|| सुधीर जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ओमायक्रॉनच्या संसर्गाची भीती अधूनमधून डोके वर काढत असल्याने भांडवली बाजार पुन्हा सावध होतो. सरलेल्या सप्ताहातही ओमायक्रॉनच्या वृत्ताबरोबर महागाईचे वाढते आकडे व फेडरल रिझर्व्ह, ईसीबी या अनुक्रमे अमेरिकी व युरोपियन मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरासंबंधित बैठकांच्या पार्श्वभूमीवर बाजाराने सुरुवातीपासून सावध पवित्रा घेतला होता. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने रोखे खरेदीची मात्रा दुप्पट दराने कमी केली व ही योजना लवकर गुंडाळण्याचे संकेत दिले. परदेशी गुंतवणूक संस्थांनी वर्षअखेर नफावसुलीचे धोरण सुरूच ठेवले आणि बाजारात सरलेल्या सप्ताहात तब्बल तीन टक्क्यांची घसरण झाली. याला अपवाद ठरले माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग. अॅक्सेंच्युअरने भविष्यातील कामगिरीबाबत दिलेले दमदार संकेत व रुपयाची डॉलरच्या तुलनेतील घसरण यामुळे या क्षेत्राचा निर्देशांक दोन टक्के वधारला.
बजाज फायनान्स :
रिझर्व्ह बँकेने बिगरबँकिंग वित्तीय संस्थांना (एनबीएफसी) ‘त्वरित सुधारात्मक कृती (पीसीए)’ आराखड्याच्या सुधारित नियमनाच्या चौकटीत आणले. त्यामुळे त्यांच्या कारभारावर रिझर्व्ह बँकेचा अंकुश असेल. सामान्य ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी ही चांगली नियमावली असली तरी या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. कारण नियमबाह्य घटनांमुळे त्यांच्या कर्ज वितरणावर व परिणामी नफ्यावर परिणाम होऊ शकतो. बाजारात घसरलेल्या एनबीएफसी क्षेत्रातील बजाज फायनान्समधील घसरण प्रकर्षाने जाणवली. हा समभाग सरलेल्या सप्ताहात साडेसात टक्क्यांनी खाली आला. ‘सीएलएसए’च्या वित्तीय विश्लेषकांनी कंपनीच्या पतमानांकनात घट करून मध्यम कालावधीसाठी कंपनीच्या नफ्याबाबत काळजी व्यक्त केली. तरीदेखील दीर्घ मुदतीसाठी बजाज फायनान्स साडेसहा हजारांच्या आसपास खरेदीसाठी चांगला आहे.
टीटीके प्रेस्टीज :
या कंपनीच्या दहा रुपये दर्शनी मूल्याच्या समभागाचे एक रुपये दर्शनी मूल्याच्या समभागात रूपांतर झाले. त्यामुळे ते आता १,१०० रुपयांच्या आसपास मिळत आहेत. कंपनी प्रेशर कुकर व स्वयंपाकघरातील आधुनिक उपकरणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. कंपनीने गुजरातमध्ये वार्षिक चार दशलक्ष उपकरणांच्या निर्मितीची क्षमता विकसित केली आहे. लहान शहरात विक्री व्यवस्था विकसित करून कंपनी येत्या चार वर्षांत पाच हजार कोटींच्या उलाढालीकडे वाटचाल करीत आहे. कंपनीच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षांत सातत्याने २० टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्याच्या बाजारभावात गुंतवणुकीची संधी आहे.
बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड : ही कंपनी मुख्यत: ‘ऑफ-हायवे’ टायर्सच्या व्यवसायात कार्यरत आहे. ज्यात कृषी व औद्योगिक साहित्य हाताळणी, वनीकरण, बागा, गृहनिर्माण व रस्ते बांधकाम, खाणी अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या टायरची मागणी असते. कंपनीची ७८ टक्के उत्पादने निर्यात होतात. देशांतर्गत बाजारपेठेत कंपनी सर्व प्रमुख बांधकाम उपकरणे निर्मात्यांना व ट्रॅक्टर निर्मात्यांना टायर पुरवते. पायाभूत सुविधांच्या नव्या योजना व जागतिक औद्योगिक उलाढालीमधील वाढ कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढवेल. कंपनीचा बक्षिस समभाग (बोनस) व लाभांश देण्याचा इतिहास चांगला आहे. सध्याचा बाजारभाव एक वर्षाच्या मुदतीत चांगला फायदा करून देईल.
गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स : गुडनाईट, सिन्थॉल, ईझी, मॅजिक हॅण्ड वॉश, एअर पॉकेट अशा घरगुती वापरातील कीटकनाशक, जंतुनाशक व स्वच्छतेशी निगडित नाममुद्रांची मालकी असणाऱ्या या कंपनीचे समभाग त्यांच्या गेल्या वर्षातील उच्चांकावरून १७ टक्के खाली आले आहेत. इंडोनेशियातील व भारतातील विक्रीला फटका बसल्यामुळे कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत आले त्याचा हा परिणाम होता. पण हा कालखंडाकडे एक अपवाद म्हणून बघायला हरकत नाही. कंपनीच्या मुख्य संचालकपदी हिंदुस्तान युनिलिव्हरमधून २२ वर्षांचा अनुभव घेऊन आलेले सुधीर सितापती यांची दोन महिन्यांपूर्वी नेमणूक झाली आहे. कंपनीने जम्बो फास्ट कार्ड, शाम्पूयुक्त केसाचा रंग, पावडर स्वरूपातील हॅण्ड वॉश अशी नवकल्पनांवर आधारित उत्पादने नुकतीच सादर केली आहेत. कंपनी लवकरच पूर्वीच्या जोमाने प्रगती करेल. समभागांच्या सध्याच्या बाजारभावात एक वर्षाच्या मुदतीच्या गुंतवणुकीसाठी संधी आहे.
सध्या बाजारात सुरू असलेली घसरण ही मूलभूत संकटाने आलेली नाही. ती बाजारातील कालस्वरूप चढ-उतारांचा भाग आहे. आगामी वर्षातही ओमायक्रॉनसारख्या विषाणूच्या अवतारांची भीती कायमच असेल. अमेरिकी फेडरल बँक व्याजदरात दोन ते तीन वेळा वाढ करेल. भारतामध्ये महागाई व व्याजदर वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे बाजारातील सरसकट परतावा गेल्या वर्षीसारखा असणार नाही. पण भारताची अर्थव्यवस्था नवी झेप घेईल. त्यामुळे चोखंदळपणे निवडलेले समभाग चांगला फायदा देतील. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र हे नेहमीच सर्वांच्या पुढे असेल. चीनला पर्याय म्हणून विशिष्ट रसायन उत्पादनांसाठी भारताकडे बघितले जाईल. बँकिंग क्षेत्राची कार्यक्षमता व नफा क्षमता वाढेल. भारतातील पायाभूत विकास व औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचे बँकिंग क्षेत्र हे सर्वात जास्त लाभार्थी असेल. त्यामुळे या क्षेत्रांमधील समभाग गुंतवणुकीसाठी फायद्याचे ठरतील.
sudhirjoshi23@gmail.com