सचिन बाळासाहेब िशदे. मुक्काम पोस्ट वडाळा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी. आई-वडील, पत्नी व कन्या तेजस्विनी असे शिंदे यांचे कुटुंब. तेजस्विनी दहा महिन्यांची असून तिचा या वर्षीचा पहिलाच गणेशोत्सव आहे. लक्षार्थाने त्यांच्या घरी गौरीचे आगमन झाले आहे. ते स्वत: सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. पत्नी गृहिणी, तर वडील ‘डिस्कॉम’ अर्थात महावितरण या राज्य सरकारच्या उपक्रमात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वडील श्री.बाळासाहेब निवृत्ती िशदे हे ३१ मे २०१६ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीपूर्वी सहा महिने अगोदर म्हणजे यंदाच्या दिवाळीत १५ लाख तर निवृत्तीनंतर १५ लाख त्यांना मिळतील. त्यांच्या सेवाशर्तीनुसार ते निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र नाहीत. त्यांच्या समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे त्यांना व त्यांच्यापश्चात आईला उर्वरित आयुष्यात मासिक किमान २० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळावे. वडिलांच्या निवृत्ती लाभाची मग कशा पद्धतीने गुंतवणूक केली तर इतके दरमहा उत्पन्न मिळू शकेल, हा एक त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राहायला घर असून भविष्यात घरासाठी कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही त्यांच्या घरची नऊ एकर कोरडवाहू शेती असून ग्रामीण पाश्र्वभूमीचा विचार करता आई-वडिलांना तेवढे उत्पन्न पुरेसे आहे. मात्र त्यात वार्षकि ५-१०% वाढ मिळावी अशी अपेक्षा आहे. अशा पाश्र्वभूमीवर तेजस्विनीच्या शिक्षणासाठी व त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांचे स्वत:चे नियोजन कसे असावे हा दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
या सदराचा उद्देश वाचकांनी अर्थसाक्षर व्हावे हा आहे. जेव्हा कुणी ग्रामीण भागातील वाचक त्यांच्या नियोजनासंदर्भात विचारणा करतात तेव्हा या सदराचा प्राथमिक उद्देश सफल झाल्याचे समाधान वाटते.
सचिन शिंदे यांनी ओरिएंटल इन्शुरन्सची ७ लाख रूपये विमाछत्र देणारी आरोग्यविमा योजना घेतलेली आहे जी त्यांना पत्नी व मुलीबरोबर त्यांच्या आई-वडिलांनाही विमाछत्र देते. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर सचिन िशदे हे कुटुंबाचा मुख्य आíथक स्त्रोत असणार आहेत. पत्नी गृहिणी असणे व एक वर्षांची देखील नसलेली तेजस्विनी यांचा विचार करता घरातील मुख्य व एकमेव आíथक स्त्रोताला विम्याचे संरक्षण असणे जरुरीचे आहे. म्हणून सचिन िशदे यांनी स्वत:साठी ५० लाखांचा मुदतीचा विमा खरेदी करणे जरूरीचे आहे. सचिन यांनी ५० लाखांचा व २८ वष्रे मुदतीचा विमा खरेदी केला तर अंदाजे १२,६९८ रुपयांचा वार्षकि हप्ता भरावा लागेल. आरोग्य विम्याच्या आधी जीवन विम्याचा विचार होणे जरूरीचे होते.
तेजस्विनीचे वय लक्षात घेता दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने ६५ टक्के बचत मिड कॅप व ३५ टक्के बचत लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरेल. मिड कॅप गुंतवणुकीसाठी एसबीआय स्मॉल अँड मिड कॅप फंड (२०.२२ टक्के), अॅक्सिस मिड कॅप (२२.५६ टक्के) डीएसपी ब्लॅकरॉक स्मॉल अँड मिड कॅप फंड (१८.५८ टक्के) सुंदरम सिलेक्ट मिड कॅप फंड (२२.६७ टक्के), यूटीआय मिड कॅप फंड (२४.३६ टक्के), एचडीएफसी मिड कॅप फंड (२२.७६) या पकी दोन किंवा तीन फंडांची निवड करावी. लार्ज कॅप फंडांसाठी अॅक्सिस इक्विटी फंड (१२.१५ टक्के), आयसीआयसीआय फोकस ब्लूचीप (१४.२५ टक्के), कॅनरा रोबेको डायव्हर्सिफाईड इक्विटी (१०.०९) यापकी दोन फंडांची निवड करावी.
आता त्यांचे वडील बाळासाहेब िशदे यांच्या गुंतवणुकीकडे वळूया. बाळासाहेब िशदे यांच्यापुढील तीन पर्यायांचा विचार करू. पहिला त्वरित वर्षांसन सुरू होणारी (Immediate Annuity) या प्रकारची पॉलिसी खरेदी करणे. या प्रकारच्या पॉलिसीत पसे भरल्यापासून पुढील महिन्यापासून वर्षांसन सुरू होते. या पर्यायाचा विचार करणार असाल तर एलआयसीची जीवन अक्षय-४ ही अन्य पॉलिसीच्या तुलनेत अव्वल आहे. जीवन अक्षय-४ त्यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत वर्षांसन देते व मृत्यूनंतर वारसाला भरलेले पसे परत मिळतात. या पॉलिसीअंतर्गत वर्षांसन मिळण्याचे चार पर्याय उपलब्ध आहेत. विमा विक्रेत्याकडून हे चार पर्याय समजावून घेऊन योग्य त्याची निवड करावी. ज्यात प्रामुख्याने वारसास मुद्दल परत मिळणे वा न मिळणे हा पैलू समजावून घेणे आवश्यक आहे. एलआयसीने जीवन अक्षय-४ ही योजना ऑनलाईन खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.
दुसरा पर्याय म्हणजे दहा हजार भरून राष्ट्रीय पेन्शन योजनेचे (एनपीएस) खाते उघडणे. हे खाते उघडताना गुंतवणुकीसाठी १०० टक्के ‘कॉर्पोरेट बाँड’ हा पर्याय स्वीकारावा. पुढील वर्षभरात २५ लाखाचे योगदान एनपीएसमध्ये द्यावे लागेल. वर्षभरानंतर अंदाजे २२ हजार तहहयात पेन्शन मिळेल. वर्षांसनधारकाच्या मृत्यूनंतर ही तीस लाखाची मुद्दल वारसाला मिळेल. पाच लाख रुपये भांडवली वृद्धीसाठी लार्ज कॅप प्रकारच्या फंडात गुंतवावेत. ही रक्कम केवळ आणीबाणीच्या परिस्थितीत म्हणजे उपचारांचा मोठा खर्च असणाऱ्या आजारपण वैगरेसाठी वापरावयाची आहे. जेणेकरून पाच लाखांपर्यंतची रोकड सुलभता राहील व भांडवली वृद्धी देखील होईल. या दोन्ही प्रकारात वर्षांसन मिळते. परंतु मुद्दलाची रोकड सुलभता वयाच्या ८० पर्यंत असत नाही. एकदा का पेन्शनसाठी हप्ता भरला की २० वष्रे पसे किंवा आपण जो विकल्प स्वीकाराल त्याच्या शतीर्ंनुसार म्हणजे वयाच्या ८० वर्षांनंतर पसे मिळतात. पेन्शन मिळाली तरी रोकडसुलभता नसते. म्हणून तिसरा पर्याय सुचवीत आहे.
पहिल्या १२ महिन्यांसाठी लागणारी रक्कम रुपये २.४० लाख लिक्विड फंडात ठेवावी. या गुंतवणुकीवरील सध्याचा परताव्याचा दर सध्या ७.२५ टक्के आहे. रिझव्र्ह बँक येत्या २९ तारखेला रेपो दर कपातीविषयी निर्णय घेईल. रेपो दर कपातीचा निर्णय झाल्यास हा परताव्याचा दर कमी होईल. उर्वरित रक्कम २७.६० लाख एचडीएफसी बॅलेन्स्ड (१०.३४ टक्के), टाटा बॅलेन्स्ड (१०.२६ टक्के), आयसीआयसीआय बॅलेन्स्ड (१०.८७ टक्के), एसबीआय मॅग्नम बॅलेन्स्ड (९.२५ टक्के), डीएसपी ब्लॅकरॉक बॅलेन्स्ड (१२.२६ टक्के), कॅनरा रेबेको बॅलेन्स्ड (१२.३४ टक्के) या पकी चार बॅलेन्स्ड फंडाची निवड करावी. कंसातील परताव्याचा दर हा मागील पाच वष्रे एसआयपी पद्धतीने ‘ग्रोथ’ विकल्पात गुंतवणूक केलेल्यास मिळणाऱ्या परताव्याचा दर आहे. दर महिन्याला एका यानुसार प्रत्येक फंडातून वर्षांतून चार वेळा या प्रमाणे गरजेनुसार रक्कम काढावी. मागील परताव्याचा दर भविष्यातील परताव्याची खात्री देत नाही हा सेबीचा इशारा लक्षात घेऊन व आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घ्यायचा आहे.
चौथा व चाकोरीबाहेरचा पर्याय म्हणजे जवळच्या शहरात एक लहान व्यापारी जागा (दुकान) खरेदी करणे व हे दुकान एखाद्या बँकेला एटीएम साठी भाडय़ाने देणे. बँका साधारण पाच वर्षांसाठी करार करतात. या करारात भाडय़ात दर वर्षी ठरावीक टक्के वाढ करण्याचा पर्याय असतो. परंतु हा निर्णय घेताना दुकानाची किंमत, मिळणारे भाडे, भविष्यात या मालमत्तेच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता या बाबत मुंबईत बसून काही सल्ला देणे योग्य नाही. म्हणून सोलापूरमधील मालमत्ता विषयक तज्ज्ञाच्या मार्गदर्षनाचा लाभ घ्यावा.
( या सदराचा उद्देश वाचकांना अर्थसाक्षर करणे हा आहे. हे सदर कुठल्याही उत्पादन अथवा सेवेचा आग्रह धरत नाही. हे या निमित्ताने लक्षात घेणे गरजेचे आहे.)
shreeyachebaba@gmail.com
आली गौराई अंगणी..
सचिन बाळासाहेब िशदे. मुक्काम पोस्ट वडाळा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 21-09-2015 at 01:02 IST
TOPICSनियोजन भान
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial planning of shinde family