* मी सरकारी विभागातील नोकरीतून निवृत्त झालो आहे. मला रु. ४०,००० मासिक निवृत्तिवेतन मिळते. याशिवाय मला रु. २,४०,००० व्याज मिळते. माझे वय ५८ आहे. माझे करपात्र उत्पन्न रु. १,८०,००० (रु. २,४०,००० + रु. ४०,००० वजा रु. १,००,००० (८०क) वजावट) इतके आहे. मी बँकेला फॉर्म १५जी देऊ शकतो का?
– अरिवद भाटवडेकर
प्राप्तिकर कायद्यानुसार आपण बँकेला १५जी देऊ शकत नाही. कारण आपले व्याजावर मिळणारे उत्पन्न हे रु. २ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला बँकेने कापलेला उद्गम कर (TDS) हा विवरणपत्र भरून परत (Refund) मिळवावा लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
* मी सध्या ज्या घरात राहतो ते घर माझ्या नावावर आहे. या घरासाठी मी ३ लाख रुपये कर्ज घेतले आहे. मी जून २०१३ मध्ये माझ्या व पत्नीच्या नावाने दुसरे घर विकत घेतले. त्यासाठी मी रु. २४ लाखांचे गृहकर्ज घेतले आहे. आम्ही दोघेही सरकारी नोकरीत आहोत. या घराचे हप्ते पत्नीच्या बँक खात्यातून भरले जातात. बँक परतफेडीसाठी एकच प्रमाणपत्र देते. मला गृहकर्जासाठी घेतलेल्या व्याजावर व मुद्दल रकमेवर प्राप्तिकर सवलत मिळेल का?
– सुगम आंबेकर
आपल्या नावावर दोन घरे आहेत. एक आपण जे राहता ते आणि दुसरे आपण संयुक्त नावावर घेतलेले. पहिले घर हे पूर्णत: आपल्या नावावर आहे व त्यावर आपल्याला पूर्ण प्राप्तिकर सवलत मिळते. जे घर संयुक्त नावावर आहे त्यावर तुमचा हिस्सा (उदा. ५०%) जेवढा असेल तेवढी प्राप्तिकर सवलत आपण घेऊ शकता. दोन्हीपकी एक घर आपल्याला ‘सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी’ (SOP) म्हणून घोषित करता येईल. त्याचे उत्पन्न शून्य समजून त्या घराच्या कर्जावरील भरलेले व्याज रु. १,५०,००० वार्षिक मर्यादेपर्यंत वजा करता येईल. समजा आपण राहते घर जर SOP म्हणून घोषित केले तर दुसऱ्या घरावर आपल्याला घरभाडय़ाच्या ५०% घरभाडे (जर घर भाडय़ाने दिले असते तर जेवढे भाडे मिळाले असते तेवढे) उत्पन्न म्हणून दाखवावे लागेल आणि त्यावर मालमत्ता कर, ३०% प्रमाणित वजावट व गृहकर्जावर भरलेले व्याज (या सर्वाचा ५०% वाटा) आपल्या घरभाडे उत्पन्नातून वजा होऊन जी रक्कम शिल्लक राहील (धन किंवा ऋण) ती आपल्या करपात्र उत्पन्नात गणली जाईल. बँकेकडून मिळालेल्या प्रमाणपत्रानुसार एकूण व्याज, मुदलीच्या ५०% रक्कम तुम्हाला प्राप्तिकर वजावटीसाठी विचारात घेता येईल.
* मी एक शिक्षक आहे. मला माझ्या आईच्या ‘बायपास’ शस्त्रक्रियेसाठी रु. ४,२६,००० मालकाकडून मिळाले. ते करपात्र आहेत का?
– सुभाष बिरांजे
प्राप्तिकर कायद्यानुसार स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या भरपाईवर कमाल १५,००० रुपयांपर्यंत सूट मिळते. परंतू प्राप्तिकर नियम ३अ प्रमाणे प्रमाणित इस्पितळात घेतलेल्या निर्धारित रोगांवर केलेला खर्च उत्पन्नामध्ये गणला जात नाही. या रोगांमध्ये कर्करोग, क्षयरोग, एड्स, हृदयरोग, रक्ताचे रोग, हाडांचे रोग, नाक, कान, घसा यांचे रोग, स्त्रीरोग इत्यादींचा समावेश होतो. जर आपण प्राप्तिकर खात्याच्या प्रमाणित इस्पितळात आईची शस्त्रक्रिया केली असेल आणि त्याची भरपाई मालकाकडून मिळाली असेल तर ती करपात्र उत्पन्नात गणली जात नाही.
* मला २०१३-१४ मध्ये २००४-०५ ते २०१३-१४ या वर्षांसाठी वेतन थकबाकी मिळाली. हे उत्पन्न या वर्षी मिळाले आहे. वरील कालावधीमध्ये माझे करपात्र उत्पन्न हे १०% कर-आकारणी टप्प्यात (Slab) होते. आता थकबाकी मिळाल्यामुळे माझे उत्पन्न ३०% कर टप्प्यात गेले आहे. मला त्यामुळे खूपच जास्त कर भरावा लागत आहे. यावर काही सवलत आहे का?
– सुलभा रत्नाकर
तुम्हाला प्राप्तिकर कलम ८९ (१) प्रमाणे प्राप्तिकर सवलत मिळू शकते. त्यासाठी फॉर्म १०ई भरावा लागतो. ही सवलत मोजण्यासाठी, हे थकीत वेतन (Arrears) तुम्हाला मागील वर्षांमध्ये मिळाले असते तर त्यावर किती वाढीव कर भरावा लागला असता आणि ज्या वर्षी ते मिळाले आहे त्या वर्षी किती वाढीव कर भरावा लागत आहे त्याच्या फरकाइतकी करसवलत मिळू शकते. ही सवलत मोजण्यासाठी ज्या वर्षांसाठी तुम्हाला थकीत वेतन मिळाले आहे त्या वर्षीच्या उत्पन्नांत ही रक्कम मिसळून त्या वर्षीचा कर काढावा आणि आपणाला आलेला त्या वर्षीचा देयकर (थकबाकी सोडून) यामधील फरक काढावा. हा फरक प्रत्येक वर्षांसाठी म्हणजेच २००४-०५ ते २०१२-१३ या वर्षांसाठी येणाऱ्या बेरजेतून वजा करावा.
* मी २००९ मध्ये एका सूचिबद्ध कंपनीच्या ५०० समभागांमध्ये रु. १ लाख गुंतवणूक केली होती. जुल २०१३ मध्ये मला २०० शेअर्स बोनस मिळाले. यातील ६०० शेअर्स मी जानेवारी २०१४ मध्ये विकले. मला यावर कर भरावा लागेल का?
– नेहा देशपांडे
तुम्ही विकलेल्या ६०० शेअर्सपकी ५०० शेअर्स हे दीर्घ मुदतीच्या नफ्याअंतर्गत गणले जातात. त्यावर रोखे विनिमय कर (STT) भरला असेल तर प्राप्तिकर भरावा लागणार नाही. जे १०० शेअर्स बोनस मिळालेले आहेत ते एक वर्ष मुदतीपेक्षा कमी वेळेत विकत असल्यामुळे त्यावर झालेला नफा हा अल्प मुदतीचा असल्यामुळे, त्यावर १५% (+३% शैक्षणिक अधिभार) कर भरावा लागेल. बोनस शेअर्ससाठी काही खर्च न केल्यामुळे विक्री रक्कम हीच नफा म्हणून गणली जाईल.
* मी एक पगारदार नोकर आहे. १९९२ मध्ये मी एका दुकानामध्ये रु. ४ लाख गुंतवणूक केली होती. ते दुकान मी भाडय़ाने दिले होते. या वर्षी हे दुकान मी रु. ७० लाखाला विकले. यावर झालेल्या नफ्यावर मला किती कर भरावा लागेल आणि कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत का?
– चिन्मय
प्रथम आपल्याला दीर्घ मुदतीचा नफा झाला आहे. तो मोजताना Cost Inflation Index प्रमाणे खरेदी मूल्य काढावे लागेल. हे मूल्य तुम्हाला मिळालेल्या विक्री किमतीतून वजा केल्यानंतर येणारी रक्कम ही करपात्र ठरेल. दीर्घ मुदतीचा नफा असेल तर त्यावर २०% (अधिक ३% शैक्षणिक अधिभार) इतका कर भरावा लागेल.
हा कर वाचवायचा असेल तर दोन पर्याय आहेत. १) तुम्हाला मिळालेली विक्री रक्कम घरामध्ये गुंतवू शकता. यासाठी काही अटी आहेत. नवीन घरामधील गुंतवणूक ही दुकान विक्रीच्या एक वर्ष आधी किंवा विक्रीनंतरच्या दोन वर्षांमध्ये (जर विकत घेतले तर) किंवा तीन वर्षांमध्ये (जर घर बांधले तर) केली पाहिजे. तुम्ही जे घर विकत घेत आहात त्याव्यतिरिक्त फक्त एकच घर असावे. एक वर्षांच्या आत आपण अजून एक घर विकत घेऊ शकत नाही किंवा तीन वर्षांच्या आत अजून दुसरे घर बांधू शकत नाही.
२) आपण कलम ५४ ई सी प्रमाणे नफ्याची गुंतवणूक रोख्यांमध्ये (शेअर्स, डिबेंचर्स, बाँड्स वगैरे) केली तर (मर्यादा रु. ५० लाख) त्या नफ्यावर कर भरावा लागत नाही.