|| आशीष ठाकूर
गेल्या लेखात नमूद केलेल्या, निफ्टी निर्देशांकावरील १७,७९४ च्या उच्चांकापासून १७,३५० ते १७,२०० पर्यंतच्या हलक्या-फुलक्या घसरणीचे प्रत्यक्षात १७,०५० च्या मंदीच्या दाहकतेत रूपांतर झाल्याने ‘हे मंदीचे दिस कधी जातील?’ हा प्रश्न गु्ंतवणूकदारांना निश्चितच पडला असणार. याच स्तरावरून सुधारणा झाल्याने, मंदीचे दिस जातील, तेजीचे दिस येतील असे वाटत असतानाच, पुन्हा सप्ताहातील शेवटच्या दिवसाच्या म्हणजे शुक्रवारच्या व्यवहाराने ‘मंदीचे दिस’ दाखविले. मंदीचे दिस जातील, तेजीचे दिस आज ना उद्या येतीलच, पण आता चालू असलेल्या जीवघेण्या उलथापालथीचा भोग कधी सरेल हाच काय तो कळीचा प्रश्न? या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स: ५८,१५२.९२
निफ्टी: १७,३७४.७५
येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकांनी १७,००० चा स्तर सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य १७,६०० ते १७,८०० आणि त्या नंतरचे लक्ष्य हे १८,१०० ते १८,३०० असे असेल.
येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकावर १७,६०० ते १७,८०० च्या स्तराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आताच्या घडीला या स्तरावर १०० दिवसांची चलत सरासरी ही १७,६४३ आहे. तसेच १९ ऑक्टोबरच्या निफ्टी निर्देशांकाच्या १८,६०० चा उच्चांक आणि २० डिसेंबर २०२१ चा १६,४१० चा नीचांक गृहीत धरत, या नीचांकापासून सुधारणेचा ‘फेबुनाचीचा .६१८ टक्के’ स्तर हा १७,७७० आहे. अपेक्षित असलेल्या सुधारणेत निफ्टी निर्देशांकाने १७,६०० ते १७,८०० स्तर पार करत, सातत्याने या स्तरावर १५ दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १८,१०० ते १८,३०० असेल. अन्यथा निफ्टी निर्देशांकावरील १७,६०० ते १७,८०० चा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक वारंवार अपयशी ठरत असल्यास आणि त्यात निफ्टी निर्देशांकाने १७,००० चा स्तर तोडल्यास, पुन्हा मंदीचे दिस येतील. या घसरणीच्या स्थितीत निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे १६,४०० ते १५,५५० असे असेल.
निकालपूर्व विश्लेषण
१) कोल इंडिया लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार,१४ फेब्रुवारी
११ फेब्रुवारीचा बंद भाव – १६६.५५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १६२ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १६२ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १७४ रुपये, द्वितीय लक्ष्य १८१ रुपये.
ब) निराशादायक निकाल : १६२ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १५५ रुपयांपर्यंत घसरण
२) आयशर मोटर्स लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १४ फेब्रुवारी
११ फेब्रुवारीचा बंद भाव – २,५९६.५५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,६०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,६०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,७५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,९०० रुपये
ब) निराशादायक निकाल : २,६०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,४५० रुपयांपर्यंत घसरण
३) ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १४ फेब्रुवारी
११ फेब्रुवारीचा बंद भाव – १,७१०.३० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,७०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,७०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,९०० रुपये
ब) निराशादायक निकाल : १,७०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,५५० रुपयांपर्यंत घसरण.
४) एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार,१४ फेब्रुवारी
११ फेब्रुवारीचा बंद भाव- ४४.८० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर- ४६ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४६ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४८ रुपये, द्वितीय लक्ष्य ५३ रुपये
ब) निराशादायक निकाल : ४६ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ४० रुपयांपर्यंत घसरण.
५) एनएलसी(नेव्हेली लिग्नाइट) लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार,१४ फेब्रुवारी
११ फेब्रुवारीचा बंद भाव- ७५.६५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर झ्र् ७३ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७३ रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ८० रुपये,द्वितीय लक्ष्य ९० रुपये. ब) निराशादायक निकाल : ७३ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ६४ रुपयांपर्यंत घसरण.
६) अंबुजा सिमेंट लिमिटेड.
तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार,१७ फेब्रुवारी
११ फेब्रुवारीचा बंद भाव- ३६७.८५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३७७ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३७७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३९० रुपये, द्वितीय लक्ष्य ४१० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ३७७ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३४९ रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.