बिर्ला सन लाइफ एमएनसी फंड
फंडाविषयक विवरण
फंड प्रकार : बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड
जोखीम प्रकार : समभाग गुंतवणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक : हा फंड समभाग गुंतवणूक करणारा फंड आहे. एस अॅण्ड पी बीएसई एमएनसी इंडेक्स हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. गुंतवणूक केल्यापासून १२ महिन्यांच्या आत बाहेर पडल्यास १ टक्का निर्गमन शुल्क लागू असेल. १२ महिन्यांनंतर बाहेर पडल्यास कोणतेही निर्गमन शुल्क लागू होत नाही.
फंड गंगाजळी : ३० नोव्हेंबर २०१५ रोजीच्या विवरण पत्रकानुसार २८०६ कोटी रुपये
निधी व्यवस्थापक: अजय गर्ग हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. बीई इलेक्ट्रिकल व एमबीए फायनान्स पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडात दाखल होण्याआधी ते बिर्ला सन लाइफ सिक्युरिटीजमध्ये काम करीत होते. बिर्ला सन लाइफ टॅक्स प्लान, बिर्ला सन लाइफ टॅक्स रिलीफ, बिर्ला सन लाइफ टॅक्स सेिव्हग्ज, बिर्ला सन लाइफ बाय इंडिया व अन्य फंडांचेही ते निधी व्यवस्थापक आहेत. त्यांना वीस वर्षांचा गुंतवणूक व्यवस्थापनाचा अनुभव आहे.
पर्याय : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती : पसंतीच्या विक्रेत्याकडून किंवा फंड घराण्याच्या ँ३३स्र्://े४३४ं’ऋ४ल्ल.ि्रु१’ं२४ल्ल’्रऋी.ूे या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा ९९६९७०३६४७ या क्रमांकावर ९ ते ५ या वेळेत फोन करून फंडाच्या युनिट्स खरेदी करता येतील.
गुंतवणुकीपूर्वी धोका समजून घ्या!
ल्ल बिर्ला सन लाइफ एमएनसी फंडाच्या सध्या एकूण गुंतवणुकीत पहिल्या पाच गुंतवणुकांचे प्रमाण ४० टक्के व पहिल्या दहा गुंतवणुकांचे प्रमाण ७० टक्के आहे. हा धोका गुंतवणुकीपूर्वी समजून घेणे आवश्यक आहे. समभागांची मर्यादित उपलब्धता व त्यामुळे गुंतवणुकीवर असणाऱ्या मर्यादांचा विचार केल्यास हा फंड या फंड घराण्याच्या बिर्ला सन लाइफ फ्रंट लाइन इक्विटी किंवा बिर्ला सन लाइफ इक्विटी यांसारख्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांतील गुंतवणुकीपेक्षा अधिक जोखीम असलेला फंड आहे. हे लक्षात घेऊन एकाच वेळी मोठी रक्कम गुंतविण्यापेक्षा ५ ते ७ वर्षांसाठी या फंडात दरमहा ठरावीक रक्कमेची ‘एसआयपी’ सुरूकरणे गुंतवणूकदारांना लाभदायक ठरेल. अशी एसआयपी सुरू केल्यास दीर्घ मुदतीच्या अल्प बचतीवर मोठा भांडवली नफा मिळविण्यासाठी आदर्श गुंतवणूक साधन म्हणून या फंडाचा विचार करावयास हरकत नाही. हा फंड ‘सेन्चुरी सिप इन्शुरन्स’साठी पात्र असणाऱ्या फंडाच्या यादीत समाविष्ट असल्याने १८ ते ४५ वय असलेल्या ‘सिप’ गुंतवणूकदारांना ‘सिप’ रकमेच्या शंभर पट विमा कवच मिळेल. दहा हजार रुपयांची ‘सिप’ सुरू केल्यास दहा लाखांचे विमा कवच नि:शुल्क मिळेल.
बिर्ला सन लाइफ एमएनसी फंड एका विशिष्ट सूत्राला धरून गुंतवणूक असलेला (ळँीें३्रू) फंड आहे. हा फंड बहुराष्ट्रीय कंपन्याच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या या उत्पादन केंद्रित व्यवसाय विस्तार करणाऱ्या व सुदृढ ताळेबंद असलेल्या कंपन्या असतात. असंबंद्ध विस्तार करणाऱ्या कंपन्या नसल्याने ताळेबंदात मोठी रोकड बाळगणाऱ्या व ही रोकड लाभांश व बक्षीस समभागांच्या रूपात समभागधारकांना परत देणाऱ्या या कंपन्या असतात.
साहजिकच या कंपन्या एखादा अपवाद वगळता गुंतवणूकदारस्नेही म्हणून ओळखल्या जातात. या कंपन्या त्यांच्या दर्जेदार व्यवस्थापन, उत्पादनाच्या बाजारपेठेत मोठा हिस्सा असल्याने त्यांचा ‘पी/ई’ नेहमीच निर्देशांकाच्या ‘पी/ई’पेक्षा अधिक असल्याने महाग असतात. म्हणूनच या कंपन्यांचा साहजिकच डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडात समावेश होताना अभावानेच आढळते.
या फंडाच्या गुंतवणूक परिघात ७० ते ८० कंपन्यांचा समावेश असून, गुंतवणूक धोरणाशी सुसंगत सहा उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश विद्यमान गुंतवणुकीत आहे. अशा सुसंगत क्षेत्रांपकी िहदुस्थान युनिलिव्हर, जिलेट, मारुती, बॉश, हनीवेल यांसारख्या कंपन्या आपापल्या उत्पादन गटात त्या त्या व्यवसायाचे नेतृत्व करतात. ही उत्पादने तयार करण्यासाठी लागणारे अद्ययावत तंत्रज्ञान या कंपन्यांच्या मातृ कंपन्यांकडून त्यांना मिळते. याचा परिणाम उत्पादन खर्च नियंत्रित असतो. त्या त्या व्यवसायाचे नेतृत्व या कंपन्या करीत असल्याने आपल्या उत्पादनाची किंमत ठरविण्याचे सामथ्र्य या कंपन्यांकडे असते. ताळेबंदात कर्जाचे अत्यल्प किंवा शून्य प्रमाण असल्याने त्यांना व्याज द्यावे लागत नाही. साहजिकच भांडवली परताव्याचा दर (आरओसी) आकर्षक असतो. दीर्घ मुदतीची गुंतवणूक केल्यास या कंपन्यांनी नेहमीच अव्वल परतावा दिला आहे. यापकी अनेक कंपन्यांच्या मातृ कंपन्या जगाच्या इतर बाजारपेठांत विकण्यासाठी आपली उत्पादने भारतातून निर्यात करतात. उदाहरणार्थ, कमिन्ससारखी कंपनी कमी अश्वशक्तीची डिझेल इंजिने भारतात तयार करीत आहे. मारुतीसुद्धा जागतिक बाजारपेठेत विकण्यासाठी आपली काही मॉडेल्स भारतातून निर्यात करीत आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचा फायदा या कंपन्या घेतील, असे फंड व्यवस्थापनास वाटते. उपलब्ध बहुराष्ट्रीय कंपन्यांची संख्या मर्यादित असल्याने फंड व्यवस्थापनास गुंतवणूक समभागांचे विकेंद्रीकरण करण्यास फारसा वाव नाही, हे मान्य करावेच लागेल.