जागुष्टे कुटुंबातील संदीप व मीनल हे दोघेही मुळचे रत्नागिरीचे. संदीप हे मधल्या आळीतील तर मीनल यांचे माहेर वरच्या आळीत. सध्या जागुष्टे कुटुंबाचे वास्तव्य पुण्यातील कर्वेनगर भागात असते. जागुष्टे कुटुंबात संदीप (३८) मीनल (३८) ओवी (१२) व आर्या (७) असे चारजण आहेत.
संदीप हे कॉलेज ऑफ इंजीनीअिरग, पुणे या संस्थेचे धातूशास्त्र विषयातील पदवीधारक असून आयआयटी दिल्लीचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. ते लघुउद्योजक आहेत व वाहन उत्पादकांना गंज विरोधक लेपन केलेले सुटे भाग पुरविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. घरची उद्योगाची पाश्र्वभूमी नसताना देखील कष्टाने ज्यांनी या उद्योगाचा जम बसविला आहे. मीनल या गृहिणी आहेत व ओवी व आर्या शिक्षण घेत आहेत. संदीप यांचा व्यवसाय भागीदारीत असून भविष्यात त्यांना सध्याच्या भागीदारी व्यवसायाचे येत्या दोन वर्षांत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रुपांतर करण्याची योजना आहे.
जागुष्टे कुटुंबाच्या सध्याच्या आíथक ढाच्यात अनेक त्रुटी जाणवल्या. या त्रुटी केवळ जागुष्टे कुटुंबाच्या नियोजनात दिसल्या नाहीत तर अनेक व्यावसायिकांच्या बाबतीत दिसतात. या पकी पहिली त्रुटी म्हणजे संदीप यांच्याकडे मोठे विमा छत्र नसणे. संदीप हे स्वत:चे वेतन स्वत:चा ठरवत असल्याने व आयकर वाचविण्यासाठी अकार्यक्षम का होईना पण नोकरीपेशातील मंडळी जशी नियोजन करतात तसे संदीप यांनी केलेले नाही. साहजिकच संदीप यांनी तातडीने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. संदीप यांचे उत्पन्न नोकरीपेशातील व्यक्तीपेक्षा वेगाने वाढणार असल्याने स्थिर विमा हप्त्यात दरवर्षी वाढ होणारे विमाछत्र देणारी पॉलिसी (Increasing Risk Cover Policy) खरेदी करणे योग्य आहे. एसबीआय लाईफची ‘ई शिल्ड’ व बिर्ला सनलाईफची ‘प्रोटेक्टर प्लस’ या पकी एकाची निवड करावी. बिर्ला सनलाईफच्या पॉलिसीत दरवर्षी पाच टक्के व दहा टक्के विमाछत्र वाढू शकणारे पर्याय उपलब्ध आहेत तर एसबीआय लाईफच्या पॉलीसीत दर पाच वर्षांनी विमाछत्रात दहा टक्के वाढ होते. दोन्ही कंपनींच्या विमा प्रतिनिधींकडून पॉलिसीचे सादरीकरण मागवून ७५ लाख किंवा एक कोटी विमाछत्राने सुरवात होऊन मुदतपूर्तीवेळी पुढील २० वर्षांत अडीच कोटी विमा छत्र उपलब्ध असेल अशी विमा पॉलिसी खरेदी करावी. तसेच सध्या आपल्याकडे असलेले आरोग्य विमाछत्र अतिशय अपुरे आहे. आपले उत्पन्न पाहता (जागुष्टे कुटुंबाने मागील पाच वर्षांत तीन परदेश सहली केल्या.) आपल्याला कमीतकमी २० लाखाच्या विमा छत्राची जरुरी आहे. त्याचाही आपण विचार करावा.
जागुष्टे कुटुंबांकडे मोठी रोकड सुलभता आहे. त्यांची मीनल यांनी दिलेल्या तपशिलानुसार ९५ टक्के गुंतवणूक पीपीएफ, बँक व पोस्टाच्या मुदत ठेवी पोस्टाची मासिक उत्पन्न योजना व एलआयसीचे एन्डोंमेंट प्रकारच्या योजना यामध्ये आहे. केवळ पाच टक्के गुंतवणूक समभाग गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंड योजनातून केली आहे. केवळ जागुष्टे कुटुंबच नव्हे तर अशी अनेक कुटुंबे पाहण्यात आहेत ज्यांना शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक विषसमान वाटते. समभाग सदृश्य गुंतवणुकीचे महत्व अनेकांना कळत नाही. यासाठी सोबत एक कोष्टक देत आहे. तीन वष्रे पाच वष्रे दहा वष्रे व वीस वष्रे या कालावधीत म्युच्युअल फंडांच्या ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’ किंवा ‘सिप’ प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याच्या दर दर्शविणारा हे कोष्टक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा