av-08

niyojanसंपत्ती व्यवस्थापनात विम्याच्या पारंपरिक योजना काहीच कामाच्या नाहीत. ती मुळात गुंतवणूक नाहीच, तसाच कुणी समज करून घेतला तरी ‘भरकटलेली गुंतवणूक’ आहे, हे समजावून देणारे हे नियोजन..
हर्षदा (वय ४२) या मध्य पूर्वेतील देशात मुख्यालय असलेल्या एका विमान कंपनीत उपाध्यक्ष (गुणवत्ता नियंत्रण) या पदावर कार्यरत आहेत. या विमान कंपनीच्या विमानात प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा राखणे हे त्यांच्या कामाचे स्वरुप आहे. कर पात्रतेच्या दृष्टीने त्या अनिवासी भारतीय असल्याने त्यांचे वेतन भारतात करपात्र नाही. साहजिकच त्यांनी गुंतवलेल्या ठेवी या डॉलर देऊन केलेल्या असल्याने त्यावरील व्याजही करमुक्त आहे. त्यांनी जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्त्यावरील एका संकुलात टुबीएचके सदनिका जुल २००८ मध्ये खरेदी केली. यासाठी घेतलेल्या कर्जापकी ५६ लाखांची कर्जफेड शिल्लक आहे. नोकरीत असेपर्यंत जगभरात कुठल्याही रुग्णालयात त्या दाखल झाल्या तरी त्यांना आरोग्य विम्याचे मोठे कवच ‘मेडिक्लेम पॉलिसी’ वगैरे त्यांच्या कंपनीने त्यांना दिले आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा व विम्याचा तपशील सोबत दिला आहे.
नोकरीच्या सुरवातीच्या काळात भारतीय विमान कंपनीत हवाईसुंदरी असलेल्या हर्षला यांनी आदरातिथ्य व्यवसायात २० वर्षांचा अनुभव घेत असतानाच स्वत:ची शैक्षणिक पात्रता वाढविली. आता त्या एका आंतरराष्ट्रीय विमान कंपनीच्या दर्जा नियंत्रण खात्याच्या प्रमुख म्हणून आहेत. सेवा क्षेत्रांतील ग्राहकांचे समाधान (ू४२३ेी१ २ं३्र२ऋूं३्रल्ल) या विषयातील त्या तज्ज्ञ आहेत.
अनेकदा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विमा व गुंतवणुकीचा तपशील हाती येतो तेव्हाच त्या व्यक्तीच्या अर्थसाक्षरतेचा अनुभव येतो. हर्षदा यांनी चार वर्षांपूर्वी एका नियोजनकाराकडून नियोजन करून घेतले. म्युच्युअल फंडाच्या विक्रेत्यांना देण्यात येणारे मानधन (कमिशन) बंद झाले या दरम्यानची ही गोष्ट आहे. हर्षला आपल्या गृहकर्जावर १० टक्क्यांहून अधिक व्याज देत असताना गृहकर्ज फेडावे किंवा त्यांना १० टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या योजनांची शिफारस करणे आवश्यक होते. साहजिकच १० टक्क्य़ांहून अधिक परतावा देणारी म्युच्युअल फंडात त्यांनी गुंतवणूक करावी असे नियोजन करून आपल्या अशिलाचे हित जपण्यापेक्षा स्वत: विमा विक्रेता असलेल्या या नियोजनकाराने विम्यासोबत गुंतवणूक असलेली व ४-४.५० टक्के परतावा असलेली योजना विकणे पसंत केले. या योजनांतून त्यांना पुरेसे विमा छत्रही मिळू शकले नाही. या नियोजनकाराने अपुरे विमा छत्र देणाऱ्या जीवन विमा पॉलिसी विकून स्वहित जपणे पसंत केले. अनेक वित्तीय नियोजनकारांचा जवळचा नातेवाईक हा विमा किंवा म्युच्युअल फंड विक्रेता असतो व त्याच्याकडून या पॉलिसी किंवा म्युच्युअल फंड खरेदी करावे, असा आग्रह असतो. अशा आग्रहामुळे फसवणुकीला वाव असल्याने सेबीचा नियोजनकारविक्रेता नसावा हा दृष्टीकोन आहे तो या साठीच.
अनेकदा गृहकर्जदार प्राप्तीकर वाचावा या साठी व रोकड सुलभता आटेल म्हणून शक्य असूनही कर्जफेड करत नाही. हर्षदा यांच्याकडे रोकड सुलभता आहे व त्यांचे उत्पन्न करमुक्त असल्याने देत असलेल्या व्याजावर व परतफेड करत असलेल्या कर्जावर कर बचत होण्याचा प्रश्नच येत नाही. हर्षदा यांनी ज्या मुदत ठेवी केल्या आहेत त्यांची मुदतपूर्ती झाल्यानंतर त्याचा विनियोग कर्ज फेडण्यासाठी करावा.  
वास्तवात विचार केल्यास हर्षदा यांना जीवन विम्याची आवश्यकता नाही. कारण त्यांच्यावर कोणाचीही जबाबदारी नाही. परंतु त्यांच्यावर ५६ लाखांचे कर्ज आहे. बहुसंख्य योजना त्यांनी मोठी रोकड सुलभता असल्याने विकत घेतल्या आहेत. भविष्यात एखाद्या अपघाताने हर्षदा यांना अंशत: किंवा पूर्ण अपंगत्व आले व नोकरी करणे शक्य झाले नाही तरी कर्ज फेडण्याची जबाबदारी पार पाडावीच लागेल. अपघाताने अंशत: किंवा पूर्ण अपंगत्व आले तर भरपाई देण्याचे सर्वसाधारण विमा कंपन्यांचे व जीवन विमा कंपन्यांचे नियम वेगवेगळे आहेत. सेवा निवृत्तीनंतर तुम्हाला औषध उपचारांच्यासाठी खर्चासाठीचे संरक्षण मिळणार नाही. तेव्हा एक स्वत:ची मेडिक्लेम पॉलिसी हवी. ‘प्री-एक्झििस्टग डिसीजेस’ अर्थात पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच्या रोगांना तीन वर्षांपर्यंत संरक्षण मिळत नाही. म्हणून नोकरी सोडण्यापूर्वी तीन वष्रे आधी मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करावी.
सध्याच्या मुदत ठेवी व अनुक्रमे २०१७ मध्ये मुदतपूर्ती होणाऱ्या विमा योजना, याच्या जोडीला अतिरिक्त वार्षकि ६ लाख कर्ज फेडण्यासाठी वापरावे. ३१ मार्च २०१७ पर्यंत सर्व कर्ज फिटेल असे नियोजन केले आहे. उर्वरित एक लाख शिलकीचे नियोजन करण्याची विनंती त्यांनी नियोजनकाराला केली. एखादी निवृत्ती योजना घेण्याची इच्छा आहे. त्यांनी आताच निवृत्ती योजना घेण्याची घाई करू नये. सध्याच्या विमा कंपन्यांच्या निवृत्ती योजना अथवा सरकारची ‘न्यू पेन्शन स्कीम’ हर्षदा यांच्यासाठी फारशा आकर्षक नाही. हर्षदा यांचे वय व रोकड सुलभता लक्षात घेऊन लगेचच निवृत्त वेतन खाते उघडण्याची घाई करू नये. हर्षदा या मुंबईत राहिल्या तर मासिक खर्च ४० हजार रुपये आला असता, असा अंदाज बांधला. सध्या त्यांचा सर्वात मोठा खर्च त्यांच्या हाऊसिंग सोसायटीला देय असलेला आहे. दरमहा १४ हजार त्यांना त्यांना द्यावे लागतात. तेव्हा त्या मुंबईत राहिल्या असत्या तर ५०-५५ हजार त्यांचे खर्च झाले असते, असा अंदाज केला. मध्य पूर्वेत पेट्रोल व मोटारी स्वस्त आहेत. भारतात नाहीत. म्हणून हा व्यक्त केलेला अंदाज त्यांना पटला. त्या सेवानिवृत्त होतील तेव्हा त्यांचा मासिक खर्च २ लाख असेल. त्या पुढील १८ वष्रे कमावत्या असतील व ८० वष्रे जगतील या गृहितकावर पुढील २० वर्षांत त्यांना ४ कोटींचा सेवा निवृत्तीकोष जमवावा लागेल. या पकी दीड कोटी त्यांना भविष्य निर्वाह निधीतून मिळेल. उर्वरित निधीसाठी त्यांनी ‘लोकसत्ता कत्रे-म्युच्युअल फंड’ यादीतून दोन लार्ज कॅप दोन मिड कॅप अशा चार इक्विटी फंडांची निवड करून एसआयपी पुढील १० वर्षांसाठी सुरू करणे आवश्यक आहे. संपत्ती व्यवस्थापनात आपण घेतलेल्या पारंपरिक योजना कामाच्या नाहीत. आज सर्वच खाजगी बँका, प्रमुख दलाली पेढय़ा संपत्ती व्यवस्थापनविषयक सेवा पुरवितात यापकी एखाद्या बँकेचे नोंदणीकृत ग्राहक व्हावे व योग्य सल्लागाराच्या मदतीने आपले आíथक नियोजन करावे.
 shreeyachebaba@gmail.com

Story img Loader