* सचिन देसाई (२८ वष्रे) व पत्नी स्नेहल (२६ वष्रे) दोघेही कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक. दोघांचा मासिक पगार अनुक्रमे २४००० रु. व २३००० रु. इतका आहे.
सध्या दाम्पत्याची दरमहा गुंतवणूक
आज ज्यांचे वित्तीय नियोजन करणार आहोत त्या सचिन देसाई यांची ई-मेलद्वारे मिळालेली माहिती समोर ठेवली आहे. देसाई सर व देसाई बाईंचे अभिनंदन करावेसे वाटते, कारण ज्या उद्देशाने हे सदर सुरू केले त्या उद्देशाच्या जवळपास जाणारी त्यांची मेल आहे. आत्तापर्यंत आलेल्या मेल या मुंबई, ठाणे, पुणे या परिसरांतून आल्या होत्या. ज्या ठिकाणी इंग्रजी वर्तमानपत्रे पोहोचत नाहीत अशा ठिकाणच्या तरुणांकडून गुंतवणूक पर्यायांबाबत सतत विचारणा होत असते म्हणून त्यांना मागर्दर्शक ठरावे या उद्देशानेच हे सदर सुरू झाले आहे. परंतु एक वर्ष साप्ताहिक सदर लिहायचे म्हणजे सुरुवातीचा व शेवटचा असे दोन आठवडे सोडले तरी किमान पन्नास कुटुंबांकडून अपेक्षित प्रतिसाद येणे आवश्यक ठरेल, म्हणून मनात साशंकता होती. सदराची सुरुवात सहस्रबुद्धे कुटुंबीयांच्या वित्तीय नियोजनाने झाली आणि त्यानंतर ज्या मेल आल्या त्या तशाच थाटाच्या होत्या व एकाही वाचकाने प्रश्नावली भरून पाठविली नाही; परंतु सुनीता यादव यांचे नियोजन केल्यानंतर या सदरातून वेगवेगळ्या ठिकाणच्या विविध सामाजिक व आíथक स्तरांतील वाचकांच्या ज्या मेल्स आल्या त्यापकी ही एक आहे. देसाई कुटुंब मुक्काम पोस्ट पनोरी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथे राहतात. कोल्हापूर शहरापासून ५० किमी अंतरावर हे गाव शंभर-सव्वाशे उंबरठे असलेले असून रोजची वर्तमानपत्रे तिथे सकाळी पोहोचत नाहीत. तर देसाई सर ‘लोकसत्ता’चे अंक ऑनलाइन वाचतात. म्हणून देसाई सर व बाईंच्या अभिनंदनाने सुरुवात केली.
अर्थ नियोजन करावयाचे आहे?
आम्हाला कळवा
लोकसत्ता कार्यालय,
‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१.
: ई-मेल संपर्क : arthmanas@expressindia.com
वर दिलेल्या क्रमांकावर तुम्ही एसएमएस पाठवा. तुमचा एसएमएस मिळताच फंडातर्फे तुमच्याशी फंडाचा ग्राहक सेवा प्रतिनिधी संपर्क करेल. तुम्ही म्युच्युअल फंडात पहिल्यांदा गुंतवणूक करत आहात म्हणून तुम्हाला ‘केवायसी’ची पूर्तता करणे आवश्यक आहे. म्हणून ज्या कोणाशी पहिल्यांदा संपर्क कराल त्या वेळी अर्जासोबत दोन ‘केवायसी’ फॉर्म पाठवायला सांगा. ‘केवायसी’ हा फॉर्म व त्यासोबत पॅनकार्ड, राहण्याच्या पत्त्याचा पुरावा आदी आवश्यक कागदपत्रे जोडा. ‘केवायसी’ची पूर्तता झाल्यानंतरच तुमच्या म्युच्युअल फंडाचा अर्ज स्वीकारण्यात येईल.
नव्याने गुंतवणूक करणाऱ्याने इंडेक्स फंडाने गुंतवणुकीस सुरुवात करावी. म्हणून एचडीएफसी टॉप टू हंड्रेड फंड हा प्रत्यक्षात इंडेक्स नसला तरी विस्तृतपणे निर्देशांकाप्रमाणे परतावा असणारा फंड आहे. दुसरा फंड एचडीएफसी प्रुडन्स हा जास्तीत जास्त ६५% गुंतवणूक रोखे व जास्तीत जास्त २५% समभाग असणारा हा फंड बलन्स फंडांच्या गटात अव्वल फंड आहे. एका बाजूला टॉप टू हंड्रेड फंडात गुंतवणूक करून जी जोखीम उचलली आहे ती जोखीम या फंडामुळे संतुलित होईल. पाइनब्रिज इंडिया इक्विटी फंड मल्टिकॅप फंड आहे. पहिल्या पाच क्रमांकांत नसला तरी सातत्य हा या फंडाचा गुण आहे. म्हणून या फंडाची शिफारस करत आहे. या तीनही फंडांत गुंतवणूक दीर्घकाळ करायची आहे.
तुम्हाला किती कर्ज मिळणार ते तुमची मिळकत, वय व घराची किंमत यावर ठरेल म्हणून आजच नक्की किती कर्ज मिळेल हे इथे बसून सांगता येणार नाही. तुम्ही तुमची कर्जपात्रता बँकेकडून तपासून पाहू शकता, परंतु स्थावर मालमत्ता निश्चित केल्यानंतरच बँक कर्ज मंजूर करेल. पत्नीसाठी एचडीएफसी लाइफ हेल्थ अँशुअर प्लॅन हे विमाछत्र एचडीएफसी लाइफच्या कार्यालयात जाऊन खरेदी करा. हे विमाछत्र तुम्हालासुद्धा संभाव्य आरोग्य खर्चाला संरक्षण देईल. पत्नीचा टर्म प्लॅन अगदी उद्याच घेऊन टाका, कारण गरोदरपण, बाळंतपणात झालेली एखादी शस्त्रक्रिया या कारणांस्तव विम्याचा हप्ता वाढू शकतो. देसाई यांच्याशी बोलताना देसाई सर म्हणाले की, ते जिल्हा परिषदेच्या सेवेत असल्यामुळे त्यांना आरोग्य खर्चाच्या साधारण ७०% परतावा जिल्हा परिषदेकडून मिळतो, त्यामुळे आरोग्य विम्याची आवश्यकता आहे का? शासनाच्या सर्व योजनांना शर्ती लागू असतात. या शर्ती व एचडीएफसी लाइफ हेल्थ अँशुअर प्लॅनच्या शर्ती यांचा अभ्यास करून पत्नीसाठी ही योजना खरेदी करायची की नाही याचा निर्णय घ्या.
भविष्यात जेव्हा घर व कर्ज घ्याल तेव्हा घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेएवढा टर्म प्लॅन घ्यायला विसरू नका. काही टर्म प्लॅनमध्ये दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट आदी कारणांनी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळत नाही म्हणून खरेदीआधी योजनेच्या अटी व शर्ती समजून घ्या.
गरजा काय?
* सध्या हे कुटुंब खेडेगावात राहात असून कोल्हापुरात (शहरात) स्वत:चे घर किंवा फ्लॅट घेण्याचा विचार आहे.
* पुढील १५-२० वर्षांचा विचार करता योग्य नियोजन काय याविषयी गोंधळ सुरू आहे.
* दोघांना मिळून बँकेचे कमाल किती कर्ज मिळू शकेल?
* लग्नाला तीन वष्रे पूर्ण झाली असून अजून अपत्य नाही. त्यामुळे मोठे निर्णय घेता येत नाहीयेत.
* दोघांवर सध्या कुठलेही कर्ज नसून विशेष आíथक जबाबदाऱ्या नाहीत.
* पगाराव्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पन्न नाही.
* सर्व विमा योजना पारंपरिक प्रकारच्या आहेत; टर्म प्लॅन कोणता (किती रकमेचा) घ्यावा?
अनिश्चिततेच्या भीतीने वर्तमानातील लक्ष्य विचलित होऊ नये!
आज ज्यांचे वित्तीय नियोजन करणार आहोत त्या सचिन देसाई यांची ई-मेलद्वारे मिळालेली माहिती समोर ठेवली आहे.
First published on: 03-02-2014 at 08:06 IST
TOPICSनियोजनभान
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidence on mutual fund investment