गेल्या सप्ताहात रिझव्र्ह बँकेने जाहीर केलेले धोरण अपेक्षेप्रमाणे होते. जगातील अर्थव्यवस्थेने दाखविलेली स्थिरतेची चिन्हे शाश्वत नाहीत. युरोपिय अर्थव्यवस्था मंदीच्या गत्रेतून बाहेर पडलेली नाही तर बहुतेक विकसनशील अर्थव्यवस्था वाढीव विकासाकडे वाटचाल करताना मंदावलेली बाहेरील मागणी आणि प्रगत अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे जगातील कमजोर अर्थव्यवस्था आणखी दुबळ्या बनण्याचा असलेला धोका आहे. अशा परिस्थितीत रिझव्र्ह बँकेने धोका पत्करून व्याजदर कमी करणे अपेक्षित नव्हतेच.
देशांतर्गत विकासदर वाढल्याचे संकेत दिसत असले तरी पूर्वीच्या वाढीपेक्षा ही वाढ संथ आहे. जागतिक अर्थव्यवस्थांची स्थिती संमिश्रच आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. अमेरिकेत अकृषिक बेरोजगारात घट दिसून येत आहे, ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढली आहे. या उलट युरोपियन अर्थव्यवस्थेचा संकोच थांबलेला नाही. तर भारतात उत्तम रब्बी पीक आल्यामुळे कृषीक्षेत्राची वाढ चांगली आहे. परंतु उद्योगक्षेत्रात भांडवली वस्तूंची मागणी वाढलेली दिसत नाही. रोजगार व अर्थव्यवस्थेतील इतर घटकांची मागणी वाढण्याआधी ही मागणी वाढणे अपेक्षित असते. महागाई निर्देशांकात संमिश्र कल दिसत असून घाऊक किमतीवर आधारीत निर्देशांकात घट तर किरकोळ किमतींवर आधारीत निर्देशांकात वाढ झालेली दिसत आहे. अर्थव्यवस्थेत पुरेसा चलन पुरवठा उपलब्ध आहे. बिगर कृषक पतपुरवठ्यात अपेक्षित १६% हून अधिक वाढ दिसून येते.
कंपन्यांनी प्राप्तिकराचा अग्रिम हप्ता भरतेवेळी नेहमीच पुरेसे चलन उपलब्ध असणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन रिझव्र्ह बँकेने डिसेंबर महिन्यात दोनदा खुल्या बाजारातून एकूण २३,२०० कोटी रुपये इतकी रोखे खरेदी करून अर्थव्यवस्थेत पुरेसा चलन पुरवठा उपलब्ध राहील याची दक्षता घेतली. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत रोख राखीव प्रमाणात कपात न करता खुल्या बाजारातून रोखे खरेदी करून द्रवता वाढविणे हे धोरण योग्यच आहे. परदेशी व्यापारातील तूट व चालू खात्यावराची तूट यांचा सततचा दबाव रुपयाच्या विनिमय दरावर पडत आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ५.८% वाढण्याचा अंदाज व्यक्त करतानाच सरकारने हाती घातलेला आíथक सुधारणा कार्यक्रम गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महागाई निर्देशांकात फारशी वाढ न झाल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव स्थिर राहिल्यास व रुपया-डॉलरचा विनिमय दर स्थिर राहिल्यास, रिझव्र्ह बँक धोरणात लवचिकता स्वीकारेल, असा आशावाद संयुक्तिक वाटतो. सर्व सुप्त स्रोतांचा पुरेपूर वापर करून उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. रिझव्र्ह बँक केवळ देशाची मध्यवर्ती बँक नसून व्यापक कार्य करणारी संस्था आहे. चलन व पतचलन यांचे नियमन करण्याव्यतिरिक्त रिझव्र्ह बँक अशी कार्य करते की, जी देशातील बँकांचा विकास व प्रवर्तन होण्यास सहाय्यक होतात. या पाश्र्वभूमीवर रिझर्व बँकेने वेळोवेळी घेतलेले निर्णय भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ करण्याकडे वाटचाल करण्यास सहाय्यभूत झाल्याचे दिसून येते. रिझव्र्ह बँकेने सादर केलेल्या ताज्या मध्य-तिमाही धोरणात राजकीय व उद्योगक्षेत्राकडून येणाऱ्या दबावास बळी न पडता व्याजदर व रोख राखीव प्रमाणात बदल न करण्याचा निर्णय घेऊन नियामक यंत्रणा स्वतंत्र असल्याचे दाखवून दिले आहे या कारणासाठी रिझव्र्ह बँक प्रशंसेस पात्र नक्कीच आहे!
प्रकाश विठ्ठल परब
(लेखक निवृत्त बँक मुख्यधिकारी आहेत)
अपेक्षापूर्ती
गेल्या सप्ताहात रिझव्र्ह बँकेने जाहीर केलेले धोरण अपेक्षेप्रमाणे होते. जगातील अर्थव्यवस्थेने दाखविलेली स्थिरतेची चिन्हे शाश्वत नाहीत. युरोपिय अर्थव्यवस्था मंदीच्या गत्रेतून बाहेर पडलेली नाही तर बहुतेक विकसनशील अर्थव्यवस्था वाढीव विकासाकडे वाटचाल करताना मंदावलेली बाहेरील मागणी आणि प्रगत अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे जगातील कमजोर अर्थव्यवस्था आणखी दुबळ्या बनण्याचा असलेला धोका आहे. अशा परिस्थितीत रिझव्र्ह बँकेने धोका पत्करून व्याजदर कमी करणे अपेक्षित नव्हतेच.
First published on: 24-12-2012 at 12:22 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expectation fullfill