प्राप्तिकर वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक कायदेशीर मार्गापकी एक मार्ग म्हणजे प्राप्तिकर कायद्यामध्ये नमूद केलेल्या वजावटी (Deductions) आणि सूट (Rebate) यांचा पुरेपूर लाभ उठवणे. या वजावटी आणि सूट माहिती असतील तर त्या आधारे एखादी व्यक्ती आयुष्यचक्रातील आपली आíथक उद्दिष्टे सुध्दा साध्य करू शकेल आणि प्राप्तीकरही वाचवू शकेल.
एक उदाहरण घेऊन हे समजून घेऊया. साठ वर्षांखालील एखाद्या पुरुष अथवा स्त्रीने याबद्दल माहिती घेतल्यास ६६५,००० एवढे उत्पन्न ती व्यक्ती करमुक्त ठेऊ शकेल. ६६५,००० या रकमेवर त्या व्यक्तीला प्राप्तिकर भरण्याची आवश्यकता नाही. समजा एखाद्या व्यक्तीचे पगार किंवा व्यवसाय आणि इतर उत्पन्न मिळून उत्पन्न आहे रु. ६६५,०००! या उत्पन्नामध्ये बँक बचत खात्यावर मिळणारे वार्षिक १०,००० रुपयांचे व्याजही समाविष्ट आहे. ही व्यक्ती स्वमालकीच्या घरात राहात आहे आणि हे घर घेण्यासाठी जे कर्ज घेतले आहे त्या कर्जाच्या व्याजापोटी वर्षांला २००,००० रुपये भरत आहे.
या व्यक्तीने कलम ८० सी नुसार उपलब्ध असलेल्या विविध योजनांमध्ये जर १५०,००० रुपये गुंतवले, तसेच कलम ८० डी नुसार स्वतसाठी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसाठी वार्षकि १५,००० रुपये आणि आपल्या 60 वर्षांवरील पालकांसाठी वार्षकि २०,००० रुपये हप्ता भरून आरोग्य विमा योजना घेतली तर या व्यक्तीला आíथक वर्ष २०१४-१५ म्हणजे करनिर्धारण वर्ष २०१५-१६ साठी प्राप्तिकर भरायची देय रक्कम किती असेल ते सोबतच्या चौकट स्पष्ट करते.
ज्या करदात्यांना एलआयसीच्या किंवा इतर विमा कंपनीच्या पेन्शन फंडामध्ये पसे गुंतवायचे आहेत त्यांना कलम ‘८० सीसीसी’नुसार जास्तीत जास्त रुपये १००,००० रुपये गुंतवता येतील. त्याचप्रमाणे ज्या करदात्यांना केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेमध्ये पसे गुंतवायचे आहेत त्यांना कलम ‘८० सीसीडी’नुसार जास्तीत जास्त रुपये १००,००० रुपये गुंतवता येतील. परंतु कलम ‘८० सीसीई’नुसार कलम ८० सी, कलम ८० सीसीसी आणि कलम ८० सीसीडी या तिघांची मिळून मिळणारी वजावट जास्तीत जास्त १५०,००० रुपये एवढीच असेल.
एखाद्या व्यक्तीच्या अचानक जाण्यामुळे जे भावनिक नुकसान होईल ते भरून काढता येणं अशक्य आहे. पण आíथक नुकसान काही प्रमाणात का होईना भरून निघू शकते. त्यासाठी आयुर्वमिा योजना घेणे महत्वाचे आहे. तसेच हॉस्पिटलचे वाढते खर्च पाहता आरोग्य विमा योजना घेणे महत्वाचे आहे. प्राप्तिकर वजावटही मिळावी आणि जर का आजारपण आलेच आणि हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ आलीच तर होणारा खर्च वाचावा यासाठी मेडिक्लेम योजना उपलब्ध आहे. कलम ८० डी नुसार स्वतच्या तसेच पत्नीच्या आणि अवलंबून असणाऱ्या मुलांच्या नावे मेडिक्लेम योजना घेतल्यास जास्तीत जास्त १५,००० रुपयांच्या हप्त्यावर १००% वजावट मिळते. तसेच ६० आणि ६० वर्षांवरील व्यक्तीला कमाल २०,००० रुपयांच्या हप्त्याची वजावट मिळते. या व्यतिरिक्त त्या करदात्याला ६० वर्षांखालील पालकाच्या नावे जास्तीत जास्त १५,००० रुपये आणि ६० वर्षांवरील पालकाच्या नावे जास्तीत जास्त २०,००० रुपये इतक्या हप्त्याची वजावट मिळते. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हे हप्ते करदात्याला त्याच्या त्या वर्षीच्या उत्पन्नामधूनच भरावे लागतात.
कलम ८७ अ नुसार पाच लाखापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर प्राप्तीकराची देय रक्कम अथवा रुपये २,००० यापकी जी रक्कम कमी असेल तेवढा रिबेट मिळतो. कलम ८० टीटीए नुसार बँकेच्या, सहकारी बँकेच्या तसेच पोस्टाच्या बचत खात्यावर मिळणारे व्याज १०,००० रुपयांपर्यंत करमुक्त आहे. तेव्हा प्राप्तिकर वाचवण्यासाठी (प्राप्तिकर) कायद्यालाच विचारा ‘काय द्याल?’ आणि मग तुम्हाला प्राप्तिकर वाचवण्यासाठी खूप उत्तरं मिळतील.
लेखक गुंतवणूक व प्राप्तिकर नियोजन सल्लागार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलम ८० सीनुसार मुभा असलेल्या गुंतवणूक योजना
प्राप्तिकर कायद्यामध्ये ज्या वजावटी करदात्यांसाठी उपलब्ध आहेत त्यांचा १००% उपयोग केला तर प्राप्तीकरही वाचतो आणि त्याच बरोबर आयुष्याचक्रातील विविध उद्दिष्टय़े साध्य करण्यासाठी गुंतवणूकही होत राहते.
१.    आयुर्वम्यिाचा हप्ता
२.    कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जमा रक्कम
३. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)
४. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
५.टय़ूशन फी- विद्यापीठ, कॉलेज, शाळा अथवा शैक्षणिक संस्थेला प्रवेश घेतेवेळी अथवा त्यानंतर भरलेली टय़ूशन फी
६.बँकेची पाच वर्ष मुदतीची मुदत ठेव योजना
७.पोस्टाची पाच वर्ष मुदतीची मुदत ठेव योजना
८. सीनियर सिटिजन बचत योजना
९. गृहकर्जाच्या परतफेडीचा हप्ता
१०. मुद्रांक शुल्क, रजिस्ट्रेशन फी आणि राहते घर हस्तांतरित करायला आलेला इतर खर्च

करवजावटीच्या गुंतवणुकांतून  ही उद्दिष्टय़ेही साध्य होतात..
* शिस्तबद्ध बचत आणि गुंतवणुकीची सवय लागावी
* नियमित व्याज मिळावे
* अनपेक्षित घटना घडली ( उदा. अवेळी मृत्यू ) तर निर्माण होणारी आíथक पोकळी भरून निघावी
* घराचे स्वप्नं पुरे व्हावे
* भविष्य काळात निवृत्तीनंतर मोठे भांडवल तयार व्हावे
* मुला- मुलीच्या शिक्षण, लग्न यासाठी तरतूद करणे
* निवृत्तीनंतर पेन्शन मिळवणे
dattatrayakale9@yahoo.in