परिस काय धातू परिस काय धातू। फेडितो निभ्रान्तु लोहपांगू।
काय तयाहुनी जालासी बापुडे। फेडीत सांकडे माझे एक।
कल्पतरू कोड पुरवितो रोकडा। चिंतामणी खडा चिंतिले तें।
चंदनाच्या वासे वसता चंदन। होती काष्ठ आन वृक्षयाती।
काय त्यांचे उणे जाले त्यासी देता। विचारी अनंता तुका म्हणे।
रिझव्‍‌र्ह बँक पतधोरणात दर कपात करेल या आशेवर जानेवारी महिन्याचे सूत्र गुंफले. फेब्रुवारी महिना आला की अर्थसंकल्पाचे वेध लागतात. या वर्षीच्या अर्थसंकल्पात कोणत्या उद्योगाला सवलती मिळतील, कोणत्या उद्योगावर अर्थमंत्री कराची कुऱ्हाड चालेल याचे अंदाज बांधत आपल्या गुंतवणुकीत असलेल्या कोणाला सुट्टी द्यायची व कोणाचा नव्याने समावेश करायचा हा गेल्या अनेक वर्षांचा खाक्या बनला आहे. ५०% अंदाज बरोबर येतात तर १०% बाबतीत अपेक्षित असतात तेवढय़ा सवलती मिळत नाहीत तर ४०% अंदाज चक्क चुकतात. तरीही फेब्रुवारी महिना आला की हा अंदाज वर्तविण्याचा नित्यनेम चुकत नाही.
फेब्रुवारी महिन्याचे सूत्र अर्थसंकल्पात ज्या कंपन्यांना सवलती मिळतील अशा कंपन्याचा आपल्या गुंतवणुकीत समावेश करावा हे सूत्र ठेऊन निवडक कंपन्याच्या कामगिरीचा परामर्श घेणार आहे. गेल्या एका वर्षांत नकारात्मातक परतावा देणारा परंतु त्याचवेळी सेन्सेक्स २०,००० खाली बंद झाल्यामुळे शंकेची पाल मनात चुकचुकत  असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून टाटा स्टील भेटीला आणला आहे. या अर्थसंकल्पात सरकार पायाभूत सुविधांना प्राधान्य देईल, आयात होणाऱ्या कोकवर आयातशुल्क कमी करेल व चीनमधून भारतात येणाऱ्या पोलादावर आयात शुल्क वाढवले जाईल या आशेवर स्वार होत टाटा स्टील घ्यावा, अशी शिफारस करावीशी वाटते.
कधी काळी टिस्को व टेल्को हे मुंबई शेअर बाजारात काय भावाला उघडतात यावर अनेक दलाल त्या दिवशीच्या बाजाराच्या वाटचालीचा अंदाज बांधत असत. टिस्कोचा ‘ऑर्डिनरी’ असा ट्रेिडग िरगमध्ये उल्लेख होत असे. येत्या वर्षभरात हाच समभाग ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी’ परतावा देईल अशी शक्यता वाटते.
टाटा स्टील या कंपनीची स्थापना १९०७ मध्ये झाली. २८ दशलक्ष टन क्षमता असलेली ही कंपनी जगातील एक आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी आहे. जगातील २६ देशांमध्ये उत्पादन होत असलेल्या कंपनीत जगाच्या पाचही खंडात मिळून ८१,००० कर्मचारी आहेत. ५० देशात कंपनीची कार्यालये आहेत. टाटा स्टील (इंडिया), टाटा स्टील युरोप (आधीची कोरस), टाटा स्टील थायलंड, नॅटस्टील सिंगापूर या टाटा स्टीलच्या प्रमुख उपकंपन्या आहेत. टाटा स्टीलची उत्पादने वाहन, बांधकाम, यंत्र सामुग्री, औद्योगिक उत्पादने, रेल्वे, जहाज बांधणी, तेल व नसíगक वायू संरक्षण, विविध वेष्टने या उद्योगात वापरली जातात. पोलाद उत्पादकांची नफाक्षमता लोह खनिजांच्या किंमती व तयार लोखंडाच्या किंमती यावर ठरते. तयार लोखंडाच्या किंमती गेल्या काही वर्षांत आíथक मंदीमुळे फारशी वाढ झालेली नाही. परंतु लंडन मेटल एक्सचेंजवर पोलादाच्या किमतीत गेले तीन महिने सतत वाढ होत आहे. भारतात पर्यावरणाच्या कारणा वरून खनिजे काढण्यावर असलेल्या बंदीमुळे लोह खनिजाच्या किमतीत सतत वाढ होत आहे. परंतू गेल्या सहा महिन्यात लोह खनिजाच्या किमती काहीशा स्थिर झाल्या आहेत तर आता पोलादाच्या किमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे या पूर्ण वर्षांचे विक्रीचे आकडे जाहीर होतील तेव्हा नफाक्षमता सुधारलेली दिसून येईल. तसेच टाटा स्टील युरोप मागील वर्षांच्या चौथ्या तिमाही पासून फायद्यात येणे अपेक्षित होते.    
टाटा स्टीलने महात्वाकांशी विस्ताराच्या योजना आखल्या आहेत. २०१५ पर्यंत टाटा स्टीलची पोलाद उत्पादनाची वार्षकि क्षमता १०० दशलक्ष टन असेल. पकी ५०% क्षमता ही सध्याच्या क्षमतेचा विस्तार करून तर ५०%  नवीन क्षमता स्थापित करून हे उद्दीष्ट साध्य करण्याचे कंपनीने योजिले आहे. यात दोन टप्प्यात मिळून ६ दशलक्ष टन (सध्याच्या जमशेदपुरच्या क्षमतेच्या दुप्पट) ओडिशा राज्यात किलगानगर इथे प्रकल्प, जमशेदपूर येथील क्षमता १० दशलक्ष टन करणे, २.५ दशलक्ष टन क्षमता बांगलादेश येथे, ३ दशलक्ष टन इराण तर ६ दशलक्ष टन क्षमता कर्नाटकातील हावेरी येथे स्थापित होणार आहे. आज मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत भारतात सर्वात मोठा सुरु असलेला टाटा स्टीलचा प्रकल्प हा किलगानगरच आहे. पहिल्या टप्प्यातील यंत्र सामुग्रीची मागणी नोंदवून झाली आहे व कारखान्याच्या इमारती व रस्ते यांचे काम चालू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०१४ मध्ये सुरु होणे अपेक्षित आहे. तर दुसरा टप्पा त्यानंतर १८ ते २० महिन्यात कार्यरत होईल. मुळ रु. ३४५ अब्ज खर्चाचा असलेला हा प्रकल्प रुपयाचे अवमूल्यन, ४-६ महिने प्रकल्पाचे रेंगाळणे यामुळे प्रकल्प खर्चात १८-२०% वाढ अपेक्षित आहे. तसेच अनेकदा पोलाद कंपन्यात प्रकल्प उभारल्यावर अपेक्षित उत्पादनाची पातळी गाठायला वेळ लागतो. याचा परिणाम कंपनीच्या नफा क्षमतेवर होउ शकतो. गेल्या तीन तिमाहित या कंपनीला तोटा झाला असल्यामुळे या शेअरबाबत नकारात्मक दृष्टीकोन बाजारात दिसत आहे. थोडासा धोका पत्करण्याची तयारी असेल तर या तिमाहीत तोटय़ाचे प्रमाण कमी असेल व अर्थ संकल्पातील काही घोषणा कंपनीच्या भावावर सकारात्मक परिणाम करतील या अपेक्षेने हा शेअर घ्यावा. जर धोका टाळायचा असेल तर अर्थसंकल्पानंतर विचार करायला हरकत नाही.  
टाटा स्टील लिमिटेड
बंद भाव     :    रु ४००.७५ (१ फेब्रु. रोजी)
दर्शनी मूल्य     :    रु. १०
वर्षांतील उच्चांक     :    रु. ५००.९०
वर्षांतील नीचांक     :    रु. ३४७.५५

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा