सुमारे २० वर्षांपूर्वी स्थापन झालेली गेटवे डिस्ट्रिपार्क्स ही भारतातील झपाटय़ाने विस्तारणारी मोठी कंपनी आहे. कंटेनर्स लॉजिस्टिक्स या क्षेत्रातील काही मोजक्या मोठय़ा कंपनींपकी एक उत्तम कंपनी म्हणून कदाचित काही गुंतवणूकदारांना ही माहितीही असेल. मात्र अनेकांना हे क्षेत्रच नवीन असल्याने गेटवे डिस्ट्रिपार्क्स अनोळखी वाटण्याचीही शक्यता आहे. जगभरातील विकसित झालेली बंदरे पाहता नवीन सरकारनेही भारतातील बंदरे विकसित करण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूदही केली आहे. कंपनीची भारतात चार प्रमुख राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि हरयाणा येथे अत्याधुनिक कंटेनर फ्रेट स्टेशन्स असून तेथेच गोदामेही आहेत. रेल्वे फ्रेट, शीतगृहे तसेच इतर लॉजिस्टिक्स सेवांचे कंपनीने गेल्या १० वर्षांत अनेक कंपन्या ताब्यात घेऊन मोठय़ा प्रमाणात विस्तार केला आहे. मंदीचे वातावरण आता निवळू लागल्याने कंपनीच्या कामगिरीतही लक्षणीय सुधारणा झालेली दिसून येते. जूनअखेर २०१४ मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने रु. ५१.२६ कोटींच्या उलाढालीवर रु. २५.२४ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत त्यात १३४% वाढ झाली. जेएनपीटी, विजाग तसेच कोची येथील बंदरांमध्ये वाहतूक आणि उलाढाल वाढत असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागतील. सध्या रु. २५५च्या आसपास असलेला हा शेअर तुम्हाला वर्षभरात ३०% परतावा देऊ शकेल.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या, शिफारस केलेल्या समभागांमध्ये लेखकांचे व्यक्तिगत स्वारस्य असण्याचा संभव नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तात्पर्य, गुंतवणुकीपूर्वी वाचकांनी तज्ज्ञ सल्लागाराचा परामर्श घेणे उपयुक्त ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा