पुन्हा ८ टक्क्यांनी गृहकर्ज मिळण्याचे दिवस दूर नाहीत!
देशाच्या गृहवित्त क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे सर्वात स्वस्त कर्जाचे व्याजदर हे आजवरचे ठळक वैशिष्टय़ राहिले आहे. याच जोरावर आगामी काळासाठी २५ टक्के व्यवसायवृद्धीचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचे सह-व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार हुडा यांनी सांगितले, किंबहुना गृहकर्जाचे व्याजदर आठ टक्क्य़ांपर्यंत खालावण्याचे दिवस लवकरच येतील, असा त्यांचा विश्वास आहे.
* गृहनिर्माण उद्योगात मंदीची स्थिती आहे. मुंबईत विक्री न झालेल्या घरांची संख्या मोठी आहे, मात्र गृहवित्त कंपनी म्हणून तुमच्या व्यावसायिक प्रगतीचा आलेख खूप उंच आणि कोणतीही मरगळ न दाखविणारा कसा?
– गृहनिर्माणात जी मंदी आहे म्हटली जाते ती महागडय़ा मालमत्तांबाबत खरी असेल; पण आम्ही लक्ष्य केलेला ग्राहक वर्ग हा २० ते २५ लाख किमतीची घरे घेऊ इच्छिणाऱ्यांचा आहे. मागणीतील मंदीचा संबंध या प्रकारच्या घरांबाबत नक्कीच नाही. संपूर्ण देशभरात ५० लाख रुपये किमतीपर्यंतच्या घरांना आजही मोठी मागणी आहे. एकूण गृहवित्त उद्योगच यामुळे १६-१७ टक्के दराने प्रगती करीत आहे. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने सरासरीपेक्षा २० टक्क्यांचा वृद्धिदर कायम राखला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा