिटेड

० तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २ फेब्रुवारी

० २९ जानेवारीचा बंद भाव – २,३७७.७५ रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,४५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,७५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,४५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,२०० रुपयांपर्यंत घसरण.

३) इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड

० तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, ३ फेबुवारी

० २९ जानेवारीचा बंद भाव – १२१.६० रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १२० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १३० रुपये, द्वितीय लक्ष्य १४० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १०० रुपयांपर्यंत घसरण.

४) स्टेट बँक ऑफ इंडिया

० तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, ४ फेब्रुवारी

० २९ जानेवारीचा बंद भाव – २८२.०५ रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३२५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : २७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २५० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader