भारताच्या क्रिकेट संघात एक बाजू लावून धरणारा ‘द वॉल’ असे बिरुद मिरविणाऱ्या राहुल द्रविडसारखीच भक्कम भूमिका ‘जिलेट’ आपल्या भागभांडारात नक्कीच वठवील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एक लग्नाळू मुलगा विवाहयोग्य मुलीच्या शोधात होता. सांगून आलेली प्रत्येक मुलगी काही ना काही दोष काढून तो नाकारत असे. अशीच एक मुलगी पाहून तिच्या रूपाविषयी वावगे बोलू लागल्यावर त्या मुलाच्या थोरल्या बहिणीने त्याच्यासमोर आरसा धरला व विचारले, ‘या प्रतििबबापेक्षा मुलगी सुंदर आहे की नाही हे सांग?’ मुलाला बहिणीचे बोलणे अर्थातच पटले. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातील हा दाखला बाजाराला लागू पडतो. कालपर्यंत विविध कारणाने टाळावा असे वाटणारा एखादा शेअर अचानक ‘व्हॅल्यू बाय’ वाटू लागतो. याला पुनर्मूल्यांकन (फी-१ं३्रल्लॠ) असे म्हटले जाते. जिलेटदेखील पुनर्मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
मार्ग दाउनी गेले आधी, दयानिधी संत पुढे
तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही
मोडोनिया नाना मते, देती सिद्धांती सौरसू
निळा म्हणे ऐसे संता, कृपावंत सुख सिंधू
आषाढी वारी आली की आजोबांच्या तोंडून ऐकलेले अभंग कानात रुंजी घालू लागतात. ‘‘अनन्य भक्तिभावे निळा वंदी त्यांचे पाय’’ असा संत एकनाथांच्या प्रती आदर त्यांच्यावर आरती रचून व्यक्त करणाऱ्या संत निळोबाराय यांच्या या अभंगाचे स्मरण होण्यास कारण ठरली ती आजची कंपनी. जो मार्ग अधिकारी सत्पुरुषांनी दाखविला आहे. त्या मार्गावरून चालल्यास सुख प्राप्त होते असा दाखला या अभंगातून दिला आहे. गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांच्या गुंतवणुकीच्या ‘टॉप टेन’मधील एक असणारी जिलेट याच उद्देशाने शिफारसयोग्य वाटली.
या सदराच्या नियमित वाचकांना आजची कंपनी अनोळखी मुळीच नाही. जिलेटच्या शुक्रवारच्या बंद भावाचे प्रति समभाग मिळकतीशी गुणोत्तर ८१.०८ पट आहे. इतका महाग शेअर का घ्यावा असा प्रश्न गुंतवणूकदरांना पडणे साहजिक आहे. दाढीयोग्य वयाचे पुरुष राहात असलेल्या घरात जिलेटचे एकही उत्पादन नाही असे घर शोधूनही सापडायचे नाही. १००% ‘ब्रॅण्ड रिकॉल’ असणारी उत्पादने असलेली ही कंपनी आहे.
(कोटी रुपये) जून २०१३* जून २०१२ % बदल
एकूण विक्री ३५६.९ ३३२.४ ७.३६
करपूर्व नफा ४९.९४ ४१.९२ १९.१३
निव्वळ नफा २७.१६ २३.६ १४.९९
जिलेट इंडिया लिमिटेड ही अमेरिकेतील प्रॉक्टर अँड गॅम्बलची भारतातील उपकंपनी आहे. ९ फेब्रुवारी १९८४ रोजी साली पोद्दार समूहाने ‘जिलेट इन्कॉर्पोरेटेड’ या अमेरिकेतील कंपनीबरोबर संयुक्तरीत्या ‘इंडिया शेिव्हग प्रॉडक्ट्स लिमिटेड’ या नावाने या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात स्टेनलेस स्टीलचे वस्तारे ‘सेव्हन ओ क्लॉक’ या नाममुद्रेची दाढीची ब्लेड्स तयार करण्यात येत असत. या कंपनीचा भारतातील व्यवसाय तीन उत्पादन प्रकारात विभागला आहे. पहिला वैयक्तिक उत्पादने यात ‘जिलेट’ या नाममुद्रेने विकली जाणारी उत्पादने अर्थात विविध प्रकारचे पुरुषांनी वापरावयाचे वस्तारे, स्त्रियांच्या त्वचेच्या निगेसाठीची ‘सेन्सर एक्सेल’ व ‘सॅटिन केअर’ ही उत्पादने आणि दाढीसाठी साह्य़भूत ठरणारे फोम, जेल, पेस्ट, वस्तऱ्याची सुटी होणारी ब्लेड्स, आफ्टरशेव्ह लोशन, कंडिशनर व डीओडरन्ट्स तसेच दोन, तीन व पाच पाती असणारे वस्तारे इत्यादी उत्पादनांचा समावेश होतो. दुसऱ्या प्रकारात मौखिक आरोग्यासाठी वापरायची उत्पादने ‘ओरल बी’ या नाममुद्रेने विकली जातात. यात मुख्यत्वे ‘ओरल बी १२३’ या नाममुद्रेचा समावेश होतो. तिसऱ्या प्रकारात ‘डय़ुरासेल’ या नाममुद्रेने विकले जाणारे एए आणि ट्रिपल ए या क्षमतांचे सेल यांचा समावेश होतो.
जिलेटच्या एकूण विक्रीपकी वैयक्तिक वापरावयाच्या उत्पादनांच्या (ॅ१्रेल्लॠ ढ१४िू३२) विक्रीचा वाटा ७५% असून या उत्पादनांची एकूण विक्री मागील आर्थिक वर्षांत रु. २६४ कोटी होती. भारतात प्रामुख्याने दाढीसाठीची उत्पादने वापरणारे दोन प्रकारचे ग्राहक आहेत. पहिल्या प्रकारात घरी स्वत: दाढी करणारे व दुसरे इतरांच्या दाढीसाठी सामान विकत घेणाऱ्यात रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाखाली बसलेले कारागीर, गावागावात दारोदारी जाऊन सेवा देणारे बलुतेदार, खेडेगावातील पारंपरिक सलून यापासून शहरात नव्याने दिसू लागलेली युनिसेक्स सलून, पंचतारांकित हॉटेलातील मेन्स पार्लर आदी सेवा केंद्राचा यात समावेश होतो. या मूल्य साखळीतील प्रत्येक प्रकारच्या सेवा केंद्रासाठी जिलेटने उत्पादने विकसित केली आहेत. जिलेटची रु. ३० (‘जिलेट व्हिक्टर’) पासून रु. ११४५ (‘जिलेट फ्यूजन प्रोग्लाइड’) पर्यंत
या कंपनीच्या बाबतीत अनेक बाजारतज्ज्ञांचा एक गट एक असा आक्षेप घेतो, की या कंपनीचा ८८.७५% भांडवली हिस्सा प्रवर्तकांकडे आहे. त्यामुळे बाजारात उलाढाल कमी आहे; समभागाच्या खरेदी-विक्रीत पुरेशी द्रवता नाही. ही कंपनी आपली बाजारातील नोंदणी कधीही रद्द करेल, अशी भीतीही या तज्ज्ञांना वाटते. सेबीने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे बाजारात कंपनीची नोंदणी असण्यासाठी बिगर प्रवर्तक- सामान्य गुंतवणूकदारांचा वाटा कमीतकमी २५% असावा. या नियमांची पूर्ती करण्यासाठी अनेक कंपन्यांनी प्रवर्तकांचा ७५% हून अधिक असलेला वाटा बाजारातील खास खिडकीतून विक्री करून कमी केला. प्रवर्तकांचा हिस्सा कमी करण्याची ३१ मे ही शेवटची तारीख होती.
‘विद्यमान प्रवर्तक’ या शब्दाची व्याख्या ठरविण्यासंदर्भातली जिलेट कंपनीची याचिकेची ‘सॅट’ अर्थात प्रतिभूती लवादासमोर सुनावणी पूर्ण झाली असून लवादाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. लवादाच्या या निर्णया नंतर ‘प्रवर्तकांचा भांडवली हिस्सा’ याची व्याख्या स्पष्ट होणे अपेक्षित आहे. भारत वगळता इतर देशांत जिलेट व प्रॉक्टर अँड गॅम्बल यांचे विलीनीकरण झाले आहे. भारतातच या दोन कंपन्या स्वतंत्र अस्तित्व राखून आहेत. हा निर्णय कंपनीच्या विरोधात गेला तर भारतातही हे विलीनीकरण नजीकच्या काळात होईल असे मानणारे अनेक विश्लेषक आहेत. यूटीआय एएमसी, कोटक मिडकॅप, एसबीआय कॉन्ट्रा, जीएस सीएनएक्स-५०० या व अन्य मिळून सात ते आठ म्युच्युअल फंडांच्या योजना या शेअरमध्ये आपली गुंतवणूक एक ते ४.२६% पर्यंत राखून आहेत ती यासाठीच. लवादाचा निर्णय कंपनीच्या विरोधात गेल्यास किमान पातळीच्या वर असणाऱ्या १३.७५% शेअरची त्वरित विक्री करावी लागेल. क्रिकेटच्या संघात सगळेच शिखर धवनसारखे हिटर असून चालत नाही, एक बाजू लावून धरणारा ‘द वॉल’ असे बिरुद मिरविणारा राहुल द्रविड असणेही तेवढेच जरुरीचे आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये द्रविडची भारतीय संघातील भूमिका जिलेट नक्की वठवील.
गुंतवणुकीत पुरेशी द्रवता नसणे व तुलनेने महाग असलेले मूल्यांकन या त्रुटी लक्षात घेऊनसुद्धा जगाच्या लोकसंख्येच्या ५०% हिस्सा वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासून जगाचा निरोप घेईपर्यंत आठवडय़ातून तीन ते सात वेळा ज्या कंपनीची उत्पादने वापरतो. इतक्या प्रदीर्घ काळ जी उत्पादने आपली सोबत करतात म्हणूनच या कंपनीला ‘एल-१२’मध्ये मानाचे पहिले स्थान दिले हे वाचकांना पटले असेलच.