सरलेल्या संपूर्ण २०१४ सालात किमतीबाबत कायम ताणाखाली राहिलेले सोने नवे साल उजाडताच अकस्मात उसळी घेताना दिसले. भावातील ही वाढ चिरंजीवी की नाममात्र? काहीही असेल तिचा गुंतवणूकदारांना लाभ कसा घेता येईल त्याचा हा वेध..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भांडवली बाजारात सुरू राहिलेले तेजीचे विक्रमी उधाण आणि गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे फिरलेली पाठ यापायी या मौल्यवान धातूच्या किमतीने गेल्या वर्षी साडेचार वर्षांपूर्वीचा तळ गाठलेले आपण पाहिले. भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर किमतींनी गेल्या वर्षी प्रति औंस ११३१.८५  डॉलरचा (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम) नीचांक दाखविला.

कारणे काय?
अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रि़झव्‍‌र्हकडून ‘क्यूई’ धोरणाला मुरड घातली जाणे आणि भविष्यात तेथे अर्थव्यवस्थेतील व्याजाचे दर वाढतील ही अटकळ जोर पकडू लागली तसे सोने-चांदी दरात उतार सुरू झाल्याचे दिसून येते. अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरत असल्याचे सुस्पष्टपणे दिसत आहे. पर्यायाने त्या देशाचे चलन डॉलर सशक्त बनत आहे, ही बाब सोन्याची चमक झाकोळणारी आहे. दुसरीकडे या धातूची मागणीची पारडे उत्तरोत्तर हलके पडत चालले आहे. जगभरातून गुंतवणुकीचा शाश्वत पर्याय म्हणून त्याने रया गमावलीच आहे, सर्वात मोठा ग्राहक असलेल्या भारतातही दागिन्यांसाठी होणारी मागणी अनेक आयात र्निबधांमुळे लक्षणीय घटली नसली तरी गेल्या काही वर्षांत दिसलेला वाढीचा दर मात्र नाही.

नजीकचे भविष्य काय?
दमदारपणे बलवान होत असलेले डॉलरचा मौल्यवान धातूच्या किमतीवर ताण वाढत जाणार. वर्षांच्या मध्याला अमेरिकेत व्याजदर वाढ, तर अन्य विकसित राष्ट्रांकडून ‘इझी मनी’ धोरणाला चालना डॉलरच्या बाहूतील बेंडकुळी आणखी फुगविणारी ठरेल. सोन्याचा उरलासुरला  बाज आणि प्रतिष्ठेला त्यातून बाधा पोहचेल. चीनमधून मागणीची स्थिती त्या देशाच्या खस्तावलेल्या आर्थिक स्थितीमुळे सुधारण्याची शक्यता नाही. दुसरा मोठा ग्राहक भारतात सोने आयातीवर र्निबध इतक्या लवकर सैल होण्याची शक्यता नाही.
चीनसह जागतिक स्तरावर अर्थस्थितीत स्थिरत्व आले, काही देशांमध्ये गेल्या काही वर्षांत दिसले तसे युद्धजन्य ताणतणाव आढळले आणि भारताने सोने आयातीत शिथिलता दाखविली तर सोन्याला गतवैभव दिसू शकेल.
तांत्रिकदृष्टय़ा पाहायचे झाल्यास, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति औंस १०८० ते १२७५ हा सोने दराचा दीर्घ काळापासूनचा व्यवहार पट्टा आहे आणि कोणत्याही दिशेने ही पातळी तोडली गेल्यास सोने दराला ती त्या दिशेने नवी कलाटणी देणारी असेल, असे प्रस्तुत लेखकाने यापूर्वीही म्हटले होते. गेल्या काही दिवसात नेमके हेच घडले आणि सोन्याने पुन्हा प्रति औंस १३०० डॉलपर्यंत मजल मारली.

काय करावे?
तेलाच्या किमतीतील निरंतर घसरणीने बाजारात निर्माण केलेल्या घबराटीने सोन्याकडे वळलेला हा तात्पुरता प्रकाशझोत मात्र आहे. तांत्रिक परिभाषेत याला ‘टेक्निकल बाऊन्स’ म्हणता येईल. पण सोने-चांदीत व्यवहार करणाऱ्यांनी संधी म्हणून याकडे पाहता येईल. तथापि सोन्यातील दीघरेद्देशी गुंतवणूकदारांनी थोडी प्रतीक्षा करावी. एमसीएक्सवरील वायदे व्यवहारात भाव खाली येणे अपरिहार्यच दिसत आहे. प्रति १० ग्रॅम २६,००० ते २५,५००चा दर फार दूर नाही. तो सोन्यासाठी आधार स्तरही आहे आणि किमत पातळीवर खरेदी दीर्घ मुदतीत लाभदायीही ठरेल.
(लेखक जिओफिन कॉमट्रेड लि.चे संशोधन प्रमुख)