डॉ. आशीष थत्ते

व्यय आणि व्यवस्थापन शाखेमध्ये मर्यादित घटकांचे खूप महत्त्व  आहे. आम्ही उद्योगांना सल्ला देताना बऱ्याचदा याचा वापर करतो. म्हणजे जे उपलब्ध मर्यादित संसाधन आहेत, त्याचा अशा क्रमाने वापर करावा ज्यामुळे अधिकाधिक नफा होऊ शकेल. विशेषत: कारखान्यांमध्ये जेव्हा एखाद्या उत्पादन घटकांची उपलब्धता कमी होते किंवा कमतरता असते, तेव्हा तो घटक अत्यंत जपून वापरावा लागतो किंबहुना अशा प्रकारे वापरावा लागतो जेणेकरून प्रति मर्यादित घटक योगदान जास्तीत जास्त असेल. समजा उपाहारगृहात इडली आणि डोसा बनवण्याचे पीठ मर्यादित असेल तर मालक इडली उपलब्ध नाही, मात्र डोसा उपलब्ध आहे. कारण मर्यादित पिठात कुठे नफा अधिक मिळेल ते त्याला ठाऊक असते. यात काही विशेष व्यवस्थापन करावे लागत नाही, असे वाटणे साहजिक आहे. मात्र जेव्हा एकापेक्षा जास्त संसाधने मर्यादित होतात तेव्हा मात्र खरी कसोटी असते आणि कंपन्या याचे उत्तर अत्यंत किचकट गणिताने किंवा आलेखाच्या मदतीने मांडतात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आपण मात्र लहानपणापासूनच मर्यादित घटकांचा पुरेपूर वापर करतो. परीक्षेत प्रश्नप्रत्रिका सोडवताना वेळ कमी आणि भरपूर लिहायचे राहिले आहे, अशी परिस्थिती बऱ्याचदा आली असेल. तेव्हा अजाणतेपणे मर्यादित घटक म्हणजे वेळेचे गणित मांडून सोपे प्रश्न किंवा प्रतिमिनिट कुठल्या प्रश्नाला जास्त गुण मिळतील असा प्रश्न पहिले सोडवतो. तीर्थयात्रेला जाताना सहसा कुणी विमानाने जात नाहीत. (सन्मानीय अपवाद वगळता) कारण पैसा हा मर्यादित घटक असतो आणि वेळ मुबलक असतो. मात्र हल्लीची मुले हनिमूनसाठी कधी रेल्वेने जाताना दिसत नाहीत. कारण वेळ मर्यादित असतो. कामावर जाताना देखील वेळ मर्यादित असेल तर रिक्षा किंवा रेडिओ टॅक्सी करून जातो. मुंबईत राहणारे आणि जगातील एक श्रीमंत उद्योगपती त्यांच्या पेडररोडवरील घरातून नव्या मुंबईमधील कार्यालयात चक्क हेलिकॉप्टरने जातात. म्हणजे अत्यंत नकळत आपण देखील उद्योगांप्रमाणेच प्रतिमिनिट किती उपयुक्तता आहे यावर निर्णय घेतो. आयुष्यात मर्यादित असणारा पैसा आपण कुठे खर्च करतो तेसुद्धा आपल्या यशाचे गमक असते. बऱ्याच वेळेला पालक आपल्या मौजमजेला फाटा देऊन मुलांच्या शिक्षणावर किंवा स्वत:च्या शिक्षणावर खर्च करतात.

मर्यादित घटक संकल्पना थोडी फिल्मी ढंगाने समजून घ्यायची असेल तर २०१९ साली आलेला मिशन मंगल चित्रपट परत एकदा आवर्जून पाहा.

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /

ashishpthatte@gmail.com

@AshishThatte

Story img Loader