जून-जुलचा कालावधी म्हणजे वार्षकि अहवालाचा कालावधी. बहुतांशी कंपन्यांचे आíथक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असल्याने त्यांना ३० सप्टेंबपर्यंत भागधारकांची वार्षकि सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. या सभेत संचालकांची नियुक्ती, लेखापरीक्षित ताळेबंद आणि त्यावरील अहवाल, लाभांश आणि लेखापरीक्षकाची (ऑडिटर) नियुक्ती यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. याखेरीज ज्या इतर कामकाजांसाठी भागधारकांची मंजुरी लागते असेही निर्णय घेतले जातात. अशा या वार्षकि सभांच्या सूचना, लेखापरीक्षित नफा – तोटापत्रक आणि ताळेबंद आणि त्याबरोबरच संचालकांचा अहवाल असे एकत्रित अहवाल तुमच्याकडे येत असतील. ज्यांना सभेला जायला वेळ असेल त्यांनी अशा सभांना जरूर हजर राहावे म्हणजे आपण ज्या कंपनीच्या समभागात गुंतवणूक केली आहे त्या कंपनीचे कामकाज कसे चालले आहे, याचा अंदाज येईल. तसेच तुमच्या शंकाही तुम्हाला संचालकांना विचारता येतील. परंतु ज्या गुंतवणूकदारांना सभेला जायला वेळ नसेल त्यांनी वार्षकि अहवालाचा अभ्यास करायला हवा. यात कंपनीच्या लेखापरीक्षित आíथक अहवालाबरोबरच संचालकांचा अहवाल अभ्यासणे खूप महत्त्वाचे आहे. यामधून आपल्या कंपनीची आतापर्यंतची कामगिरी आणि नजीकच्या काळातील कामगिरी कशी असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. म्हणूनच सर्वच गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असा हा वार्षकि अहवाल रद्दीत टाकू नका. तो वाचा आणि वर्षभर राखून ठेवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा