एखाद्याला आíथक नियोजनात एक विशिष्ट पद्धतीचे नियोजन सुचविले होते म्हणून तेच नियोजन मलाही लागू होते असे समज करून मेल लिहिणाऱ्या वाचकांची संख्या कमी नाही. वस्तुत: ज्यांचे नियोजन प्रसिद्ध होते त्यात संबंधितांची आवश्यक तितकीच माहिती दिली जाते. उदाहरण देऊन सांगायचे तर कोणाला एखाद्या वर्षांत नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करायचा असतो, तर सध्या नोकरीत असलेल्या कोणा तरुणाला परदेशातील शिक्षण घेण्यासाठी किंवा नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी बनण्यासाठी नोकरी सोडायची असते. आपल्या भविष्यातील या योजना सार्वजनिक करण्याची अनेकांची तयारी नसते. परंतु नियोजनात मात्र या गोष्टी विचारात घेतलेल्या असतात. साहजिकच इतरांनी हे नियोजन जसेच्या तसे स्वत:ला लागू होते असे मानणे धोक्याचे आहे. या सदरातून प्रसिद्ध झालेल्या कोणा एकीच्या व आपल्या आíथक परिस्थितीत साम्यस्थळे आढळल्याने आपलेही नियोजन असेच आहे असे वाटलेल्या, परंतु प्रत्यक्षात ते का व कसे वेगळे आहे हेही ज्यांना पटले त्यांची ही गोष्ट.
सुखदा दामले (३४) या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीत तंत्रज्ञ आहेत. पुण्याच्या सहकार नगर भागात त्या व त्यांच्या आई रहातात. मोठा विवाहित भाऊ व त्याचे कुटुंब याच इमारतीत स्वतंत्र राहतात. भाऊ रांजणगाव येथील वाहन उद्योगात नोकरी करतो तर त्याची पत्नी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत नोकरी करते. सुखदा यांचे वार्षकि वेतन २८ लाख असून करपश्चात वेतन २२ लाख आहे. सुखदा यांनी ६५ लाखांचे गृह कर्ज घेतले असून यापकी ५० लाखांची फेड अद्याप शिल्लक आहे. सुखदा यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत ११ लाख जमा आहेत.
सुखदा यांच्यावर विशेष जबाबदारी नसणे; सुखदा यांचे सध्याचे वय व अजून २५ वर्षांची शिल्लक असलेली नोकरी तसेच अद्याप फेडायचे शिल्लक असलेले गृहकर्ज याचा विचार करता त्यांना एलआयसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एसबीआय लाईफ, बिर्ला सनलाईफ या चार विमा कंपन्या सुचविल्या यापकी त्यांनी निवड केलेल्या विमा कंपनीचा ५० लाखाचे विमा छत्र देणारा व २५ वष्रे मुदतीच्या विम्यासाठी त्या ९,००० रुपयांचा हप्ता भरणार आहेत. त्यांच्या आई या पॉलिसीच्या लाभार्थी असणार असल्याने दुर्दैवाने विम्याचा दावा दाखल करण्याची वेळ आलीच तर कुणी मदतनीस असावा या दृष्टीने विम्याची खरेदी ऑफलाईन पद्धतीने म्हणजे कुणा विक्रेत्यामार्फत करावी असे सुचविण्यात आले. जेणेकरून विम्याच्या दाव्याची पूर्तता करण्यास हा विक्रेता सहाय्य करेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा