फिनोलेक्स केबल्स ही फिनोलेक्स समूहाची पहिली कंपनी. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा विस्तार समूहाला मोठय़ा प्रगतीकडे नेणारा ठरला. इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन केबल्सचे उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी आणि आघाडीची कंपनी म्हणून फिनोलेक्सचा उल्लेख केला जातो. गेल्या काही वर्षांत गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही चांगलेच नाव कमावले आहे. कंपनीचे भारतात चार कारखाने असून त्यांपकी दोन पुण्यात िपपरी व उरसे येथे, तर इतर दोन उत्तराखंड आणि गोवा येथे आहेत. गेली दोन वर्षे कंपनीची शेअर बाजारातील कामगिरी तितकीशी चांगली नाही. याची दोन प्रमुख कारणे म्हणजे परदेशी विनिमयात झालेले नुकसान (Foreign Exchange losses) आणि अर्थात गेल्या दोन वर्षांतील व्यवसायातील मंदी. ज्या गुंतवणूकदारांकडे हा शेअर असेल त्यांना गेल्या काही वर्षांत नुकसानच झालेले असेल. मात्र यंदाच्या वर्षांत कंपनीने उत्तम आíथक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर २०१३ अखेर संपलेल्या तिमाहीचे निकालही अपेक्षेप्रमाणेच आहेत. कंपनीने ५५८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २४.४७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीचे उत्तराखंड येथील कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण झाले असून तेथील उत्पादन क्षमता आता दुपटीने वाढली आहे. तसेच परदेशी विनिमय तोटाही आता आवाक्यात असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम निकालांवर दिसून येईल. याखेरीज केबल्सचा विविध क्षेत्रांतील वाढता वापर, ग्राहकांमध्ये ब्रॅण्डेड केबल्स वापरण्यासंबंधी आलेली जागरूकता आणि कंपनीने जाहिरात आणि विपणन यावर दिलेला भर या सर्वाचा एकत्रित परिणाम येत्या आíथक वर्षांतील निकलांवर दिसून येईल. सध्या ७५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन मुदतीत फायद्याची गुंतवणूक ठरू शकेल.

Story img Loader