नियोजनकाराशी चर्चा करेपर्यंत आपल्या कुटुंबाची आíथक उद्दिष्टय़े काय? कोणती असावीत? हा विचार डोक्यात मागच्या बाजूस कुठे तरी असतो खरा, पण ते लिखित स्वरूपात उतरलेला नसतो. उद्दिष्टय़े, इच्छा आणि अपेक्षा यांची सरमिसळ झालेली असते. आधी काय साध्य करायचे हा पक्का विचार हवा. मग पुढे हेच का? आणि कसे? ही प्रश्न आणि त्यांची उत्तरे येतीलच..
आíथक नियोजन करताना नियोजनकार आपल्या ग्राहकाची संपूर्ण माहिती विचारतो. त्यात वैयक्तिक माहिती, कौटुंबिक (आíथक) जबाबदाऱ्या, उत्पन्न-खर्च, आयकर, गुंतवणुका वगैरे बरोबरीनेच आíथक उद्दिष्टय़े विचारतो.
ही उद्दिष्टय़े काळानुरूप तीन प्रकारची असतात.
* छोटय़ा अवधीत पूर्ण करण्याची (तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीत पूर्ण करावयाची) उदा. दोन वर्षांत नवीन गाडी खरेदी करणे; घराचे नूतनीकरण करणे, परदेश सफर..
* मध्यम पल्ल्याची (चार ते सात वर्षांपर्यंत पूर्ण करावयाची) उदा. नवीन घर खरेदी, मुलांचे उच्च शिक्षण..
* दीर्घ मुदतीत पूर्ण करावयाची (सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीत पूर्ण करावयाची) उदा. निवृत्तीपश्चात जीवनाचे नियोजन..
हा कालावधी वयानुसार बदलत असतो. ५७ वष्रे वयाच्या माणसाचे नियोजन करताना निवृत्ती नियोजन हे छोटय़ा अवधीत पूर्ण करावयाचे उद्दिष्ट असते. तर ४५ ते ५० वयोगटात, मुलांचे उच्च शिक्षण हे छोटय़ा अवधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असते. हेच उद्दिष्ट ३० वर्षांच्या ग्राहकासाठी दीर्घ मुदतीत साध्य करावयाचे असते.
या व्यतिरिक्त काही उद्दिष्टय़े आपल्या अशीलाने नमूद केलेली नसतात. आपली ही उद्दिष्टय़े आहेत याची जाणीवच त्यांना नसते. उदा. घरासाठी घेतलेले कर्ज समजा ३५ लाख रुपये असेल तर कमीत कमी आयुर्वमिा ३५ लाखांचा हवा तर तो २० लाखाचाच असतो. या जास्तीच्या आयुर्वम्यिाची गरज लक्षात आलेली नसते. तसेच इच्छापत्र हे निवृत्तीनंतरच बनवायचे असे गृहीत धरून बनवलेले नसते. या गरजा नियोजनकार नजरेस आणून देतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा