काही कंपन्यांच्या बाबतीत जास्त लिहावे लागत नाही. एचसीएल टेक्नोलॉजिज ही अशीच एक ‘ब्ल्यू चिप’ कंपनी आहे.
१९९९ मध्ये आयपीओ आल्यानंतर एचसीएलने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात नाव केले. कंपनीची ३५ देशांत कार्यालये असून ती आता खऱ्या अर्थाने जागतिक कंपनी आहे. माहिती तंत्रज्ञानातील आघाडीची ही कंपनी सॉफ्टवेअर, अभियांत्रिकी, अवकाश, बीपीओ, दूरसंचार, किरकोळ विक्री इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. गेले दशकभर सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीचे गेल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच होते. कंपनीने ४२४८ कोटी रुपयांच्या उलढालीवर १६६३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. भागधारकांना १:१ प्रमाणात बक्षीस समभाग देणाऱ्या या कंपनीने आगामी कालावधीसाठी मात्र आपले निकाल तितकेसे चांगले असणार नाहीत, अशी आगाऊ सूचना गुंतवणूकदारांना दिली आहे.
नुकताच जाहीर झालेला बोनस आणि त्यानंतर व्यवस्थापनाच्या या सुचनेमुळे सध्या एचसीएलचा बाजारभाव ९४० रुपयांच्या आसपास आला आहे. फोर्बस्च्या यादीत असलेल्या एचसीएलसारख्या कंपनीचे शेअर खरेदी करून ठेवायची ही संधी आहे. ज्या गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओत ‘ब्ल्यू चिप’ शेअर हवे असतील त्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एचसीएलचा नक्की विचार करावा.
av-08
stocksandwealth@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनीकडून लेखकाने कुठलेही मानधन घेतलेले नाही.