वाशीच्या पाम बीच रस्त्यावरून एखादी सुसाट वेगात जाणारी हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल दिसली तर ती मोटारसायकल आजच्या या सदराच्या मानकरी स्वाती नाईक यांची असेल असे समजायला काहीच हरकत नाही. स्वाती नाईक यांचा व्यवसाय हा ‘क्लियरिंग आणि फॉरवर्डिग’चा. म्हणजे ग्राहकांचा बोटीतून आलेला माल बंदरात उतरवून घेऊन त्यांच्यापर्यंत पोहचता करणे व ग्राहकांच्या कारखान्यात निर्यातीसाठी तयार झालेला माल ठरावीक बोटीवर चढविण्याचा हा व्यवसाय आहे. कोल्हापूरपासून नागपूपर्यंत त्यांचे ग्राहक महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. त्यामुळे मुंबई व जवाहरलाल नेहरू या दोन बंदरांचा माल धक्क्यांवर त्यांना जावे लागते. म्हणूनच लेखाची सुरुवात माघ महिन्यातील मुंबई बंदरावरच्या थंड हवेची आठवण करून देणाऱ्या कवितेने.
हा व्यवसाय स्वाती यांच्या वडिलांनी १९८३ मध्ये सुरू केला. दोन ग्राहकांपासून सुरू झालेला हा व्यवसाय वडिलांनी वाढविला. न्हावा शेवा पोर्ट ट्रस्टच्या बंदरावर पोहचणाऱ्या पहिल्या दहा एजंटांपकी स्वाती नाईक यांचे वडील होते. २००५ मध्ये स्वाती यांच्या वडिलांचे एका अपघातात निधन झाले, तेव्हा त्या २१ वर्षांच्या होत्या. नवी मुंबईतील एका महाविद्यालयात त्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांला, तर धाकटा भाऊ दुसऱ्या वर्षांचे शिक्षण घेत होते. वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी नवीन घर घेतले होते व दोन चार महिन्यांनी नाईक कुटुंब नवीन घरात राहायला जाणार होते. परंतु ही दुर्दैवी घटना घडल्याने नाईक कुटुंबीय जुन्या घरातच राहिले. वडिलांचा विमा गृह कर्ज फेडण्यासाठी पुरेसा नव्हता. म्हणून वडिलांच्या निधनानंतर तयार घर ताब्यात आल्यावर सहा महिन्यांनी ती सदनिका त्यांनी विकून टाकली व कर्ज फेडले. या व्यवहारात त्यांना १४ लाखाचा नफा झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वाती यांनी एक वर्ष त्यांच्या वडिलांच्या मित्राच्या कार्यालयात नोकरी केली व व्यवसाय शिकून घेतला. २००७ दिवाळीपासून त्यांनी वडिलांचा व्यवसाय पुनर्जीवित केला. व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली आणि मोठय़ा मंदीला तोंड द्यावे लागले. त्याच वेळी २००८ मध्ये स्वाती यांचा भाऊ ऑस्ट्रेलिया येथे नोकरीसाठी गेला व एप्रिल २०११ मध्ये त्याने त्याची सहकारी असलेल्या इंग्लिश मुलीशी विवाह केला. हे लग्न त्यांच्या आईला मुळीच पसंत पडले नाही म्हणून कौटुंबिक ताणतणाव निर्माण झाले. भाऊ भारतात परत यायची शक्यता कमीच आहे. आज त्यांचे वय ३२ वष्रे आहे व त्या अविवाहित आहेत.
स्वाती व त्यांच्या आई दोघी जणी त्यांच्या सध्या वाशी येथील सेक्टर १४ येथील घरात राहतात. नाईक यांच्या कंपनीकडे ४७८ ग्राहक आहेत. संपूर्ण २००८ वर्षांत स्वाती यांनी १०७ कंटेनर हाताळले होते. चालू आíथक वर्षांत १५०० कंटेनर हाताळून संपवायचे असे स्वाती यांनी लक्ष्य ठेवले आहे. स्वाती यांच्याशी एकूण तीन वेळा बोलणे झाले. पहिल्यांदा माहितीत काही त्रुटी राहिल्या होत्या, त्या समजून घेतल्या. दुसऱ्या वेळेला त्यांना एकूण तीन पर्याय दिले त्यातील प्रत्येकाचे फायदे-तोटे सांगितले व शेवटचा फोन त्यांनी नक्की केलेल्या पर्यायाबाबत होता. स्वाती यांची मेल जानेवारीच्या दहा तारखेलाच आली होती परंतु वित्तीय प्राथमिकता नक्की होत नव्हत्या. हाल्रे डेव्हिडसन घेण्याचे त्यांचे स्वप्न होते. सध्या गृहकर्जाचा बोजा डोक्यावर असताना आणखी पाच लाखांचे कर्ज घ्यायचे का या विषयी त्या साशंक होत्या.
स्वाती नाईक यांना सल्ला
स्वाती नाईक यांचे हाल्रे डेव्हिडसन विकत घेण्याचे स्वप्न.. ते त्यांनी मागील आठवडय़ात पूर्ण केले. स्वाती सध्या मारुती रिट्झ ही गाडी वापरतात. ही गाडी तीन वष्रे जुनी आहे. हाल्रे डेव्हिडसनसाठी सहा लाख रुपये त्यांनी वाहन कर्ज घेतले आहे. हे कर्ज दोन वर्षांत फेडण्याचा सल्ला त्यांना दिलेला आहे. स्वाती या व्यवसायात आहेत. त्यांना हाल्रे डेव्हिडसन कर्ज काढून घेण्याचा सल्ला दिला कारण नवीन हाल्रे डेव्हिडसनवर मिळणारा घसारा यामुळे त्यांच्या आयकराचा दर कमी होण्यास मदत होणार आहे. ३१ मार्च पूर्वी हाल्रे डेव्हिडसनची नोंदणी करण्याचा सल्ला त्यांना दिला होता तो त्यांनी १४ डिसेंबरला नवीन गाडीची नोंदणी करून पाळला. स्वाती यांच्यावर सध्या फारश्ोी जबाबदारी नाही. विवाह करणार किंवा नाही या बाबत सुस्पष्टता नाही. आई व त्या दोघीच राहतात म्हणून आईच्या मालमत्तेत त्यांचे व त्यांच्या सर्व मालमत्तेत आईचे नामनिर्देशन त्यांनी तातडीने करून घ्यावे. आजच्या घडीला भविष्यातील वाटचालीविषयी दिशा नक्की नाही. असे असले तरी एक कोटी २५ लाख रुपयांचा २५ वर्षांचा टर्म प्लान घ्यावा. एचडीएफसीच्या टेक टू प्रोटेक्ट या प्लानसाठी तुम्हाला साधारण वार्षकि १४ हजार विमा हप्ता भरावा लागेल. म्हणून हा प्लान उद्याच घेऊन टाका.
गुंतवणुकीत दीर्घ मुदतीची धोरणे न आखता लवचीकता ठेवली आहे. कोष्टकात उल्लेख केलेल्या जमाखर्चाच्या बचतीमधून दोन वर्षांत हाल्रे डेव्हिडसनचे कर्ज फेडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वर्षां दोन वर्षांसाठी त्यांना दहा हजार शॉर्ट टर्म बाँड फंडात गुंतविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे स्वाती मान्य करीत नसल्या तरी एक दोन वर्षांत त्यांना एखादा जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून सहा ते १२ महिन्यांनंतर दीर्घकालीन गुंतवणुकीविषयी निर्णय घेऊ असा सल्ला त्यांनी मान्य केला आहे.
बाईक ‘वेडी’
वाशीच्या पाम बीच रस्त्यावरून एखादी सुसाट वेगात जाणारी हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल दिसली तर ती मोटारसायकल आजच्या या सदराच्या मानकरी स्वाती नाईक यांची असेल असे समजायला काहीच हरकत नाही.
First published on: 17-02-2014 at 08:14 IST
TOPICSनियोजनभान
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidence on economic planning