ही गोष्ट तशी आताचीच म्हणजे २००३ सालातील. मुंबई शेअर बाजाराचा एकशेचाळीस वर्षांचा कालखंड पाहता बारा वष्रे म्हणजे जास्त दूर नाहीत. तत्कालीन कॅडबरी इंडिया कंपनीला जनतेकडील सर्व शेअर्स खरेदी करून शेअर बाजारातून सूचिबद्धता संपुष्टात आणावयाची होती. २००२ मध्ये प्रत्येकी ५०० रुपयांनी शेअर्स खरेदीची ऑफर भागधारकांना देण्यात आली होती. त्याला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला म्हणून २००३ साली नोंदणी रद्द करण्यापूर्वी पुन्हा ५०० रु. प्रत्येक समभागासाठी देण्याची ऑफर भागधारकांना देण्यात आली. त्या सुमारास बाजारात कंपनीच्या समभागांचे व्यवहार याच किमतीच्या जवळपास होत होते.
त्याच वेळी अचानक काही दुकानदारांकडे कॅडबरीच्या डेअरी मिल्क बारमध्ये अळ्या आढळून आल्या. पूर्वीच्या काळी (२००३ मध्ये) आजच्यासारखे टीव्हीवरील अहोरात्र सुरू राहणारे बिझनेस चॅनल्स भरपूर नव्हते. ही बातमी बिझनेस चॅनलवर दाखवण्याची नसूनसुद्धा एका चॅनलवर तीन दिवस दर दहा मिनिटांनी दाखविली जात होती. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी असा विचार केला नाही की डेअरी मिल्क चॉकलेट बनविताना मिश्रण गरम केले जाते. त्यात अळ्या जिवंत राहू शकत नाहीत. म्हणजे त्या अॅल्युमिनियम फॉईलच्या वेस्टनात घुसल्या कुठून? बरं घुसल्या तर फक्त डेअरी मिल्क मध्येच! अमूल किंवा नेस्लेच्या पाकिटांत किंवा इतर गोळ्या चॉकलेटच्या बरण्यात का घुसल्या नाहीत.
सामान्य जनता असा विचार करीत नाही. लोकांनी बाजारात शेअर्स विकायला सुरुवात केली. भाव कंपनीच्या बायबॅक ऑफरच्या खाली गेले. कंपनीचे साध्य पूर्ण झाले. २००३ साली कंपनीने शेअर्सची नोंदणी बाजारातून रद्द केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा