२०१२ मध्ये ज्या काही सुधारणा झाल्या आहेत आणि त्यांचे गुंतवणुकीवर आणि गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार आहेत हे समजून घेतले तर भविष्यातील समस्यांवर मात करणे शक्य होईल. तहान लागल्यावर विहीर खोदायची गरज भासणार नाही.
वैयक्तिक वित्तव्यवस्थेबाबत २०१२ हे वर्ष अतिशय अनन्यसाधारण होते. आपल्या देशात आणि जागतिक पातळीवरही गुंतवणुकदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत अनेक पावले उचलली गेली. २०१३ मध्येही त्या संबंधाने अनेक बदल होणार आहेत. हे सर्व बदल लक्षात घेऊन त्यानुसार नवीन वर्षांमधील गुंतवणुकीबाबतचे निर्णय घेणे अपरिहार्य आहे.
२०१२ मध्ये ज्या काही सुधारणा झाल्या आहेत आणि त्यांचे गुंतवणुकीवर आणि गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार आहेत हे समजून घेतले तर भविष्यातील समस्यांवर मात करणे शक्य होईल. तहान लागल्यावर विहीर खोदायची गरज भासणार नाही.
’    केवायसी (नो यूअर कस्टमर) :
    २०१२ मध्ये याबाबतीत सर्वात समाधानकारक बदल म्हणजे आíथक बाजारातील – शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डिपॉझिटरी वगरेंसारख्या घटकांमधील गुंतवणुकीसाठी/खाते सुरू करण्यासाठी आता एकच समान के.वाय.सी. लागू होणार आहे. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांनी ‘हुश्श’ केले आहे. प्रत्येक ठिकाणी एक छायाचित्र द्या, इतर कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडा वगरे त्रासांमधून त्यांची सुटका झालेली आहे. १ जानेवारी २०१२ पूर्वी ज्यांनी के.वाय.सी. केलेली आहे त्यांना ती अपडेट करावी लागणार आहे. परंतु भविष्यातील त्रास मात्र कायमचा वाचणार आहे.
’    म्युच्युअल फंड  :
    २०१२ म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुक अधिक पारदर्शक करण्यात आलेली आहे. गुंतवणुकदारांच्या हिताच्या दृष्टीने अनेक नवीन नियम यात समाविष्ट केले आहेत. १ फेब्रुवारी २०१३ पासून स्वत:हून (विक्रेत्याशिवाय) केलेल्या गुंतवणुकीचे ‘एनएव्ही’ वेगळे असणार आहेत. जे गुंतवणुकदार स्वत:चे निर्णय घेऊ शकतात. त्यांच्यासाठी हा बदल लाभदायक आहे. सामान्य गुंतवणुकदारांचे हित कितपत साधले जाणार आहे. त्याबद्दल शंकाच आहे. तज्ञांचा सल्ला घ्यावयाचा असेल तर त्यांची किंमत मोजावी लागणार आहे. या संपूर्ण नियमावलीमुळे म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक जास्त फायदेशीर होणार आहे, असा नियंत्रकांचा दावा आहे. गुंतवणुकीच्या मूळ तत्वामध्ये ‘म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक अल्पकालावधीत भरघोस परतावा मिळविण्याच्या उद्देशाने नाही तर दीर्घकाळासाठीची ध्येय साध्य करण्यासाठी आहे’ असा – काहीही फरक करण्यात आलेला नाही.
’    आरोग्य विमा :
    या प्रकारच्या विमा उपभोक्यांसाठी २०१२ हे वर्ष अतिशय छान होते. या क्षेत्रामध्ये काही नवीन कंपन्यांना परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे काही खास विमाप्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. आता ज्येष्ठांनाही या विमा प्रकाराचा लाभ घेता येईल आणि तोही पूर्ण आयुष्यभरासाठी. ‘क्लेम सेटलमेंट’ची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. आणि जर तो नाकारण्यात आला तर सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत त्याबाबतची कारणमिमांसा नमूद करणे कंपनीला बंधनकारक आहे. २०१३ मध्येही काही नाविन्यपूर्ण प्रकार येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वत:च्या गरजेनुसार निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत.
’    जीवन विमा :
    या क्षेत्रामधेही अनेक बदल करण्यात आलेले आहेत. १ एप्रिल २०१२ नंतर वार्षकि प्रिमियम रकमेच्या दहा पट विमाछत्र असेल अशा विमा पॉलिसींबाबतच प्रिमियमच्या रकमेवर प्राप्तीकर सूट मिळणार आहे. पूर्वीसारख्या सरसकट सर्व पॉलिसींना हा लाभ मिळणार नाही. युलिप पॉलिसी बंद करायची असेल तर पूर्वीपेक्षा कमी नुकसान होणार आहे. २०१३ मध्ये पारंपरिक पॉलिसींच्या बाबतीतही अशाच प्रकारचे बदल  होऊ घातले आहेत. अजाणतेपणे किंवा कोणाच्या चुकीच्या सल्यामुळे गळ्यात पडलेल्या अनिष्ट पॉलिसी असलेल्या अनेक विमा ग्राहकांसाठी हे बदल स्वागतार्ह आहेत.
’    अल्प बचत :
    या क्षेत्रामध्ये २०१२ मध्ये फारसे फेरफार झालेले नाहीत. व्याजदरांमधे वाढ केलेली आहे. त्यामुळे एन.एस.सी.सारख्या दर्जामध्ये गुंतवणूक उच्च दराने गोठवून टाकण्याची संधी प्राप्त झाली आहे. पी.पी.एफ.मधील गुंतवणूक वाढीव व्याजदरामुळे पूर्वीपेक्षा जास्त किफायतशीर झालेली आहे.
’    प्राप्तीकर सूट:
    पूर्वी अतिशय लोकप्रिय झालेले पायाभूत रोखे २०१२ मध्ये बंद करण्यात आले. नवीन गुंतवणुकदारांना शेअर बाजाराकडे आकर्षति करण्यासाठी ‘राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम’ तयार करण्यात आलेली आहे. नवीन गुंतवणूकदारांना रु. ५०,००० पर्यंतच्या शेअर खरेदीवर ५०% ची प्राप्तीकर सूट मिळणार आहे. याचा लाभ मात्र आयुष्यात एकदाच घेता येणार आहे आणि गुंतवणुकीचा ‘लॉक इन पिरियड’ ३ वर्षे आहे.
२०१३ मध्येही अनेक बदल होणार आहेत. आणि त्यांचा वैयक्तिक गुंतवणुकीसाठी फायदा करून घेणे आपल्या हातात आहे. यासाठी थोडासा वेळ खर्च करून २०१३ साठीचे नियोजन करण्यासाठी काय करता येईल त्याचा आढावा घेऊया –
सर्वप्रथम स्वत:ची आíथक साक्षरता वाढविणे अपरिहार्य आहे. त्यामुळे कोणीही दिलेला सल्ला योग्य आहे की नाही याची खातरजमा करता येईल. त्यासाठी त्या विषयावरील पुस्तके, चर्चासत्रे, संकेतस्थळ वगरेंची मदत घेणे आवश्यक आहे.
चुकीच्या गुंतवणुकीमधून नफा-नुकसान याचा विचार न करता बाहेर पडणे गरजेचे आहे. ज्या गुंतवणुकीमधे आज ५०% नुकसान आहे त्यामधे ते भरून काढण्यासाठी १००% फायदा होणे आवश्यक असते. ती रक्कम त्याच पर्यायामध्ये राहू देण्यापेक्षा दुसऱ्या चांगल्या पर्यायाचा आसरा घेतला तर नुकसान लवकर भरून निघते.
कोणीतरी ‘हॉट टीप’ देतो तेव्हा त्यामध्ये आंधळ्यासारखी गुंतवणूक करणे टाळावे. ‘घर वार वेचिने लेई ले जो, महिनामा मालामाल येई जासो’ अशाप्रकारचे सल्ला देणारे ‘वॉरन बफेट’चे बाप पावला पावलावर भेटतात. त्यांचा सल्ला पारखून घ्यावा. आíथक बाजाराशी संबिंधत लोकांच्या ओळखी अशावेळी फार कामाच्या असतात.
आपल्या हातून अनाहूतपणे अनेक वायफळ खर्च होत असतात. दर महिन्याला त्यापकी एका खर्चाबाबत सखोल विचार करून काही काटछाट करण्याचा कायम प्रयत्न करावा. वाचवलेला प्रत्येक रुपया त्वरित गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये जाईल आणि बँकेच्या बचत खात्यामध्ये कमीत कमी पसे असतील याची खबरदारी घ्यावी.
स्वत:च्या बाबतीत जीवन विम्याचा परामर्ष घेणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस उत्पन्न आणि खर्च हे दोन्हीही वाढत आहेत. आजपासून १५ ते २० वर्षांनी माझी पशाची आवक काय असेल आणि खर्च (१०% भाववाढीनुसार) किती असेल त्याचा अंदाज घेऊन आपले विमाछत्र वाढविणे आवश्यक आहे. आज ३५ वर्षांच्या व्यक्तीच्या कुटुंबाचा फक्त जगण्याचा मासिक खर्च रु. १५,००० गृहित धरला तर त्याच राहाणीमानाखाली ५५ व्या वर्षी खर्च असेल १ लाख रुपये. अशा परिस्थितीत ५ किंवा १० लाखाच्या विमाछत्राने त्या कुटुंबाचा एक वर्षही निभाव लागणार नाही. त्यामुळे चुकीच्या विमा पॉलिसी असतील तर त्यातून वेळीच बाहेर पडून मोठे विमाछत्र घेणे आवश्यक आहे.
आपण दरवर्षी काहीतरी नियोजन करतो आणि कालांतराने विसरून जातो. या वर्षीचे नियोजन काटेकोरपणे अंमलात आणणार असा संकल्प केला तर बरेच काही साध्य करता येईल.
(लेखक व्यावसायिक वित्तीय नियोजनकार आहेत.)

Story img Loader