एचडीएफसी हा भारतातील एक नामांकित उद्योगसमूह आणि १८२५ साली एडिनबर्ग येथे स्थापन झालेली जागतिक स्तरावरील स्टॅन्डर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनी यांच्या सहयोगाने २००० साली कार्यान्वित झालेल्या एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाइफ या कंपनीची पेन्शन प्रकारात मोडणारी ही पॉलिसी. निवृत्तीनतर मिळणारी पेन्शन हा प्रकार आता इतिहास जमा झालेला आहे. त्यामुळे भविष्याची काळजी असणारे विमाइच्छुक आपसूकच अशा प्रकारच्या पॉलिसींकडे आकर्षति होतात.
 ठळक वैशिष्टय़े :
१. गुंतवणुकीचा काळ – १० ते ४० वष्रे
२. विमाइच्छुकाने जमा केलेल्या प्रिमियमच्या कमीत कमी १०१ टक्के लाभाबाबत कंपनीने हमी दिलेली आहे.
३. पॉलिसी खरेदीसाठी वयोमर्यादा १८ ते ६५ वष्रे.
४. मॅच्युरिटीसाठी वयोमर्यादा ५५ ते ७५ वष्रे
५. पॉलिसीची टर्म १० ते ४० वष्रे
 उदाहरण :
विमाधारकाचे वय – ३३ वष्रे
पॉलिसीची टर्म – २२ वष्रे
प्रिमियमचा भरणा करायची टर्म २२ वष्रे
वार्षकि प्रिमियम – १,०३,०९० रु. (सíव्हस टॅक्ससह)
विमाछत्र – १९,९२,८१२ रु.
ल्ल  पॉलिसीचे लाभ :
 या पॉलिसीमध्ये प्रत्याभूत लाभ (Guranted Benefits) आहेत आणि त्याचबरोबर ज्याबाबत कंपनी आज हमी देत नाही असे अतिरिक्त लाभही आहेत. विमाधारकाने २२ वर्षांची टर्म पूर्ण केली की त्याच्या हक्काची अशी गंगाजळी (Vesting Benefits) त्याच्या खात्यात तयार होणार आहे. पॉलिसीच्या लेखाचित्रानुसार त्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे  :
१. गंगाजळीची तारीख – १३ मे २०३६ (विमाधारकाचे वय ५५ वष्रे)
२. कंपनीने हमी दिलेली रक्क्म – २२,२२,००० रु.
३. ज्याची हमी नाही अशी गृहीत धरलेली अतिरिक्त गंगाजळी –
        ४ टक्के प्रमाणे ८,५९,२८१ रु.
        ८ टक्के प्रमाणे -२७,५३,६२४ रु.
४. एकूण गंगाजळी :
         ४ टक्के परतावा गृहीत धरून ३०,८१,२८२ रु.
         ८ टक्के परतावा गृहीत धरून ४९,७५,६२४रु.
त्यानंतर विमाधारकाला प्राप्त होणाऱ्या वर्षांसनाचे (ंल्लल्ल४्र३८) पसेही लेखाचित्रामध्ये नमूद केले आहेत.
४ टक्के गृहीत परताव्यानुसार १,३८,३५० रु. आणि ८ टक्के गृहीत परताव्यानुसार ३,९८,१०० रु.
ल्ल  पॉलिसीच्या २२ वर्षांच्या टर्ममधे विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्यावेळेस त्याच्या नामनिदेíशत व्यक्तीला किती पसे मिळतील त्याचाही तक्ता दिला आहे.
मृत्यूचे वर्ष      हमी दिलेली आणि गृहीत धरलेली                   एकूण रक्कम
       ४ टक्के        ८ टक्के
५    ६,५४,४८०रु.         ८,५३,७३७ रु.
१०    १३,०८,९२०रु.     १७,०७,४७२ रु.
१५    १९,६३,३८०रु.     २५,६१,२०७ रु.
२१    २७,४८, ७३२ रु.   ३५,८५६८९ रु.

विश्लेषण:
विमाधारक वयाच्या ३३ व्या वर्षांपासून ते ५५ व्या वर्षांपर्यंत प्रिमियमपोटी दरवर्षी १,०३,०९० रुपयांप्रमाणे एकूण २२,६७,९८० रु. कंपनीकडे जमा करतो. आणि त्या बदल्यात त्याला कंपनी २२,२२,००० रुपयांच्या गंगाजळीची हमी देते, म्हणजे गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून कंपनीने हमी दिलेल्या रकमेबाबतच्या परताव्याचा दर होतो (-) ०.०९ टक्के. अतिरिक्त परताव्याबाबत ४ टक्के आणि ८ टक्के या मथळयांखाली ज्या रकमा दाखविल्या आहेत त्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत. ही टक्केवारी कोणत्या रकमेवर आधारीत आहे, त्याचा कोठेही उल्लेख नाही. या सर्व आकडेवारीच्या खोलात शिरून डोकेदुखी करून घेण्यापेक्षा कंपनीने २२ वर्षांनंतर तयार होणाऱ्या गंगाजळीबाबत बिनाहमीची जी जास्तीत जास्त रक्कम (४९,७५,६२४ रु.) दाखविली आहे ती गृहीत धरली तरी विमाधारकाने दरवर्षी भरणा केलेल्या प्रिमियमवर परताव्याचा दर पडतो द.सा.द.शे. सरासरी ६.३७ टक्के.
ल्ल  याच वार्षकि रकमेमधे सदर विमाइच्छुकाला जास्तीचे विमाछत्र आणि जास्त प्रमाणात लाभ होऊ शकतो का त्याचा आढावा घेऊया.
त्याने त्याच कंपनीची २५ लाख रुपयांच्या विमाछत्राची २५ वर्षे कालावधीची बिननफ्याची अर्थात प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर त्याची वार्षकि प्रिमियमची रक्कम होते ५,५३२ रुपये आणि २५ वर्षांच्या प्रिमियमची एकूण रक्कम होते १,३८,३०० रुपये. वरील पेन्शन प्लस पॉलिसीची प्रिमियमची एकूण रक्कम म्हणजे २२,६७,९८० रुपयांच्या तुलनेत २१,२९,६७० रुपयांची बचत होईल. या बचतीमधून त्याने दरवर्षी प्रमाणे ९६,८०० रु. आयकर बचतीच्या ठोस परताव्याच्या पर्यायामध्ये २२ वष्रे गुंतविले तर त्याची खात्रीलायक अशी ६३,७०,००० रुपयांची गंगाजळी निश्चितपणे उभी राहील.  
पेन्शन प्लस प्लानमध्ये अतिरिक्त परताव्याबाबत कंपनीने हमी दिलेली नाही आणि गुंतवणुक दीर्घ पल्ल्याची आहे. म्हणजे त्यामधे पूर्वनियोजित जोखीमही अभिप्रेत आहे. त्याच प्रकारची जोखीम घेऊन वरील बचतीची वार्षकि रक्कम (९६,८०० रु.) दरवर्षी आयकर बचतीच्या म्युच्युअल फंडाच्या योजनांमधे गुंतविली तर ज्या योजनांमध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून नमूद केलेल्या एतिहासिक द.सा.द.शे. वृध्दीच्या अर्धी वाढ गृहीत धरली तरी गुंतवणूकदाराच्या ५५ व्या वर्षी त्याची गंगाजळी होते १,००,२८,७६० रुपये.
ज्याला कमी प्रमाणात जोखीम घ्यायची आहे अशा गुंतवणुकदाराने एकूण ९६,८०० रुपयांपकी वार्षकि ५०,८०० रुपये वरील ठोस परताव्याच्या पर्यायामध्ये गुंतविले आणि बाकीची रक्कम (४६,००० रु.) पूर्वनियोजीत जोखीम असलेल्या पर्यायामधे गुंतविली तर २२ वर्षांनी त्याची गंगाजळी होते ८१,०८,६५८ रुपये.
ल्ल  तुलनात्मक आढावा :
१. पेन्शन प्लस प्लानचे विमाछत्र १९.९४ लाख रुपये आहे तर प्युअर टर्म पॉलिसीचे आहे २५ लाख रु. (सुमारे २५ टक्के जास्त)
२. पेन्शन प्लस प्लानमध्ये २२ वर्षांनी तयार होणारी बिनाहमीची जास्तीत जास्त गंगाजळी आहे ४९.७५ लाख रुपये आणि प्युअर टर्म पॉलिसीमुळे प्रिमियममध्ये होणाऱ्या बचतीच्या गुंतवणुकीची खात्रीलायक गंगाजळी आहे ६३.७० लाख रु. (सुमारे २८ टक्के जास्त) त्याच रकमेची पूर्वनियोजित जोखीम घेऊन केलेल्या गुंतवणुकीची गंगाजळी आहे १ कोटी रु. (सुमारे १०० टक्के जास्त) आणि तीच रक्कम ठोस परतावा आणि पूर्वनियोजित जोखीम अशा दोन पर्यायांमध्ये विभागून गंतविली तर गंगाजळी होते ८१.०८ लाख रुपये (सुमारे ६० टक्के जास्त)
(सदर लेखाचा उद्देश पूर्णत: समीक्षात्मक असून, लेखात माहिती व आकडेवारी त्या त्या वेबस्थळांवरुन आणि प्रत्यक्ष घटनांवरून घेतलेली आहे)
लेखक गुंतवणुक आणि विमा सल्लागार
विमाधारक २२ वर्षांच्या टर्ममध्ये एकूण २२,६७,९८० रुपये कंपनीकडे हप्त्यांपोटी जमा करतो आणि त्या बदल्यात कंपनी २२,२२,००० रुपयांच्या गंगाजळीची त्याला हमी देते, म्हणजे गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून कंपनीने हमी दिलेल्या रकमेबाबतच्या परताव्याचा दर होतो (-) ०.०९ टक्के. अतिरिक्त परताव्याबाबत ४ टक्के आणि ८ टक्के या मथळयांखाली ज्या रकमा दाखविल्या आहेत त्या प्रचंड गोंधळात टाकणाऱ्या आहेत.

Story img Loader