लोकशिक्षणाचाच भाग असलेल्या अर्थसाक्षरतेतील ‘म्युच्युअल फंड’ संकल्पनेचे विवेचन व म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांचा आढावा घेणारी लेखमाला..
म्युच्युअल फंड म्हणजे मुंबई सार्वजनिक न्यास कायदा १९५० खालील नोंदविण्यात आलेला मूळात एक न्यासच असतो. हा न्यास मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीची नोंदणी करतो. उदाहरणादाखल एचडीएफसीचे म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन एचडीएफसी ट्रस्टी कंपनी पाहते आणि ही कंपनी एचडीएफसी लिमिटेड व स्टँडर्ड लाईफ इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या दोघांनी प्रवर्तित केली आहे.  एचडीएफसी व स्टँडर्ड लाईफ इन्व्हेस्टमेंट्स यांनी आपले प्रतिनिधी विश्वस्त म्हणून नेमलेले आहेत. एचडीएफसी ट्रस्टी कंपनीने एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी ही गुंतवणूक व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीची स्थापना केली असून ही कंपनी एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या योजना चालविते. म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत पसे गुंतविण्याचे अनेक फायदे आहेत. व्यवसायिक व्यवस्थापन म्हणजे गुंतवणूक-तज्ज्ञ या योजनांचे व्यवस्थापन पाहतात. योजनेच्या गुंतवणुकीत असणारी कंपन्यांची विविधता, वैयक्तिक गुंतवणूकदारास आणता येणे कठीण असते. मोठी गुंतवणूक असल्यामुळे गुंतवणुकीचा खर्च कमी असतो. गुंतवणुकीत द्रवता असते. कामकाजाच्या दिवशी रोज ‘एनएव्ही’ म्हणजे प्रति युनिट पुन:खरेदी मूल्य जाहीर होत असल्याने कधीही आपल्या मालकीची युनिट्सची विक्री करून  योजनेतून गुंतवणूक काढून घेता येते. या सर्व गोष्टीत पारदर्शकता असते. विविध योजनांच्या उद्दिष्टात वैविध्य असल्या कारणाने आपल्या गरजेप्रमाणे योजना निवडता येतात. म्युच्युअल फंडांच्या सर्व योजना भारतात सेबी नियंत्रणाखाली येतात.  
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बँकिंग-फायनान्शियल सर्व्हिसेस फंड
आज केवळ बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या मोजक्या चार योजना आहेत त्यामधील ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बँकिंग-फायनान्शियल सíव्हसेस फंड’ ही एक. या योजनेमधील गुंतवणूकदारांचा निधी बँका व वित्तीय सेवा कंपन्यांमध्ये गुंतविला जातो. एकूण निधीपकी  ८३.७३% बँकांच्या शेअरमध्ये ११.१६% वित्तीय सेवा कंपन्यांमध्ये ३.२०% इतर तर उर्वरीत २.९१% रोकडसदृश्य अल्पमुदतीच्या रोख्यांमध्ये गुंतविला आहे. योजनेचे उद्दिष्ट दीर्घकालीन गुंतवणूक करून भांडवली नफा कमावणे आहे. ही योजना सर्वप्रथम २२ ऑगस्ट २००८ या दिवशी विक्रीसाठी खुली झाली. ही योजना खरेदीसाठी खुली असून (Open Ended) असून यात भांडवलीवृद्धी व लाभांश असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. व्यंकटेश संजीवी हे या योजनेचे निधी व्यवस्थापन पाहतात, तर अतुल पटेल हे सह-व्यवस्थापक आहेत. मुंबई शेअर बाजाराचा बँकेक्स हा निर्देशांक या योजनेच्या परताव्याच्या तुलनेसाठी मानदंड म्हणून निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत किमान गुंतवणूक रु. ५,००० असून त्यानंतर रु. १०००च्या पटीत गुंतवणूक करता येते व किमान रु. १०००च्या पटीत या योजनेतून बाहेर पडता येते. या योजनेमध्ये ३१ डिसेंबर रोजी रु. १९५.४५ कोटींचा निधी गुंतविला होता. या योजनेतून १२ महिन्याच्या आत बाहेर पडल्यास एक टक्का निर्गमनभार आकारला जातो. पहिल्या पाच गुंतवणुक कंपन्यांमध्ये एकूण ५६.१२% निधी गुंतविला आहे. बँका व वित्तीय सेवा कंपन्या निवडून त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून भांडवलवृद्धी होऊ शकेल या दृष्टीने गुंतवणूक केली जाते. परताव्याचा विचार केल्यास कुठल्याही कालावधीसाठी निर्देशांकापेक्षा चांगला परतावा या योजनेने दिला आहे. एकाच उद्योगातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजनांनमध्ये (sectoral Fund) जोखीम सर्वात जास्त असते. high risk – high returns  हा तर बाजाराचा नियम आहे. ज्यांना शेअर बाजाराची जोखीम टाळायची आहे पण बाजारात मिळणाऱ्या परताव्याच्या जवळपास परतावा मिळवायचा आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी ही योजना आदर्श योजना आहे. येत्या पतधोरणात रिझर्व बँक दरकपात करेल व त्याचा परिणाम म्हणून बँका व बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे भाव वधारतील. जर दर कपात आली नाही तर नुकसान सोसावे लागेल, म्हणून या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ‘एसआयपी’ चा पर्याय स्वीकारावा.
(लेखक व्यावसायिक वित्तीय सल्लागार आहेत.)
परताव्याचा तौलनिक आढावा (%)
कालावधी     फंड    बँकेक्स
एक महीना    २.४     १.७
तीन महिने     १५.६     ११.८
सहा महिने     २७.९    १९.५
एक वर्ष     ५५.६    ४१.६
दोन वर्ष    १२.४    १०.६
तीन वर्ष    १६.७    १२.६
आघाडीच्या पाच बँकांतील गुंतवणूक
एचडीएफसी बँक     २१.१७%
आयसीआय. बँक     १३.३७%
स्टेट बँकऑफ इंडिया    १०.५४%
इंडसइंड बँक    ६.९९%
युनियन बँक ऑफ इंडिया    ४.०५%

Story img Loader