२ जानेवारीपासून शेअर बाजारात जी घसरण सुरू झाली आहे तिचा पहिला आधार निफ्टी ६०८० ते ६१५० तर सेन्सेक्स २०५०० आहे. वरील आधारदेखील टिकला नाही तर भरभक्कम असा आधार निफ्टी निर्देशांक ५९५० ते ६००० व मुंबई शेअर बाजार निर्देशांक २०००० चा आहे. वरील पातळ्यांवर शेअर बाजाराचा आधार घेऊन एक वरची उसळी निफ्टी ६२८० ते ६३०० व सेन्सेक्सबाबत २१००० पर्यंत मारेल.
रिजव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेचा जो अर्धवार्षकि अहवाल जाहीर केला त्यात प्रामुख्याने आíथक व राजकीय आघाडीवर चिंता व्यक्त केली आहे. तेव्हा येणाऱ्या दिवसात शेअर बाजाराची वाटचाल संभाव्य उच्चांक  – नीचांकाचा आढावा आपण राजकीय, आíथक व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेऊ या.
१. आíथक परिस्थिती : १२ डिसेंबर २०१३ ला जाहीर झालेला किरकोळ महागाई दर हा ११.२४% वर गेला आहे.  जो नऊमाही उच्चांकावर आहे.
२. औद्योगिक उत्पादन विकास दर हा -२.१% (नोव्हेंबर) एवढा खाली आला आहे व याचा एकत्रित परिणाम म्हणजे ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ (जी.डी.पी.) हे ५% च्या खाली राहणार हे स्पष्ट झाले.
३. बँकांच्या थकित व बुडीत कर्जामध्ये (एन.पी.ए. मध्ये) वाढ.
४. अमेरिकेत कर्जरोख्यांवर (बाँड इल्ड) ३.२५% एवढा घसघशीत परतावा.
५. डॉलर पुन्हा सशक्त व रुपया अशक्त होण्याच्या मार्गावर.
अर्थकारण व राजकारण हे हातात हात घालून चालत असतात. त्यामुळे राजकारणातील सद्यपरिस्थितीदेखील आपण समजून घेऊ.
नरेद्र मोदींना लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळेल असे गृहीत धरले व तसे मिळाले तर ते सर्वार्थाने चांगलेच होईल. पण ‘आम आदमी’ च्या उदयामुळे जर भाजपाला २७२ या ‘जादूई’ आकडय़ापर्यंत पोहोचता आले नाही तर? मित्रपक्षांची जमवाजमव करावी लागेल व त्याचा पूर्वेतिहास हा काही स्पृहणीय नाही.
राजकीय पटलावरील इतर नेते मुलायमसिंग, मायावती, नितीशकुमार, नवीन पटनायक, चंद्राबाबू नायडू हे आपले राजकीय अस्तित्त्व टिकवण्यासाठी निकराचा प्रयत्न करून जास्तीत जास्त खासदार लोकसभेवर पाठवण्याचा प्रयत्न करणार व या साठमारीत राजकीय अस्थर्य जन्माला येऊन परत देवेगौडा, गुजराल प्रयोग झाले तर? हे राजकीय अस्थर्य अर्थविकासास तर घातक ठरणारच पण अर्थधोरणात्मक लकवा जास्त काळ टिकणार.
राजकीय व आíथक परिस्थितींचा आढावा घेतल्यावर आता आपण तांत्रिक विश्लेषणाकडे वळूया.
२ जानेवारीपासून शेअर बाजारात जी घसरण सुरू झाली आहे तिचा पहिला आधार निफ्टी निर्देशांक ६०८० ते ६१५० तर मुंबई शेअर बाजार निर्देशांक २०५०० आहे. वरील आधारदेखील टिकला नाही तर भरभक्कम असा आधार निफ्टी निर्देशांक ५९५० ते ६००० व मुंबई शेअर बाजार निर्देशांक २०००० चा आहे.
वरील पातळ्यांवर शेअर बाजाराचा आधार घेऊन एक वरची उसळी निफ्टी निर्देशांक ६२८० ते ६३०० व मुंबई शेअर बाजार निर्देशांकाबाबत २१००० पर्यंत मारेल.
निफ्टी निर्देशांक ६२८० ते ६३००/ मुंबई शेअर बाजार निर्देशांक २१००० ‘कल निर्धारण पातळी’ (ट्रेंड डिसायडर लेव्हल) आहे. या पातळीवर निर्देशांक पाच दिवस टिकणे म्हणजे आधीच्या उच्चांकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार (निफ्टी निर्देशांक ६४१५/मुंबई शेअर बाजार निर्देशांक २१,४८३).  
येणाऱ्या दिवसातील प्रमुख निर्देशांकातील तेजी ६२८० – ६३००/२१००० चा पल्ला ओलांडण्यात अयशस्वी ठरली तर निफ्टी निर्देशांक ५९५० / मुंबई शेअर बाजार निर्देशांक २०००० पर्यंत खाली येऊ शकतो. (२०० दिवसांची सरासरी) कुठल्याही परिस्थितीत हा भरभक्कम आधार तुटता कामा नये.
निफ्टी निर्देशांक ५९५० व मुंबई शेअर बाजार निर्देशांक २०००० च्या खाली राहणे ही धोक्याची घंटा आहे. निर्देशांक वरील पातळ्यांच्या खाली टिकणे म्हणजे शेअर बाजारात मंदी सुरू झाल्याची खूण आहे व या मंदीचे पहिले लक्ष निफ्टी निर्देशांक  ५७५० ते ५८०० / मुंबई शेअर बाजार निर्देशांक १९५०० व अंतिम लक्ष निफ्टी निर्देशांक ५५०० / मुंबई शेअर बाजार निर्देशांक १८००० ते १८५०० पर्यंत निर्देशांक खाली येऊ शकतो.
२०१४ हे वर्ष राजकीय, आíथक अशा महत्वाच्या वळणिबदूवर आहे. वरिल तिन्ही घटकांचा आíथक, राजकीय व तांत्रिक विश्लेषणाचा एकत्रित विचार करून वाचकांना त्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास या लेखाची मदत होईल ही अपेक्षा.
ashishthakur1966@gmail.com

महत्वाची सूचना : येणाऱ्या दिवसात निर्देशांकाची संभाव्य वाटचाल कशी असेल याचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. हे असेच घडेल याची हमी लेख/लेखक अथवा ‘लोकसत्ता’ घेत नाही. या लेखाच्या आधारे खरेदी, विक्रीचे व्यवहार केल्यास त्यात नुकसान झाल्यास लेख/लेखक/ ‘लोकसत्ता’ जबाबदार राहणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

Story img Loader