सार्वजनिक क्षेत्रातील बँका व विमा कंपन्यांनी म्युच्युअल फंड व्यवसायात पाऊल ठेवल्याचे आपण मागील भागात पाहिले. सध्याचे पंतप्रधान डॉ. सिंग हे स्वत: अर्थमंत्री असतांना त्यांनी १९९३ मध्ये म्युच्युअल फंड व्यवसाय क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले केले. याचा परिणाम म्हणून ‘कोठारी पायोनियर म्युच्युअल फंड’ (ब्ल्यू चिप फंड) या खाजगी म्युच्युअल फंडाची स्थापना भारतीय विश्वस्त कायद्याखाली (१९८२) होऊन पुढे या फंडांची सेबी कायद्यानुसार नोंदणी करण्यात आली. पुढे हा फंड ‘फ्रॅन्कलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडा’मध्ये विलीन झाला. १९९३ मध्ये म्युच्युअल फंड व्यवसाय सेबीच्या अधिपत्याखाली आणण्यात आला. पुढे याला म्युच्युअल फंड नियंत्रक कायदा १९९६ असे संबोधण्यात आले. नंतरच्या १० वर्षांत अनेक विदेशी म्युच्युअल फंडांनी आपल्या कंपन्या स्थापन करून भारतीय बाजारात प्रवेश केला. याच काळात अनेक म्युच्युअल फंडानी आपले व्यवसाय दुसऱ्या फंडाना विकले. काही जण या व्यवसायात नव्याने दाखल झाले. २००३ मध्ये एकूण म्युच्युअल फंडांची संख्या ३३ होती आणि एकूण म्युच्युअल फंडांची मालमत्ता रु. १,२१,५०१ कोटी होती. भारतात प्रामुख्याने म्युच्युअल फंडांचे तीन प्रकार आहेत व त्यांचे उद्दिष्टानुसार उपप्रकार व योजना आहेत.
इक्विटी फंड : ज्याचा निधी मुख्यत्त्वे शेअरमध्ये गुंतविले जातो.
डेट फंड : ज्याचा निधी मुख्यत्त्वे विविध मुदतीच्या रोख्यांमध्ये गुंतवला जातो.
बॅलन्स फंड : ज्याचा निधी शेअर व रोखे या दोन्ही मालमत्ता प्रकारामध्ये ठरलेल्या प्रमाणात योग्य समन्वय साधून गुंतविला जातो.
आजच्या भागात एका योजनेऐवजी बॅलन्स फंडविषयी माहिती करून घेऊ.
बॅलन्स फंडाला ‘हायब्रीड फंड’ असे म्हटले जाते. भारतात बॅलन्स फंड म्हटले की ‘HDFC Prudence Fund'(१९९३) हे नाव डोळ्यासमोर येते. याची माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. बाजाराची दोलायमान स्थिती, चढ-उतार, वाढती महागाई, व्याजाच्या दरांमध्ये चढ – उतार, प्राप्तीकर तसेच बाजाराचा अंदाज चुकल्यामुळे मालमत्ता प्रकारामध्ये (Asset Class) चुकीची गुंतवणूक होऊ शकते. या गुंतवणूक समस्यांवर मात करण्यासाठी गुंतवणूकदारांनी बॅलन्स फंडाची निवड करावी जो Medium Risk, Medium Return देऊ शकतो.
बॅलन्स फंडाचे निधी व्यवस्थापक शेअर व रोखे यांच्यात ७०:३० किंवा ६५:३५ या गुणोत्तर प्रमाणात फंडाचा निधी गुंतवितात. निधी व्यवस्थापक, कंपनी ताळेबंद, बाजारातील तेजी – मंदीचा व व्याजदरांच्या चढ – उतारांचा, जगातील प्रमुख देशांच्या व आपल्या अर्थव्यवस्थेतील बदलांचा अंदाज घेऊन गुंतवणूक गुणोत्तर प्रमाण कमी जास्त करून त्यात समन्वय (Balance)  साधतात आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Return)  देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
जेव्हा एक मालमत्ता प्रकार (Asset Class) इक्विटी म्हणू तेजीवर स्वार असतो (तेव्हा निधी व्यवस्थापक फंडातील शेअरमधील गुंतवणूक योग्य तेव्हा विकून नफा कमवितात) तेव्हा दुसरा मालमत्ता प्रकार (Asset Class) डेट किवा रोखे बाजार कमी अधिक प्रमाणात मंदीमध्ये असू शकतो. त्यावेळी निधी व्यवस्थापक खालच्या भावामध्ये असलेल्या रोख्यांमध्ये आपला निधी गुंतवितात.
बॅलन्स फंडाचा सगळ्यात महत्वाचा फायदा (इक्विटी फंड नकारात्मक परतावा देत असताना) २००८ च्या मंदीमध्ये झाला. कारण अशा फंडाची रोखे बाजारातही गुंतवणूक असल्याने फंडांना मंदीची झळ कमी बसली आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना बॅलन्स फंडांचे महत्त्व कळले. सोबतच्या कोष्टकात प्रमुख फंडांचा मागील एक वर्षांचा – शेअर, रोखे व बॅलन्स फंडांचे तौलनिक परतावा (%) दिला आहे.
फंडाचा प्रकार          मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या/ योजना व  परतावा %
    एसबीआय    रिलायन्स    आयसीआयसीआय-प्रु.    एचडीएफसी
इक्विटी लार्ज     ब्ल्यूचिप    इक्विटी    फोकस्ड ब्ल्यूचिप    टॉप २००
कॅप फंड    २१.२     १५.३        १०.७        १०.३
इक्विटी     मिड कॅप    इक्विटी अपॉ.    डायनॅमिक    इक्विटी
डायव्हर्सिफाइड    १६.६      २०.९      १६.८        ११
बॅलन्स फंड    मॅग्नम    रेग्यु. सेव्हिंग    इक्विटी व्होलॅटिलिटी    प्रुडन्स
    २१.८       १६.३       १६.८        १०
डेट फंड     डायनॅमिक    इन्कम फंड    इन्कम अपॉ.    मीडियम टर्म
    बाँड १२.००      १०.६      १०.९     १०.५

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fund analysis balance fund
Show comments