संबंधित ब्रोकरेजेस अर्थात दलाल पेढय़ांच्या खालील शिफारसींचे विस्तृत विश्लेषण त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, गुंतवणूकदारांनी खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी ते अभ्यासणे उपयुक्त ठरेल.
नव्या २०६९ संवत्सराच्या मुहूर्तावर निवडक समभाग खरेदी करून आपली आगामी गुंतवणूक वाटचाल कायम राखता येईल, अशी मार्गदर्शनपर शिफारस नामांकित दलाल पेढय़ांनी केली आहे. यामध्ये बँक, बांधकाम, औषध, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना काहीसे झुकते मापही देण्यात आले आहे. आयसीआयसी बँक, अॅक्सिस बँक, स्टेट बँक यासारख्या खाजगी/राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच आयडीएफसी, एल अॅण्ट टी हाऊसिंग फायनान्स, एलआयसी हाऊसिंग फायनान्स या गृहवित्त क्षेत्रातील समभागांकडेही आगामी काळात फायद्याचे समभाग म्हणून पाहता येईल. तर सन फार्मा, सिप्ला, ग्लेनमार्क, डॉ. रेड्डीज् यासारख्या औषध निर्मिती कंपन्यांच्या समभागांचीही खरेदी करण्याची संधी यंदा दडवू नये, असे हा अभ्यास ठामपणे सुचवीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा