‘देत नाही जा’ अशी भूमिका घेतल्यास अशा कर्जदाराची ‘सिबिल’कडून कर्जबुडव्यांमध्ये गणना होते आणि भविष्यात कोणतीही बँक त्यांना कर्ज देत नाही. आपल्या जीवनात घर, लग्न, मुलांची शिक्षणे, नवीन उद्योग व्यापार, आजारपण या व अशा अनेक कारणांकरिता कर्ज घेण्याची गरज पडू शकते. त्यामुळे सर्व बँकांचे दरवाजे तुम्हाला बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्या. विशेषत: क्रेडिट कार्ड घेतले असल्यास त्याचा जबाबदारीने वापर करा…
क्रेडिट कार्ड आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. एकेकाळी चनीची वस्तू समजली जाणारी ही वस्तू आता ऑनलाईन शॉिपग किंवा वीज-फोनची बिले भरण्यासाठी सहजच वापरली जाते. मध्यमवर्गासाठी क्रेडिट कार्डाशिवाय जीवन जगणे कठीण होईल अशी परिस्थिती आहे.
क्रेडिट कार्ड आपल्याबरोबर जसे अनेक फायदे आणतात तसेच काही तोटेही आणतात. क्रेडिट कार्डावरील वापरलेली रक्कम महिना अखेरीस वेळेवर भरली नाही तर दंड भरावा लागतोच पण त्याचबरोबर व्याजापोटीही पसे भरावे लागतात. व्याजाचे दर वर्षांला ३६ ते ४२% इतके असतात. क्रेडिट कार्डाचा बेजबाबदारपणे वापर केल्याने अनेक जण कर्जाच्या गत्रेत खोलवर अडकल्याची उदाहरणे आहेत. या मंडळींच्या अधोगतीला क्रेडिट कार्ड जबाबदार नसून ते स्वतच जबाबदार आहेत.
पूर्वी या वर्गातील काही कर्जदार बँकांना व क्रेडिट कार्ड कंपन्यांना न जुमानता पसेच भरत नसत. बँकाही कायदेशीर नोटीसा पाठवून व काही वेळा वसूली प्रतिनीधी पाठवून पसे वसूल करण्याचा प्रयत्न करीत. पण ही मंडळी बधत नसत. अशा वेळी बँका या मंडळींचा नाद सोडून देत. अर्थात या मंडळींची ‘कर्जबुडवे’ म्हणून नोंदही करून ठेवत असत. ‘क्रेडिट इन्फॉम्रेशन ब्युरो ऑफ इंडिया (सिबिल)’च्या स्थापनेनंतर आता अशा कर्जबुडव्यांच्याच सर्व प्रकारच्या कर्जदारांच्या कामगिरीच्या रीतसर नोंदी होऊ लागल्या आहेत. प्रत्येक बँक कर्ज देताना ‘सिबिल’कडे विचारणा करते. त्यामुळे अशा कर्जबुडव्या व्यक्तींना बँकांचे आता कर्ज मिळणेही दुरापास्त झाले आहे. क्रेडिट कार्डाचा बेजबाबदारपणे वापर केल्याने कर्जाचा डोंगर ओढवून घेतलेल्या व्यक्तींनी चुकूनही ‘देत नाही जा’ अशी भूमिका घेऊ नये. अशी भूमिका घेतल्यास त्या कर्जदाराची कर्जबुडव्यांमध्ये गणना होते आणि भविष्यात कोणतीही बँक कर्ज देत नाही. आपल्या जीवनात घर, लग्न, मुलांची शिक्षणे, नवीन उद्योग व्यापार, आजारपण या व अशा अनेक कारणांकरिता कर्ज घेण्याची गरज पडू शकते. त्यामुळे सर्व बँकांचे दरवाजे तुम्हाला बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्या.
क्रेडिट कार्डाच्या कर्जाच्या विळख्यातून सुटण्याचे काही मार्ग आहेत. सर्वप्रथम ज्या बँकेची क्रेडिट कार्डे वापरता त्यांना झाल्या प्रकाराची कल्पना द्या. अशावेळी एखादी बँक सहजच तुम्हाला ‘पर्सनल लोन’ ऑफर करते. पर्सनल लोनच्या पशातून तुम्ही तुमच्या सर्व कार्डाची रक्कम भरा व हे पर्सनल लोन तीन वर्षांत सुलभ हप्त्यात फेडून टाका. पर्सनल लोनचा व्याजाचा दर १६ते २२% असतो. क्रेडिट कार्डाच्या तुलनेत पर्सनल लोन नेहमीच परवडते. यामध्ये कर्जदाराला दोन मार्गानी लाभ होतो. पहिला त्याच्यावर ’कर्जबुडवा’ असा ठप्पा बसत नाही. त्यामुळे भविष्यात परिस्थिती सुधारल्यावर घर-वाहन खरेदी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव बँका कर्ज नाकारत नाहीत. दुसरा फायदा म्हणजे कर्जदाराचा ‘सिबिल रिपोर्ट’ सुधारतो. क्रेडिट कार्डाच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्ती वेळेवर क्रेडिट कार्डाची बिले भरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा ‘क्रेडिट स्कोअर’ कमी होतो. पर्सनल लोन घेऊन क्रेडिट कार्डाची बिले एकदाची चुकती केली की क्रेडिट स्कोअर हळूहळू सुधारू लागतो. पर्सनल लोनची वेळेवर परतफेड केल्यास क्रेडिट स्कोअर सुधारतो व एकेकाळी अत्यंत वाईट कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींनाही बँका हळूहळू कर्ज देण्याचा विचार करू शकतात.
’लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी’हा आणखी एक मार्ग अशा कर्जदारांकडे आहे. स्वतच्या मालकीचे घर किंवा दुकान गाळा असेल तर अशा मालमत्तेवर कर्ज मिळू शकते. मालमत्तेच्या ५०% मूल्याइतके कर्ज साधारणत दिले जाते. या कर्जाची मुदत १५वर्षांपर्यंत असू शकते. कर्जाचा व्याजदर ११.५ ते १२.५% असा असतो. कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा हा त्यातल्यात्यात एक स्वस्त मार्ग आहे. घर-दुकान याचप्रमाणे सोने व अन्य गुंतवणूकांच्या बदल्यात (जसे शेअर्स, बाँड्स, तसेच नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स व म्युच्युअल फंड्स) कर्ज मिळू शकते. बँका पर्सनल लोन (तारणविरहीत लोन) पेक्षा तारणावर कर्ज देण्यास (घर,दुकान, सोने यावरील कर्ज) अधिक उत्सुक असतात. कर्जदाराने कर्जाचा हप्ता वेळेवर न भरल्यास बँका मालमत्ता विकून स्वतच्या पशांची वसुली करू शकतात. बँकांचे हितसंबंध तारण कर्जामध्ये जपले जातात त्यामुळे अशा कर्जावरील व्याजदर पर्सनल लोन वरील व्याजदरापेक्षा निश्चितच कमी असतात. पर्सनल लोनची मुदत तीन वष्रेच असते तर तारणबद्ध कर्जे, विशेषत घर व दुकानावर घेतलेले कर्ज दीर्घ मुदतीचे (१५ वर्षांपर्यंत) मिळू शकते. खोलवर कर्जात बुडालेल्या व्यक्ती तीन वर्षांत कर्ज फेडू शकतीलच असे नाही. अशा मंडळींसाठी पाच ते सात वष्रे पुरेशी असावीत.
तारणबद्ध कर्जाचा वापर करून किंवा पर्सनल लोनचा वापर करून क्रेडिट कार्डाच्या कर्जातून बाहेर पडावे. क्रेडिट कार्ड ही केवळ एक सोय आहे. त्यामुळे आपली गरसोय होऊ नये यासाठी आर्थिक शिस्त अंगी बाणवावीच लागेल.
(लेखक आर्थिक साक्षरतेसाठी कार्यरत ‘क्रेडिटविद्या डॉट कॉम’चे संस्थापक-संचालक आहेत)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा