वर्ष १९७१ मध्ये स्थापन झालेली गुजरात ऑटोमोटिव्ह गीयर्स ही तशी खूपच लहान कंपनी. म्हणजे तिचं भरणा झालेलं भाग भांडवलच मुळी अवघे ३२ लाख इतके आहे. त्यातही ६७% पेक्षा जास्त हिस्सा प्रवर्तकांकडे. म्हणजे खूपच कमी शेअर्स उलाढालीसाठी बाजारात उपलब्ध. मात्र तरीही या कंपनीचा शेअरच्या शिफारशीचं मुख्य कारण म्हणजे कंपनीचे कामगिरीतील सातत्य. कंपनी वाहन उद्योगातील ट्रान्समिशन गीयरच्या उत्पादनात असून ती मुख्यत्वे एचसीव्ही तसेच अम्बॅसेडर आणि जीपसाठी उत्पादन करते. मिहद्र आणि मिहद्रच्या केवळ ट्रॅक्टर विभागासाठी स्टीअिरग पिन्स आणि क्लच शाफ्ट्स बनवणाऱ्या या कंपनीने आता टाटा मोटर्ससाठीही पुरवठय़ाचे प्रयत्न सुरू केले आहेत. हिमाचल प्रदेशमधील या कंपनीचा कारखाना गुजरात राज्यातील बडोद्याला काकली येथे आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या नफ्यात सरासरी वार्षिक ८८.८९% दराने वाढ होत आहे. हे सातत्य कायम ठेवत मार्च २०१५ अखेर संपलेल्या तिमाहीतही कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीने ७.५ कोटीच्या विक्रीवर १,१ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या गुजरात ऑटोमोटिव्ह गीयर्सने आता निर्यतीसाठी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. केवळ ‘बीएसई’वर नोंदणी असलेल्या आणि केवळ ४० कोटींचे बाजार भांडवल असलेली ही मायक्रो कॅप कंपनी खूप आकर्षक वाटत असली तरीही तिचे शेअर्स मात्र द्रवणीय नाहीत. गुंतवणूकदारांनी हे लक्षात घ्यायलाच हवं. अर्थात कमी द्रवणीय शेयर्सचे फायदे / तोटे अशा गुंतवणुकीला आपसूकच लागू होतात.

arthmanas@expressindia.com
सूचना :लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
‘अर्थ वृत्तान्त’संबंधी अभिप्राय/प्रतिक्रिया कळवा:arthmanas@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा