भारतातील इतर वित्तीय संस्थाच्या तुलनेत तरुण असलेल्या आयडीएफसी लिमिटेडची (इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन) स्थापना ३० जानेवारी १९९७ मध्ये चेन्नई येथे झाली. नावाप्रमाणे स्थापनेचा उद्देश पायाभूत प्रकल्पांना अर्थसहाय्य करणे हाच होता. गेल्या दशकभरापासून आपल्याकडे पायाभूत सुविधांचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आयडीएफसीसारख्या वित्तीय संस्थांमुळे यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. ऊर्जा, रस्ते, बंदरे, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, शेती, आरोग्य निगा, दळणवळण, पर्यटन, इ. अनेक प्रकल्पांसाठी कंपनी अर्थसहाय्य करतेच तसेच सल्ला व वित्तीय व्यवस्थापनही करण्यास मदत करते. गेली काही वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीचे यंदाचे वर्ष आíथक मंदीमुळे कदाचित कठीण असेलही, मात्र पायाभूत सुविधांची वानवा लक्षात घेता पुढील आíथक वर्षांत सरकार पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करेल अशी अपेक्षा आहे. आयडीएफसीचे निकाल अभ्यासले असता कंपनीच्या एकूण उत्पन्नापकी ८३% उत्पन्न हे केवळ पायाभूत प्रकल्पाच्या अर्थसहाय्यातून झालेले दिसते. मार्च २०१३ साठी संपलेल्या आíथक वर्षांकरिता कंपनीने २,५६४ कोटी रुपयांच्या व्याज उत्पन्नावर १,८३६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. यंदाच्या आíथक वर्षांत कंपनीकडून ३,०६३ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न अपेक्षित असून त्यावर २,०८२ कोटी रुपयांचा नक्त नफा ती कमावेल. गेले काही दिवस १२५-१३० रुपयांच्या आसपास असणारा हा शेअर तुम्हाला वर्षभरात १५ % परतावा देऊ शकेल.

शेअरहोिल्डग पॅटर्न (%)

प्रवर्तक    —
परदेशी गुंतवणूकदार    ५२.१९
बँका / म्युच्युअल फंडस्    ३०.६४
सामान्यजन  व इतर    १७.१७

आयडीएफसी लिमिटेड
सद्य बाजारभाव     रु. १२५.६५
प्रमुख व्यवसाय    बिगर बँकिंग वित्तीय सेवा
भरणा झालेले भाग भांडवल     रु. १५१४.९९ कोटी
पुस्तकी मूल्य      रु.  ९०
दर्शनी मूल्य      रु. १०
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)    रु. ११.७
किंमत उत्पन्न गुणोत्तर  (पी/ई)    १०.८ पट
बाजार भांडवल :   रु. २३,१७० कोटी    बीटा : १.६
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक     :     रु. १८५/ रु. १२१

Story img Loader