ऊर्जा क्षेत्र विकसनशील देशांसाठी खूप महत्त्वाचे असूनही गेली दोन वष्रे विजेची निर्मिती आणि विजेचे वितरण करणाऱ्या कंपन्यांना मात्र फारच वाईट गेली आहेत. अनेक म्युच्युअल फंड्स आणि सामान्य गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक करून हात पोळून घेतले आहेत. गंमत म्हणजे ऊर्जेची प्रचंड गरज असतानाही खाण घोटाळा, कोळशाचा तुटवडा, पर्यावरणाचे प्रश्न इ. अनेक कारणांमुळे वीज निर्मितीत उतरलेले अनेक मोठे उद्योगसमूह अजूनही प्रत्यक्षात निर्मिती करू शकलेले नाहीत. विजेच्या दरांवरील नियंत्रण, कर्जाचे डोंगर आणि त्यात वाढते व्याजदर यामुळे अनेक प्रकल्प नुकसानीत आहेत. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी) ही मूलत: ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना आíथक सहाय्य करण्यासाठी स्थापन केलेली सरकारी कंपनी आहे. एकंदरीत गेली दोन वष्रे ऊर्जाक्षेत्रासाठी चांगली नसल्यामुळे त्याचा थेट परिणाम पीएफसीच्या आर्थिक कामगिरीवरही झाला. मात्र १२व्या पंचवार्षकि योजनेनुसार ऊर्जाक्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता प्रचंड गुंतवणूक (सुमारे ११ लाख कोटी रुपये) अपेक्षित आहे. देशातील ऊर्जा क्षेत्रातील एकूण कर्ज वितरणापकी २०% हिस्सा पीएफसीचा आहे. गेल्या चार वर्षांत कंपनीच्या कर्ज वाटपात सरासरी  वार्षकि २६% वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीत करमुक्त रोख्यांद्वारे कंपनीने १,११० कोटी उभारले तर परदेशातून कर्ज-उभारणीद्वारे (ईसीबी) १,३७५ कोटींचा निधी मिळविला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही करमुक्त रोख्यांद्वारे कर्ज उभारणे शक्य असल्याने स्वस्त दरात कर्ज मिळविण्याची कंपनीची क्षमता वाढली आहे. येत्या दोन वर्षांत कर्ज वाटपात २०% वाढ अपेक्षित असून उतरत्या व्याजदरांचा फायदा कंपनीला होईल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत ९९% कर्जवसुलीचा इतिहास असलेल्या पीएफसीचे अनुत्पादक कर्ज (एनपीए) अवघे ०.९२% आहे. दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी पीएफसीमधील गुंतवणूक आकर्षक वाटते.
   पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लि.
प्रवर्तक                 भारत सरकार
सद्य बाजारभाव             रु. १९०
प्रमुख व्यवसाय            ऊर्जा प्रकल्पांना वित्त
भरणा झालेले भाग भांडवल         रु. १३२०.०२ कोटी
पुस्तकी मूल्य :  रु.  १५६.९           दर्शनी मूल्य : रु. १०/-
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)        रु. २९.९
प्राइस अìनग गुणोत्तर    (पी/ई)        ६.३६ पट
मार्केट कॅपिटल : रु. २४६८४  कोटी    बीटा : १.६
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक     :     रु. २२७/ रु. १३९

शेअरहोिल्डग पॅटर्न (%)
 
प्रवर्तक    ५०.०९
परदेशी गुंतवणूकदार    १०.८०       
बँका / म्युच्युअल फंडस्    ८.९०
सामान्यजन  व इतर    ३०.२१

Story img Loader