स्थापनेपासून म्हणजे १९६४ ते १९७८ या काळात युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया रिझव्र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली होती. १९७८ नंतर युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे नियंत्रण रिझव्र्ह बँकेकडून भारतीय औद्योगिक विकास बँकेकडे अर्थात आयडीबीआयकडे आले. १९८७ पर्यंत म्युच्युअल फंड या व्यवसायात युनिट ट्रस्टची एकाधिकारशाही होती. १९८७ मध्ये राष्ट्रीयीकृत बँका, आयुर्विमा व सामान्य विमा महामंडळे यांना म्युच्युअल फंड व्यवसायात येण्याची परवानगी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जून १९८७ मध्ये एसबीआय म्युच्युअल फंडाची स्थापना होऊन भारतातील म्युच्युअल फंड व्यवसायाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला. १९८८ मध्ये युनिट ट्रस्टची मालमत्ता (Asset Under Management) रु. ६७०० कोटी होती. १९८७ ते १९९३ दरम्यान भारतातील म्युच्युअल फंडांची संख्या एकवरून आठ झाली. स्टेट बँकेपाठोपाठ कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा व सामान्य विमा मंडळ (जीआयसी) यांनी आपापल्या मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या उपकंपन्यांची स्थापना करून या व्यवसायात प्रवेश केला. १९८९ मध्ये आयुर्वमिा महामंडळाने ‘एलआयसी म्युच्युअल फंड’ या नावाने आपल्या कार्यालयाच्या जाळ्याचा व लोकांच्या विश्वासाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने या व्यवसायात एक मोठा स्पर्धक उतरविला. १९९३ पर्यंत भारतात फक्त सरकारी मालकी असणारे म्युच्युअल फंड होते. आणि या सर्व मालमत्ता व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपन्यांची एकत्रित मालमता रु. ४७,००४ कोटी होती. एसबीआय इमìजग बिझनेस फंड हा स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक असणारा कायम खुला (मुदतमुक्त) असणारा फंड आहे. उभरत्या कंपन्यांच्या व्यवसायाची सुरुवातीची वष्रे जोमाने वाढीची असतात. या फंडाखाली गोळा केलेला निधी या प्रकारच्या कंपन्यात गुंतविला जातो. कंपन्यांची निवड करताना, प्राधान्याने निर्यातप्रधान तसेच जागतिक संधी उपलब्ध असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये पसे गुंतविले जातात. बीएसई ५०० हा निर्देशांक या योजनेच्या परताव्याच्या तुलनेसाठी निश्चित करण्यात आला आहे. ही फंड योजना सर्वप्रथम सप्टेंबर २००४ मध्ये पुन:खरेदीसाठी खुली झाली. आर. श्रीनिवासान हे या योजनेचे निधी व्यवस्थापक आहेत. या आठवडय़ात गेल्या ५२ आठवडय़ात सर्वात जास्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये या योजनेचा पहिला क्रमांक लागला होता.
गेल्या दोन वर्षांत स्मॉल व मिड कॅप कंपन्यांचे भाव कमालीचे खाली गेले होते. तेव्हा खालच्या भावात खरेदी केलेले उत्तम शेअर गुंतवणूकदारांची मानसिकता पालटताच वर जाऊ लागले आहेत. त्याचे फळ या योजनेत गुंतवणूक केलेल्यांना आज मिळत आहे. दोन आठवडय़ांपूर्वी एका वर्षांत ५०% परतावा देणारी ही योजना होती. योजनेची मालमत्ता ३१ डिसेंबर २०१२ रोजी रु. ९८९.९२ कोटी होती. या योजनेचा निधी ९०-१००% शेअर्समध्ये तर १०% ते शून्य टक्के अति अल्पमुदतीच्या रोख्यात गुंतवला जातो. पहिल्या पाच गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या २७.९३% तर पहिल्या दहा गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या ४९.८६% असणे हे जोखीम कमी करण्याचे उत्तम लक्षण म्हणून पाहावे लागेल. ही योजना मुदतमुक्त (कायम खुली असणारी) असून त्यात वृद्धी व लाभांश असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. किमान रु. २००० गुंतवून या फंडात गुंतवणुकीस सुरुवात करता येते. एका वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास १% अधिभार आकाराला जातो. २ फेब्रुवारी २०१३ रोजी वृद्धी पर्यायाचे निव्वळ मालमत्ता मूल्य रु. १९.५१ तर लाभांश पर्यायाचे रु. १९.५३ होते. स्मॉल आणि मिडकॅपच्या शेअरमधील गुंतवणूक नेहमीच जोखमीची समजली जाते. या फंडाची ९०% गुंतवणूक या प्रकारच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये असल्यामुळे या फंडातील गुंतवणूक “High Risk, High Return” प्रकारात मोडते. पडत्या बाजारात ४०-५०% नकारात्मक परतावा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन आपल्या जोखीम उचलण्याच्या कुवतीनुसार यात गुंतवणूक करावी. परंतु अर्थसंकल्पात सरकार सवलतींची रेलचेल जाहीर करेल आणि बाजार तेजीच्या वारूवर स्वार होईल असे वाटत असल्यास या फंडात जरूर गुंतवणूक करावी, नाहीतर ‘एसआयपी’चा पर्याय उपलब्ध आहेच.
योजनेतील परतावा दर (%)
कालावधी परतावा दर (%)
एक महिना -१.७
सहा महिने २४.३
एक वर्ष ४०.२
पाच वर्ष ७.८
स्रोत : म्युच्युअल फंडाचे वेबस्थळ
फंड-विश्लेषण : एसबीआय इमेजिंग बिझनेस फंड
स्थापनेपासून म्हणजे १९६४ ते १९७८ या काळात युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया रिझव्र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली होती. १९७८ नंतर युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे नियंत्रण रिझव्र्ह बँकेकडून भारतीय औद्योगिक विकास बँकेकडे अर्थात आयडीबीआयकडे आले.
First published on: 11-02-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fund analysissbi imaging business fund