फंडाचा गुंतवणूक प्रकार: समभाग गुंतवणूक
जोखीम प्रकार : समभाग गुंतणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक: समभाग गुंतवणूक ८०% पेक्षा कमी नसेल व जास्तीत जास्त २०% गुंतवणूक रोखे प्रकारची असेल.
फंडाच्या परताव्याच्या : एस अँड पी बीएसई ५०० निर्देशांक
तुलनेसाठी निर्देशांक निधी व्यवस्थापक : आर जनकीरामन व आनंद राधाकृष्णन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. आर जानकीरामन यांनी गव्हर्नमेंट इंजीनियिरग कॉलेजमधून कोइम्बतुर येथून अभियांत्रिकीची पदवी व आयआयएम बंगळूरू येथून व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी घेतली आहे. निधी व्यवस्थापनाचा त्यांना चौदा वर्षांचा अनुभव आहे. आनंद राधाकृष्णन हे फ्रँकलिन टेम्पलटन इंडियाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.
गुंतवणूक पर्याय: वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे आउट व रिइन्व्हेंस्ट)
फंड खरेदीची पद्धती: फंड घराण्याच्या http://www.franklintempletonindia.comया संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने (डायरेक्ट प्लानमध्ये) किंवा म्युच्युअल फंड विक्रेत्या मार्फत येत्या आठवडय़ात निकालांच्या नवीन सत्राला प्रारंभ होईल. नफ्याची अपेक्षा व वास्तव यावर बाजाराची दिशा ठरेल. २९ सप्टेंबर १९९४ ला पहिले नक्त मालमत्ता मूल्य- एनएव्ही जाहीर झालेल्या फंडाचे २१ व्या वर्षांत एनएव्ही १० एप्रिल २०१५ रोजी ४६३.६५ (ग्रोथ रेग्युलर) होती. या फंडाने सुरुवातीपासून आजतागायत वार्षिक २२.२१ टक्के दराने परतावा दिला आहे. याच काळात निफ्टीने देलेल्या परताव्याचा दर ९.४४ टक्के तर फंडाचा संदर्भ निर्देशांक (बेंचमार्क) असलेल्या एस अँड पी बीएसई ५०० ने दिलेल्या परताव्याचा दर ९.५२ टक्के आहे. मागील एक वर्षांचा परताव्याचा दर ५६.७६ टक्के आहे. कुठल्याही लार्ज कॅप गुंतवणूक करणाऱ्या फंडाने दिलेल्या परताव्याचा हा अव्वल दर आहे. पाच व दहा वष्रे कालावधीत रिस्क अॅडजस्टेड रिटर्नच्या तुलनेत या फंडाचा परतावा समाधानकारक राहिला असला तरी मागील पाच तिमाहीत फंडाची कामगिरी आपल्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. फंडाच्या ८० टक्के गुंतवणुका या लार्ज कॅप प्रकारात (बाजार मूल्य १०,००० कोटींहून अधिक) मोडणाऱ्या असल्याने व मागील एका वर्षांत लार्ज कॅपपेक्षा मिड कॅप समभागांनी अधिक परतावा दिल्याने या फंडाची कामगिरी तुलनेने डावी ठरली.
फ्रँकलिन इंडिया प्रायमा प्लस फंडाच्या ४० टक्के गुंतवणूका बँक, माहिती तंत्रज्ञान व औषध निर्माण या पहिल्या तीन उद्योगक्षेत्रात आहेत. मागील सहा महिन्यात फंडाने बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक वाढवत एकूण गुंतवणुकीच्या २८ टक्क्यांवर नेली आहे. ही गुंतवणुकीची पातळी मागील पाच वर्षांतील कोणत्याही एकाच उद्योग क्षेत्रातील सर्वाधिक गुंतवणूक असलेली आहे. याचवेळी औषध निर्माण व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक कमी केली. नेमके हेच कारण एकेकाळी अव्वल परतावा असलेल्या या फंडाची कामगिरी सुमार होण्यास कारण ठरले. सध्या या फंडाने गुंतवणुकीचे संतुलन साधण्यासाठी मुख्य तीन उद्योगांच्या जोडीला व्यापारी वाहने, वाहन पूरक उद्योग, बांधकाम व अभियांत्रिकी उद्योगातील गुंतवणुका वाढविल्या आहेत. वाहन उद्योगात आयशर मोटर्स, टाटा मोटर्स आदी व्यापारी वाहन उत्पादकांच्या जोडीला कमिन्स व बॉश सारख्या दिग्गज वाहनपूरक उद्योगातील गुंतवणुकीत आहेत. योग्य मूल्यांकनात खरेदी केलेल्या कमिन्स, आयशर मोटर्स, भारत पेट्रोलियम सारख्या समभागांनी चढत्या बाजारात फंडाच्या चांगल्या परताव्याला हातभार लावला.
या फंडात पाच टक्के रोकड असणे हे दखल घेण्याजोगे आहे. निधी व्यवस्थापन योग्य संधीची वाट पाहात असल्याचे निधी व्यवस्थापकाचे म्हणणे म्हणूनच लक्षणीय आहे.
mutualfund.arthvruttant@gmail.com
फ्रँकलिन इंडिया प्रायमा प्लस फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार: समभाग गुंतवणूक जोखीम प्रकार : समभाग गुंतणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-04-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Franklin india prima plus fund analysis