आजच्या भागात म्युच्युअल फंडाच्या तीन प्रमुख प्रकारांपकी एक (इक्विटी फंड , डेट फंड व बॅलेन्स फंड) म्हणजेच डेट फंडाविषयी माहिती करून घेऊ. डेट फंडाचे प्रामुख्याने पुढीलप्रमाणे उपप्रकार आहेत. गिल्ट फंड, इन्कम फंड, एफ.एम.पी, शॉर्ट टर्म फंड व लिक्विड फंड. आज डेट इन्कम फंडाविषयी माहिती देत आहे.
डेट इन्कम फंडाचे निधी व्यवस्थापक हे फंडाचा निधी दीर्घ मुदतीच्या भारत सरकार रोखे व कंपनी (खासगी) रोखे यात गुंतवून कमी जोखीम व मध्यम परतावा देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
डेट इन्कम फंडाचे गुंतवणूकदार रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणावर (Monetary Policy) लक्ष ठेवून या फंडामध्ये आपले पसे गुंतवितात. कारण फंडाचा परतावा पतधोरणाच्या आवर्तनावर (Cycle) अवलंबून असतो. रिझव्र्ह बँकेच्या व्याजदरांचा चढ – उतार व बाजारातील रोख्यांची किंमत यांचा परस्पर उलट संबंध असतो.
रिझव्र्ह बँक जर व्याजदर (रेपो रेट) कमी करत असेल तर बाजारातील दीर्घ मुदतीच्या रोख्यांची किंमत वाढते व व्याजदर (रेपो रेट) वाढवत असेल तर रोख्यांची बाजारातील किंमत घटते. डेट इन्कम फंडाची गुंतवणूक ही भारत सरकार रोखे व कंपनी रोखे (खासगी) यात असल्याने एन.ए.व्हीच्या चढ – उतारावर याचा परिणाम दिसून येतो.
१९९४ ते २००३ दरम्यान व्याजदर (रेपो रेट) कमी होत होते त्यावेळी या फंडानी चांगला परतावा दिला होता. याउलट २००४ ते २००८ दरम्यान जेव्हा व्याजदर (रेपो रेट) वाढत होते फंडाचा एन.ए.व्ही कमी होत होता.
२०१३ वर्षांत रिझव्र्ह बँक व्याजदर (रेपो रेट) १ ते १.५ टक्क्यानी कमी करण्याची शक्यता जास्त आहे. त्यापकी अर्धा टक्का व्याजदर यापूर्वीच कमी केला आहे उर्वरित डिसेंबर २०१३ पर्यंत कमी होईल, असे अर्थविश्लेषकांचे म्हणणे आहे.
हे गणित जर बरोबर जुळले तर गुंतवणुदारांनी यावर्षी बँकेच्या मुदतबंद ठेवींमध्ये पसे गुंतवण्याऐवजी थोडीफार गुंतवणूक अशा डेट इन्कम फंडात जरूर करावी. क्रिसिलच्या पहिल्या क्रमांकात आयडीएफसी डायानॅमिक, एसबीआय डायानॅमिक व एसबीआय इन्कम फंडाची नोंद आहे. या फंडांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ या तीन महिन्यात जास्तीत जास्त निधी गुंतवला गेला आहे.
आजच्या भागात एसबीआय मॅग्नम इन्कम फंड ही योजना समजून घेऊ. रिझर्व बँकेचे पतधोरण (Monetary Policy) समोर ठेवून आजचे हे फंड विश्लेषण लिहित आहे.
या फंडात गुंतवणूक करताना चार पर्याय उपलब्ध आहेत. लाभांश, त्रमासिक लाभांश, बोनस व ग्रोथ.
हा फंड ३० नोव्हेंबर १९९८ रोजी पुनर्खरेदीसाठी खुला झाला. ३१ डिसेंबर २०१२ रोजी या फंडाची मालमत्ता १,०८६.७० कोटी रुपये होती.२,००० रुपये किमान गुंतवणुकीने या योजनेत गुंतवणूक करता येते. दिनेश आहुजा हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.
या फंडाच्या परताव्याच्या तुलनेसाठी CRISIL Composite Bond Index वापरला जातो.
फंडात गुंतवणूक केल्यापासून एक वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास १% शुल्क आकारले जाते. या फंडाची गुंतवणूक सरकारी रोखे, सरकारी कंपन्यांचे रोखे व खाजगी कंपन्यांचे रोखे यामध्ये गुंतविली जाते. सरकारी रोख्यांमध्ये कमी व दीर्घ मुदतीचे रोखे, म्हणजे २५ वर्षांपर्यंत मुदतीचे रोखे असल्यामुळे गुंतवणुकीची सरासरी मुदत ठरविता येते व सरकारी रोखे सहज विकता येत असल्यामुळे गुंतवणुकीत द्रवता राहते. तर खाजगी व सरकारी रोखे परतावा वाढविण्यास उपयोगी येतात.
कालावधी परताव्याचा दर
एक महिना ०.३%
तीन महिने ३.४%
सहा महिने ६%
एक वर्ष १३%
तीन वर्ष ९.१%
पाच वर्ष ६.९%
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा