गेली साठ वर्ष औषधी क्षेत्रात कार्यरत असलेली कॅडिला ही भारतातील पाच मोठय़ा औषधी कंपन्यांपकी एक गणली जाते. एकूण उलाढालीपकी सुमारे ७% हून अधिक रक्कम संशोधनावर खर्च करणाऱ्या या कंपनीचे जगभरात १५,००० पेक्षा अधिक कर्मचारी असून, ९५०हून अधिक पेटंट्स तर देशांतर्गत ३०० टॉप ब्रॅण्ड्सपकी २० ब्रॅण्ड्स कॅडिलाचे आहेत. गेल्या १६ वर्षांत कंपनीने विक्रीत २५ पटीने वाढ सध्या केली असून गेल्या आíथक वर्षांत कंपनीने ३,६७६ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली आहे. गेल्या वर्षी कंपनीची कामगिरी तितकीशी आकर्षक नसली तरीही यंदा मात्र कंपनीने उत्तम कामगिरी करून सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे.
३० सप्टेंबर २०१३ रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी कंपनीने विक्रीत २०% वाढ नोंदवून ती ८४० कोटींवर तर नक्त नफ्यातही ८२% वाढ साध्य करून तो १५१.८० कोटींवर नेला आहे. यंदा आíथक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ४० हून अधिक नवीन उत्पादने बाजारात आणली असून त्यापकी नऊ भारतात पहिल्यांदाच प्रस्तुत केली आहेत. त्यापकी ‘लिपाग्लीन’ हे भारतात तयार केलेले औषधी कंपनीचे असे पहिलेच उत्पादन आहे. अमेरिकेतही पहिल्या दहा कंपन्यांत मनाचे स्थान पटकावणारी कॅडिला आता ब्राझील मध्येही पहिल्या १५ मोठय़ा कंपन्यांपकी एक गणली जाईल. भारतातील चार उत्पादन केंद्रांना अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची (यूएस-एफडीए) मान्यता असून जगभरातील बायर, अ‍ॅबट, बोहरिंगर आणि मदौस इ. अनेक मान्यवर औषधी कंपन्यांबरोबर कॅडिला भागीदार म्हणून काम करीत आहे. येती दोन वष्रे कंपनीकडून उत्तम कामगिरी अपेक्षित असून कायम पोर्टफोलिओत ठेवावा असा हा शेअर संधी मिळेल तसा खरेदी करीत राहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा