पोर्टफोलियो
भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज निमिती आणि वितरण कंपनी म्हणून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख करता येईल. १९२९ मध्ये स्थापन झालेली मुंबईकरांची ‘बीएसईएस’ अंबानी समूहाने ताब्यात घेतल्यानंतर तिचे नामांतरण रिलायन्स एनर्जी असे करण्यात आले. नंतर कंपनीचे विस्तारीत आणि विस्तीर्ण कार्यक्षेत्र पाहता तिचे नाव रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर असे बदलण्यात आले.  सध्या रिलायन्स इन्फ्रा तिच्या सहयोगी कंपन्यांसह भारतात सुमारे २००० मेगावॅट विजेची निर्मिती आणि वितरण करीत आहे. मुंबई, दिल्ली, ओरिसा आणि गोवा येथील लाखो ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या या कंपनीची महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि केरळात वीजनिर्मिती केंद्रे आहेत. वीजनिर्मिती आणि वितरणाखेरीज कंपनी रस्ते बांधकाम, विमानतळ उभारणी, सागरी सेतू, सेझ प्रकल्प इ. अनेक पायाभूत क्षेत्रात कार्यरत आहे.
मार्च २०१३ साठी संपलेल्या आíथक वर्षांचे निकाल तितकेसे चांगले नसले तरीही कंपनीच्या नक्त नफ्यात वाढ होऊन तो रु. २,२४७ कोटीवर गेला आहे ( गेल्या आíथक वर्षांत रु. १,५८७ कोटी). कंपंनीच्या सध्या चालू असलेल्या ११ रस्ते प्रकल्पांपकी आठ प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून दोन प्रकल्प यंदाच्या आíथक वर्षांत पूर्ण होतील. महत्त्वाकांक्षी अशा मुंबईतील मेट्रो रेल प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाली आहेच. सध्या पुस्तकी मूल्यापेक्षाही कमी भावात उपलब्ध असलेला हा शेअर मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक योग्य वाटतो. अर्थात या शेअरचे बीटा मूल्य जास्त असल्याने गुंतवणुकीतील धोकाही लक्षात ठेवून खरेदी करा.

Story img Loader