आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
प्रश्न: आíथक वर्ष २०१३-१४ साठीचे प्राप्तिकर विवरणपत्र ३१ जुलपूर्वी न भरल्यास त्याचे काय परिणाम होतील?
–  प्रसाद जोशी
उत्तर : वैयक्तिक करदाते, िहदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था ज्यांना लेखा परीक्षण अनिवार्य नाही अशांना प्राप्तिकर विवरणपत्र ३१ जुल, २०१४ पूर्वी भरावे लागते. विवरणपत्र मुदतीपूर्वी न भरल्यास काही ठळक परिणाम खालीलप्रमाणे :
१जर कर देय असेल तर देय रकमेवर प्रत्येक महिन्यासाठी १% व्याज भरावे लागते. याशिवाय विवरणपत्र उशिरा भरल्याबद्दल देय रकमेवर १% प्रमाणे अतिरिक्त व्याज भरावे लागते.

२ जर विवरणपत्र कर निर्धारण वर्ष संपण्यापूर्वी भरल्यास (म्हणजेच ३१ मार्च २०१५ पूर्वी) भरल्यास त्यावर दंड भरावा लागत नाही. जर विवरणपत्र ३१ मार्च २०१५ नंतर     भरले तर ५,००० रुपये दंडाची तरतूद आहे.

३जर उशिरा भरलेल्या विवरणपत्रामध्ये काही चुका असतील तर सुधारित विवरणपत्र भरता येत नाही.
४जर धंदा, व्यवसायात तोटा असेल किंवा भांडवली तोटा असेल तर तो पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येत नाही.
त्यामुळे विवरणपत्र मुदतीपूर्वी भरणे फायदेशीर आहे.
प्रश्न: मी एका कंपनीचे २००२ साली ५०० शेअर्स ८०,६०० रुपयांना विकत घेतले होते. त्यावर मला २००६ साली १०० शेअर्स आणि ऑक्टोबर २०१३ रोजी ३०० शेअर्स बोनस मिळाले. हे सर्व ९०० शेअर्स मी मार्च २०१४ मध्ये २,७५,४०० रुपयांना विकले. त्यावर रोखे विनिमय कर (रळळ) भरला आहे. मला झालेला नफा करमुक्त आहे का? करपात्र असेल तर त्यावर मला किती कर भरावा लागेल?
–  शशांक जाधव
उत्तर: आपण विकलेल्या ९०० शेअर्सपकी ६०० शेअर्स हे एक वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी विकत घेतल्यामुळे ६०० शेअर्सवर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असल्यामुळे आणि त्यावर रोखे विनिमय कर (रळळ) भरला असल्यामुळे करपात्र नाही. परंतु ३०० शेअर्स जे आपणाला ऑक्टोबर २०१३ मध्ये मिळाले आणि ते मार्च २०१४ मध्ये विकले त्यावर लघु मुदतीचा भांडवली नफा झाला आहे, त्यावर आपल्याला १५% प्रमाणे कर भरावा लागेल. आपला एकूण देय कर खालील प्रमाणे :

९०० शेअर्सची एकूण विक्री किंमत    २,७५,४००
वजा: ६०० शेअर्स*ची विक्री किंमत    १,८३,६००
= ३०० शेअर्सची विक्री किंमत     ९१,८००
(*दीर्घ मुदतीचा भांडवली नफा असलेले शेअर्स)
————————————————
करपात्र अल्पमुदतीचा भांडवली नफा     ९१,८००
————————————————
त्यावर भरावा लागणारा कर १५%    १३,७७०
+ शैक्षणिक अधिभार ३%         ४१३
————————————————
एकूण देय कर             १४,१८३
प्रश्न: मी २०१० साली घराची विक्री केली त्यावर मला २२,००,००० रुपयांचा भांडवली नफा झाला होता. हा कर वाचविण्यासाठी मी २०१२ साली ४५ लाख रुपयांना एक घर विकत घेतले. हे घर मी आता विकून मोठे घर घेण्याचा विचार करीत आहे. घर विक्रीची अंदाजित किंमत ६० लाख रुपये इतकी असेल आणि नवीन घराची अंदाजित किंमत ७५ लाख रुपये इतकी असेल. तर मला घर विक्रीतून झालेल्या नफ्यावर कर भरावा लागेल का?
–  स्वप्नाली कुलकर्णी  
उत्तर: आपण २०१० साली विक्री केलेल्या भांडवली नफ्यावर कर वाचविण्यासाठी कलम ५४ अन्वये २०१२ साली घरामध्ये गुंतवणूक केली. कलम ५४ प्रमाणे जर नवीन घर तीन वर्षांच्या आत विकले तर पहिल्या घराचा भांडवली नफा (२२,००,००० रुपये) हा दुसऱ्या घराच्या खरेदी किमतीतून (म्हणजेच ४५,००,०००) वजा करून दुसऱ्या घरचा लघु मुदतीचा नफा काढावा लागेल. आपला नवीन घराच्या विक्रीतून झालेला भांडवली नफा हा खालीलप्रमाणे असेल :

नवीन घराची विक्री किंमत     ६०,००,०००
वजा: घराची खरेदी किंमत    ४५,००,०००
वजा: पहिल्या घराचा भांडवली नफा     २२,००,०००
——————————————–
खरेदी किमतीची वजावट     २३,००,०००
——————————————–
लघु मुदतीचा भांडवली नफा     ३७,००,०००
दुसरे घर हे तीन वर्षांच्या आत विकल्यामुळे त्यावर झालेला भांडवली नफा हा लघु मुदतीचा असेल. या लघु मुदतीच्या नफ्यावर कर भरण्याशिवाय पर्याय नाही. कारण लघु मुदतीच्या नफ्यासाठी कलम ५४, ५४ एफ किंवा ५४ ईसी अन्वये मिळणाऱ्या गुंतवणुकीचा फायदा मिळत नाही.
याशिवाय दुसऱ्या घरावर झालेल्या भांडवली नफ्याबाबत जर ८०सी कलमाखाली मागील वर्षांत वजावट घेतली असेल तर तीसुद्धा आपल्या या वर्षीच्या उत्पन्नात मिळविली जाईल आणि त्यावर कर भरावा लागेल.

प्रश्न: मला लग्नात २,२५,००० रुपयांच्या भेटी (अहेर) रोखीने मिळाल्या. या भेटी करपात्र आहेत का?
– प्रकाश िशदे
उत्तर : प्राप्तिकर कायद्यानुसार नातेवाइकांच्या व्याख्येमध्ये समाविष्ट असलेल्या नातेवाइकांकडून मिळालेल्या भेटींवर कर भरावा लागत नाही. नातेवाइकांशिवाय कोणत्याही प्रसंगी रोखीने मिळालेल्या ५०,००० रुपयांपर्यंतच्या भेटी करमुक्त आहेत. तसेच लग्नानिमित्त कुणाकडूनही मिळालेल्या भेटी या करमुक्त आहेत.

प्रश्न: माझा एक छोटा धंदा आहे. मी भाडय़ाच्या घरात राहतो. माझ्या उत्पन्नातील बराचसा भाग घरभाडय़ामध्ये जातो. या घरभाडय़ासाठी प्राप्तिकरात मला काही सूट मिळू शकेल का?
– सतीश प्रभू
उत्तर : प्राप्तिकर कलम ८० जीजी अनुसार ज्यांना घरभाडे भत्ता मिळत नाही, त्या पगारदारांसाठी या कलमाप्रमाणे कर सवलत मिळविता येते. ही सवलत खालील तीन रकमेपेक्षा सर्वात कमी असेल तेवढी मिळू शकते :
१.    एकूण उत्पन्नाच्या १०% पेक्षा जेवढे जास्त घरभाडे असेल तेवढी रक्कम, किंवा  
२.    एकूण उत्पन्नाच्या २५% रक्कम, किंवा
३.    २,०००रुपये महिना
ही वजावट स्वत:च्या नावाने, पत्नी/पतीच्या किंवा अज्ञान मुलाच्या नावाने घर असल्यास मिळत नाही.
विवरणपत्र ऑनलाइन कसे भरावे?
प्रश्न: माझे उत्पन्न मागील वर्षी ५ लाख रुपयांपेक्षा कमी होते, त्यामुळे मी संगणकाद्वारे विवरणपत्र भरले नव्हते. परंतु या वर्षी माझे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यामुळे मला संगणकाद्वारे विवरणपत्र भरावे लागणार आहे. ते कसे भरावे याबद्दल मार्गदर्शन करा.
–  एक वाचक
*  प्रथम प्राप्तिकर खात्याच्या  http://www.incometaxindiaefiling.gov.in  या वेबस्थळावर जाऊन त्यावर आपला पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) रजिस्टर करावा.
* आवश्यक ती वैयक्तिक माहिती नमूद करावी आणि पासवर्ड द्यावा.
* यानंतर आपल्याला प्राप्तिकर खात्याकडून स्वीकृतीचा संदेश ई-मेलद्वारे प्राप्त झाल्यानंतर आपण लॉग इन करू शकता.
ल्ल  आपल्या उत्पन्नाप्रमाणे योग्य तो फॉर्म निवडून आपण संगणकावर डाऊनलोड करावा. तो पूर्णपणे भरून प्रमाणित करून घ्यावा.
* जर माहिती अपूर्ण असेल तर तो फॉर्म प्रमाणित होणार नाही.
* भरलेला फॉर्म प्रमाणित झाल्यावर एक ७’े फाईल तयार होते.
* ही ७’े फाईल आपल्याला पुन्हा ‘पॅन’द्वारे वर नमूद वेबस्थळावर लॉग इन करून दाखल करावी लागेल.
* अशा तऱ्हेने फॉर्म दाखल झाल्यावर लगेच त्याची पावती (Acknowledgment) तयार होते.
* या पावतीची प्रत काढून ती सही करून १२० दिवसाच्या आत बेंगरूळू येथे पोस्ट किंवा कुरिअरने पाठवावी.
* ती बेंगरूळू येथे मिळाल्यानंतर त्याची पोच आपल्याला ई-मेलद्वारे मिळते.
* हा ई-मेल आल्यानंतर आपले विवरणपत्र दाखल झाले असे समजावे.