मागील वर्षांपासून दिवाळीच्या मागेपुढे ‘अर्थ वृत्तान्त’सुद्धा दिवाळीसाठी विशेष खरेदी सुचवीत असतो. म्हणून गतवर्षांप्रमाणेच या वर्षी आम्ही विश्लेषकांना त्यांनी मागील वर्षभरात अभ्यासलेल्या कंपन्यांपकी एका कंपनीची निवड करण्यास सांगितले. दसरा व दिवाळी एकाच महिन्यात आलेल्या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यांत ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’च्या अतिथी विश्लेषकांच्या पसंतीच्या कंपन्यांच्या फराळाचा हा तिसरा हप्ता..
ल्ल टीआयएल म्हणजे आधीची ट्रॅक्टर इंडिया लिमिटेड. ही कंपनी ‘ऑफ द रोड’ वाहने म्हणजे ट्रॅक्टर, पुलर, क्रेन्स रोड रोलर व अन्य ‘मटेरियल हॅडिलग इक्विपमेंट्स’ची उत्पादक आहे. कंपनीने आपला व्यवसाय तीन प्रकारात विभागला आहे. पहिल्या प्रकारात ‘मटेरियल हॅडिलग इक्विपमेंट्स’चे उत्पादन व विक्री. दुसरा प्रकार म्हणजे ‘पोर्ट इक्विपमेंट सोल्युशन’ म्हणजे बंदरात माल हाताळणी करणारी यंत्रणा. यामध्ये कंटेनर हाताळणारी यंत्रणा क्रेन्स व लुज कार्गो (कंटेनरमधून न येणारे कोळसा, लोह खनिज इत्यादी) हाताळणारे ‘कन्व्हेयर बेल्ट्स’ यांचा समावेश होतो. तिसऱ्या प्रकारात ‘इक्विपमेंट्स प्रोजेक्ट सोल्युशन्स’ म्हणून ओळखला जातो. या विभागात रस्त्यासाठी खाडी दाबणारे रोलर्स व ‘हॉट मिक्स आसफाल्ट’ तयार करणारे मिक्सर, रेल्वे व रस्ता बांधणी, धरणे व जल विद्युत प्रकल्प यासाठी बोगदे खणणारे यंत्र, कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या ‘इओटी’ क्रेन्स, विमान ओढून नेणारे ट्रक, डीजी सेट्स इत्यादी उत्पादनांचा समावेश होतो. फ्लाय ओव्हरचे बांधकाम सुरू असताना नजरेस पडणाऱ्या ‘मोबाईल क्रेन्स’ किंवा ‘ट्रक माऊन्टेड क्रेन्स’ या भांडवली वस्तुंचा समावेश होतो. ‘ट्रक माऊन्टेड क्रेन्स’ या उत्पादन प्रकारात टीआयएल बाजारपेठेचे नेतृत्व करते व या कंपनीचा बाजारहिस्सा ८१ टक्के आहे. कंपनीचे ग्राहक प्रामुख्याने पायाभूत सुविधा विकासक आहेत. मागील आíथक वर्षांत पायाभूत सुविधा क्षेत्राला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले असले तरी आपले बाजारपेठेतील नेतृत्व व नफ्याची टक्केवारी टिकवून ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. कंपनीच्या ट्रॅक्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टीआयएल नेपाळ लिमिटेड व टीआयएल ओव्हरसीज पीटीई लिमिटेड या १०० टक्के मालकीच्या तीन उपकंपन्या आहेत. ट्रॅक्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील राख व कोळसा हाताळणी यंत्रणांची उभारणी करते. टीआयएल नेपाळ लिमिटेड ही कंपनी नेपाळमधील व्यवसायासाठी तर टीआयएल ओव्हरसीज पीटीई लिमिटेड ही सिंगापूरमध्ये नोंदणी झालेली कंपनी निर्यात संबिंधत व्यवसाय पाहते.
कॅटरपिलर ही मूळ अमेरिकेतील बांधकाम यंत्र सामुग्रीची उत्पादक असून जगातील बांधकाम यंत्रसामुग्रीची अव्वल उत्पादक म्हणून ही कंपनी ओळखली जाते. टीआयएल व कॅटरपिलर यांचे जुने व्यावसायिक संबंध आहेत. टीआयएल ही कॅटरपिलरच्या खाणीत वापरण्याच्या यंत्र सामुग्रीची भारतातील पहिली वितरक असून भारतीय उपखंडात कॅटरपिलरच्या या व्यवासायासाठीची विक्री व विक्रीपश्चात सेवा देणारी एकमेव वितरक आहे. हा वार्षकि निगराणी कंत्राट (एएमसी) हा मोठा नफ्याचे प्रमाण असलेला व्यवसाय आहे. शेती खालोखाल बांधकाम व्यवसाय हा सर्वात जास्त रोजगार देणारा उद्योग आहे. मागील दोन वर्षांपासून वेगवेगळ्या परवानगीअभावी रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे बांधकाम यंत्रसामुग्री (अर्थमुिव्हग कन्सट्रस्शन इक्वि पमेंट) उद्योग लाभार्थी ठरेल, असा कयास आहे. टीआयएलचा हा व्यवसाय पुढील पाच वर्षांत २० ते २५ टक्क्याने वाढेल. कंपनीने मागील काही दिवसांपासून तयार मालाची पातळी कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून याचा परिणाम कर्ज व कर्जावरील व्याज कमी होण्यात झाल्याचे मागील दोन तिमाही निकालांपासून ठळकपणे दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा