स्वातंत्र्यानंतर भारताच्या औद्योगिक विकासासाठी मोठ्या भांडवलाची गरज भासू लागली होती. हे भांडवल भारताच्या जनतेकडून गोळा करून करून त्याचा वापर विकासासाठी करावा व भारतीय नागरिकांना लहान लहान बचतीसाठी एक योजना असावी या उद्देशाने एखाद्या संस्थेची स्थापना करावी या उद्देशाने भारत सरकार व रिझर्व बँक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून १९६३ साली संसदेने ‘भारतीय युनिट ट्रस्ट कायदा १९६४’ या कायद्यास मंजुरी देऊन देशात म्युच्युअल फंड उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. या म्युच्युअल फंडाने ‘युनिट स्कीम ६४ (यूएस ६४)’ ही योजना सुरू करून भारतात म्युच्युअल फंडांच्या खरेदी विक्रीला सुरुवात झाली. रोज पुर्न:खरेदीची किंमत जाहीर होत असे. जुल महिन्यात वार्षकि लाभांश जाहीर होत असे. भारतामध्ये म्युच्युअल फंड व्यवसायाचा कसा विकास होत गेला हे येत्या काही भागात जाणून घेऊ. आजच्या भागात तूर्तास ‘एचडीएफसी चिल्ड्रेन गिफ्ट फंड’ विचारात घेऊ या.
हा कायम गुंतवणुकीसाठी खुला असणारा (Open Ended) बॅलन्स फंड असून, तो २ मार्च २००१ रोजी प्रथम गुंतवणुकीस खुला झाला. या फंडाचे उद्दिष्ट मर्यादित जोखीम पत्करून भांडवली नफा मिळविणे हे आहे. चिराग सेटलवाड हे या योजनेचे मुख्य गुंतवणूक व्यवस्थापक आहेत तर राकेश व्यास हे सह-गुंतवणूक व्यवस्थापक आहेत. यात गुंतवणूक (Investment Plan) व बचत (SavingPlan B) अशा दोन योजना उपलब्ध आहेत. निधी व्यवस्थापकाला गुंतवणूक योजनेखाली ४०-७५% गुंतवणूक शेअरमध्ये व २५-६०% दरम्यान रोख्यांमध्ये करता येते, तर बचत योजनेखाली ८०-१००% गुंतवणूक रोख्यांमध्ये व ०-२०% गुंतवणूक शेअरमध्ये करता येते. गुंतवणूक योजना ही भांडवली वृद्धीसाठी तर बचत योजनेचे उद्दिष्ट मर्यादित जोखीम स्वीकारून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे असे आहे. ३० जानेवारी २०१३ रोजी गुंतवणूक योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) रु. ५०.३६ तर बचत योजनेचे रु. २६.६२ असे होते. या फंडाचे ३१ डिसेंबर २०१२ या दिवशीच्या पोर्टफोलियोनुसार ७३.६०% रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांच्या समभागात गुंतविली आहे तर २२.७१% रक्कम रोख्यात तर ३.६९% रक्कम रोख रक्कमसदृश्य अतिअल्प मुदतीच्या भारत सरकारच्या रोख्यात गुंतविली आहे. गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत फंडातून बाहेर पडल्यास ३% शुल्क (Load) आकारले जाते. २% शुल्क दोन वर्षांच्या आत तर १% शुल्क तीन वर्षांच्या आत बाहेर पडल्यास आकारले जाते. तीन वर्षांच्या नंतरच्या निर्गुतवणुकीवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. किमान रु. ५००० भरून या योजनेत गुंतवणुकीस सुरुवात करता येते. नंतर रु. १००० किंवा रु. १०००च्या पटीत या योजनेची युनिट्स विकत घेता येतात. या योजनेची युनिट्स खरेदी करण्यासाठी ज्याच्या नावाने पालक ही खरेदी करू इच्छितात तिचे किंवा त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असावे. या योजनेचे एक वैशिष्टय़ म्हणजे ज्याच्या नावावर गुंतवणूक आहे त्याच्या पालकांना गुंतवणूक मूल्याच्या दहा पट किंवा १० लाखापर्यंतचा (जे जास्त असेल त्या) रकमेचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. परंतु पालकांचे वय ८० पेक्षा जास्त नसावे. हे या योजनेचे वेगळेपण आहे. गुंतवणूक योजनेच्या परताव्याच्या तुलनेसाठी क्रिसिल बॅलन्स फंड निर्देशांक तर बचत योजनेच्या परताव्याच्या तुलनेसाठी क्रिसिल एमआयपी ब्लेंडेड निर्देशांक वापरण्यात येतो.
(लेखक व्यावसायिक वित्तीय सल्लागार आहेत.)
योजना प्रकाराप्रमाणे परतावा दर (%)
कालावधी गुंतवणूक बचत
एक महिना -०.४ ०.९
तीन महिने ५.५ २.४
सहा महिने ११.३ ५.३
एक वर्ष १८.३ १०.८
तीन वर्ष १५.४० १०.००
पाच वर्ष १२.०२ ९.५०
स्रोत : एचडीएफसी म्युच्युअल फंड
फंड-विश्लेषण : ‘एचडीएफसी चिल्ड्रेन गिफ्ट फंड’
स्वातंत्र्यानंतर भारताच्या औद्योगिक विकासासाठी मोठ्या भांडवलाची गरज भासू लागली होती. हे भांडवल भारताच्या जनतेकडून गोळा करून करून त्याचा वापर विकासासाठी करावा व भारतीय नागरिकांना लहान लहान बचतीसाठी एक योजना असावी या उद्देशाने एखाद्या संस्थेची स्थापना करावी या उद्देशाने भारत सरकार व रिझर्व बँक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून १९६३ साली संसदेने ‘भारतीय युनिट ट्रस्ट कायदा १९६४’ या कायद्यास मंजुरी देऊन देशात म्युच्युअल फंड उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
आणखी वाचा
First published on: 04-02-2013 at 12:51 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hdfc children gift fund