गेल्या दोन-तीन वर्षांत मंदीचा फटका बसलेल्या काही कंपन्यांपकी ही एक कंपनी. बजाज समूहाची ही ७५ वर्ष जुनी कंपनी आपल्या विविध उत्पादनांमुळे बहुसंख्य वाचकांना परिचित असेल. कंपनीच्या उत्पादनांत प्रामुख्याने पंखे, दिवे, टय़ुबलाइट्स, इस्त्री, गीजर, कूलर, ओव्हन आदी गृहोपयोगी उपकरणांचा समावेश होतो. बजाज आणि मॉरफी रिचर्डस या ब्रँड्स खाली कंपनी आपल्या उत्पादनांची विक्री करते. आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपनीची देशभरात चार लाख विक्री केंद्रे असून पाच हजारांहून जास्त डीलर्स तर २,००० वितरक आहेत. गेली सलग दोन वर्षे तोटा झाल्यावर यंदा पहिल्या तिमाहीत कंपनीने ३०३.२३ कोटीच्या उलाढालीवर १९.३१ कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे. येत्या दोन वर्षांकरिता कंपनीकडे जवळपास ३,२२५ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. या खेरीज सध्या कंपनीच्या एलईडी दिव्यांच्या विक्रीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या घरगुती वापराखेरीज पायाभूत क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, विविध राज्यांतील नगर पालिका सर्वच क्षेत्रांतून एलईडी दिव्यांची मागणी वाढत आहे. यंदाच्या आíथक वर्षांत कंपनीकडून ४,९०० कोटी रुपयांची उलाढाल आणि ११० कोटी रूपयांचा नफा अपेक्षित आहे. सध्या २४० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा टर्न-अराऊंड कंपनीचा शेअर मध्यम कलावधीसाठी खरेदी करावा.
stocksandwealth@gmail.com
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा