तोंडाला एकदा का रंग लागला की त्या रंगाची नशा आयुष्यभर असते. असे एक वाक्य अनेक रंगकर्मीकडून ऐकायला मिळते. या वर्षांतील शेवटच्या भागात अभिनयाच्या आवडीसाठी मुदतपूर्व निवृत्ती घेऊन आयुष्याच्या उत्तरार्धात अभिनय व रंगभूमीशी संबंधित आपल्या आवडीचे काम करू इच्छिणाऱ्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या संपदा कुमठेकर (३७) यांचे नियोजन जाणून घेऊ. त्यांचे वडील त्यांच्या लहानपणी निवर्तले. वडिलांच्या पश्चात आईने त्यांना वाढविले. संपदा या प्रोबेशनरी अधिकारी भरतीची परीक्षा देऊन एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरती झाल्या. एका वर्षांपूर्वी १२ वर्षांची राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी सोडून संपदा कुमठेकर या एका खाजगी बँकेत सध्या नोकरी करीत आहेत. चांगली रोकड सुलभता असूनही बचत मात्र मोठी दिसत नाही ही त्यांची खंत आहे. आपले आíथक नियोजन योग्य मार्गावर आहे अथवा नाही हे जाणून घेण्याची संपदा यांची इच्छा होती या कारणाने त्यांनी नियोजनासाठी विनंती केली. १२ वर्षांच्या नोकरीनंतर त्या दुसऱ्या क्रमांकाच्या खासगी बँकेत दाखल झाल्या निवृत्तीच्या वयाच्या १० वष्रे आधी त्यांचा नोकरी सोडण्याचा विचार आहे. म्हणजे पुढील १२ वष्रे त्या कमावत्या राहणार आहेत. त्या करणार असलेली गुंतवणूक थोडी जास्त जोखीमीची असली तरी त्यांची त्यास हरकत नसून गुंतवणूक कार्यक्षम असावी हा यांचा कटाक्ष आहे. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार त्यांचे नियोजन त्यांना सुचविण्यात आली आहे.
संपदा कुमठेकर यांच्यावर आज आíथक जबाबदारी नाही. भविष्यात त्यांचा घरासाठी कर्ज घेण्याचा विचार नाही. सबब त्यांना मुदतीचा विमा घेण्याची शिफारस केलेली नाही. संपदा व त्यांची आई यांना त्यांच्या बँकेने समूह आरोग्य विमा योजनेत तीन लाखाचे आरोग्य विमा छत्र लाभले आहे. सेवानिवृतीनंतरही त्यांचा हप्ता स्वत: भरून या योजनेचा त्यांना लाभ घेता येतो. त्यांच्यासोबत आई असल्याने त्यांनी पाच लाखाचे अतिरिक्त विमा छत्र घ्यावे अशी शिफारस केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा