जून-जुलचा कालावधी म्हणजे वार्षकि अहवालाचा कालावधी. बहुतांशी कंपन्यांचे आíथक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असल्याने त्यांना ३० सप्टेंबपर्यंत भागधारकांची वार्षकि सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. या सभेत संचालकांची नियुक्ती, लेखापरीक्षित ताळेबंद आणि त्यावरील अहवाल, लाभांश आणि लेखापरीक्षकाची (ऑडिटर) नियुक्ती यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. याखेरीज ज्या इतर कामकाजांसाठी भागधारकांची मंजुरी लागते असेही निर्णय घेतले जातात. अशा या वार्षकि सभांच्या सूचना, लेखापरीक्षित नफा – तोटापत्रक आणि ताळेबंद आणि त्याबरोबरच संचालकांचा अहवाल असे एकत्रित अहवाल तुमच्याकडे येत असतील. ज्यांना सभेला जायला वेळ असेल त्यांनी अशा सभांना जरूर हजर राहावे म्हणजे आपण ज्या कंपनीच्या समभागात गुंतवणूक केली आहे त्या कंपनीचे कामकाज कसे चालले आहे, याचा अंदाज येईल. तसेच तुमच्या शंकाही तुम्हाला संचालकांना विचारता येतील. परंतु ज्या गुंतवणूकदारांना सभेला जायला वेळ नसेल त्यांनी वार्षकि अहवालाचा अभ्यास करायला हवा. यात कंपनीच्या लेखापरीक्षित आíथक अहवालाबरोबरच संचालकांचा अहवाल अभ्यासणे खूप महत्त्वाचे आहे. यामधून आपल्या कंपनीची आतापर्यंतची कामगिरी आणि नजीकच्या काळातील कामगिरी कशी असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. म्हणूनच सर्वच गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असा हा वार्षकि अहवाल रद्दीत टाकू नका. तो वाचा आणि वर्षभर राखून ठेवा.
ब्रिटानिया या १०० वर्षे जुन्या कंपनीबद्दल खरे तर जास्त लिहायची गरज नाही. ब्रिटानिया ही एक सुप्रसिद्ध आणि विश्वासार्ह नाममुद्रा असून भारतातील घराघरातून परिचित आहे. सध्या ३३% बाजारहिस्सा असलेल्या या कंपनीची बिस्किटे व बेकरी उत्पादनखेरीज आता डेअरी उत्पादनेही आहेत. यात प्रामुख्याने बटर, चीज आणि तूप आदी उत्पादनांचा समावेश होतो. गुड डे, टायगर, मारी गोल्ड, मिल्क बिकीस, लिटिल हार्ट्स, न्यूट्री चॉइस, बोबरेन असे अनेक ब्रॅन्ड विकसित करून कंपनीने बिस्किट बाजारपेठेत महत्त्वाचा हिस्सा काबीज केला आहे. डायनामिक्स डेरी या कंपनीच्या भागभांडवलात ब्रिटानियाचा हिस्सा असून तिच्यामार्फत कंपनी दूध, दही, चीज, बटर इत्यादी पदार्थाचे उत्पादन करते. भारताखेरीज दुबई, ओमान आणि उत्तर अमेरिकेतही कंपनीने बाजारपेठ काबीज केली आहे. गेल्या आíथक वर्षांकरिता म्हणजे मार्च २०१३ साठी संपलेल्या वर्षांकरिता कंपनीने ५,६१५.४९ कोटी रुपयांच्या विक्रीवर २३३.८७ कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला आहे. यंदा कंपनीने तिच्या बिहार आणि ओरिसा येथील प्रकल्पातील निर्मितीक्षमता वाढवली असून उत्पादन खर्च तसेच आधुनिकीकरणावर भर दिला आहे. उत्तम पाऊस, आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण या सगळ्याचा एकत्रित परिणाम यंदा कंपनीच्या कामगिरीवर दिसायला हवा. थोडासा महाग असला तरीही मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ब्रिटानिया तुमच्या पोर्टफोलिओत ठेवायला काहीच हरकत नाही.